ओल्या नारळाचे उकडीचे मोदक (olya naralache ukadiche modak recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#cpm7
#week7
#ओल्या_नारळाचे_उकडीचे_मोदक

ओल्या नारळाचे उकडीचे मोदक (olya naralache ukadiche modak recipe in marathi)

#cpm7
#week7
#ओल्या_नारळाचे_उकडीचे_मोदक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिटे
४ जणांसाठी
  1. मोदकाच्या सारणासाठी
  2. 2 वाटीओलं खोबरं
  3. 1 वाटीबारीक चिरलेला गुळ
  4. 1 टीस्पूनवेलची पूड
  5. 1 टीस्पूनभाजलेली खसखस
  6. 1/4 टीस्पूनकेशर
  7. मोदकाच्या पारी साठी
  8. 3 वाट्याबासमती किंवा कोणत्याही तांदळाची पिठी
  9. 3 वाट्यापाणी
  10. 2 टीस्पूनतूप
  11. 1 टीस्पूनतेल मोदकाचे पीठ मळताना लावायला

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    ओलं खोबरं आणि गुळ मिक्स करुन थोडा वेळ ठेवावे, यामुळे सारण चांगले एकजीव होते.

  2. 2

    मग त्यात वेलची पूड आणि भाजलेली खसखस घालावी आणि ते मिश्रण कढई मधे घालून स्लो गॅसवर ठेवून सतत ढवळत राहावे. मिश्रण भांड्याच्या तळाला चिकटून करपणार नाही याची काळजी घ्यावी.

  3. 3

    खोबर्याचे मिश्रण कढईच्या साइडला सुकायला लागले की मग सारण झाले आहे असे समजावे.

  4. 4

    मोदकाच्या पारीसाठी जेवढे तांदळाचे ३ वाटी पीठ असेल तेवढेच ३ वाटी पाणी एका भांड्यात उकळायला ठेवावे. त्या पाण्यात १ चमचा तुप घालावे, यामुळे मोदकाला छान तकाकी (शायनिंग) येते. पाणी उकळल्यावर त्यात तांदळाचे पीठ घालून मिक्स करावे आणि गॅस बंद करुन ५ मिनिटे झाकून ठेवावे.

  5. 5

    पीठ थोडेच गार झाल्यावर लगेच पाणी आणि तेलाचा हात लावून पीठ गरम असतानाच पीठ मऊ होईपर्यंत मळावे. पीठ चांगले मळल्यामुळे मोदक छान मऊसर होतात आणि मधेच मोदक फाटत नाहीत.

  6. 6

    बो‌टाला तेल लावून मग पीठाचा एक गोळा घेऊन त्याच्या मधे खोलगट करत पारीला पुरी सारखा गोल आकार करुन त्यात १ चमचा खोबर्याचे सारण घालून, पारीच्या कडेला चिमटी मधे पकडून मोदकाच्या पारीला हाताने गोल आकार देत मोदक बनवावे. किंवा मोदकाच्या साच्याला तुप लावून त्यात पीठ आणि खोबर्याचे सारण घालून पण मोदक बनवतात.

  7. 7

    मोदक बनवण्यासाठी मोदक पात्रात पाणी घालून उकळण्यासाठी ठेवावे. किंवा मोदक पात्र नसेल तर एका कढईत पाणी घालून उकळावे. मग एका भांड्याला आतून तुप लावून त्यात कच्चे मोदक ठेवून ते भांड पाण्यावर स्टॅण्ड वर ठेवून मोदक वाफवण्या साठी ठेवावे.

  8. 8

    मोदक उकडायला १५ मिनिटे लागतात. नंतर गरमागरम मोदक एका प्लेटमधे काढून बाजूला वरण, भात, तुप आणि लिंबू ठेवून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून मग मोदकाचा प्रसाद खायला खूप छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes