मुगडाळीचे फोडणीचे वरण (moongdaliche phodniche varan recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

सुप्रिया थेंगाडी मॅडम ची मुग डाळीचे फोडणीचे वरण ही रेसिपी कुकस्नॅप केली.खूप छान झाले वरण सगळ्यांना खूप आवडले.

मुगडाळीचे फोडणीचे वरण (moongdaliche phodniche varan recipe in marathi)

सुप्रिया थेंगाडी मॅडम ची मुग डाळीचे फोडणीचे वरण ही रेसिपी कुकस्नॅप केली.खूप छान झाले वरण सगळ्यांना खूप आवडले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१२ मिनिटे
३-४
  1. 1/2 कपमुगडाळ
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. 3-4कडीपत्ता पाने
  7. 2 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  8. 2 टीस्पूनतेल
  9. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  10. १/८ टीस्पून हिंग
  11. 1/4 टीस्पूनहळद
  12. 1 टीस्पूनगोडा मसाला
  13. 1/4 टीस्पूनमीठ
  14. 1 टीस्पूनसाखर
  15. 1-2 कपपाणी...आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

१०-१२ मिनिटे
  1. 1

    साहित्य घेतले.मुगडाळ स्वच्छ धुवून कुकर मधून शिजवून घेतली.कांदा,टोमॅटो,मिरची,कोथिंबीर चिरून घेतले.आलं लसूण पेस्ट करून घेतली.बाकी साहित्य तयार ठेवले.

  2. 2

    डाळ छान घोटून घेतली.कढईत तेल घालून ते तापल्यावर त्यात जीरे मोहरी घातली.ती तडतडल्यावर त्यात कडीपत्ता, आलं लसूण पेस्ट घालून परतले.आता चिरलेला कांदा घालून परतले.नंतर चिरलेला टोमॅटो घालून परतून शिजवून घेतले.

  3. 3

    छान शिजल्यावर त्यात आधी शिजलेली थोडी डाळ घालून नीट मिक्स केले.मंद गॅसवर दोन तीन मिनिटे ठेवले.मग बाकीची डाळ घालून छान उकळले,गोडा मसाला,मीठ,साखर,चिरलेली कोथिंबीर घालून मस्त उकळी आणली.

  4. 4

    मुगडाळीचे फोडणीचे वरण खाण्यासाठी तयार आहे.सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घेतले.गरम गरम वरण भातासोबत त्यावर तुपाची धर आणि मस्त लोणच्याची फोड...मस्तच

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes