ओल्या नारळाचे उकडीचे कानुले (kanole recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

आमच्याकडे आज नागपंचमीसाठी नैवेद्याला बनवलेले पारंपारिक पद्धतीचे ओल्या नारळाचे उकडीचे कानुले... 😊😊😋😋

ओल्या नारळाचे उकडीचे कानुले (kanole recipe in marathi)

आमच्याकडे आज नागपंचमीसाठी नैवेद्याला बनवलेले पारंपारिक पद्धतीचे ओल्या नारळाचे उकडीचे कानुले... 😊😊😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
4 व्यक्तींसाठी
  1. सारणासाठी
  2. 1 छोटानारळ खोवलेला
  3. 1 कपसेंद्रिय गुळ
  4. 1 टेबलस्पूनखसखस
  5. चिमुटभरमीठ
  6. 1/2 टी स्पूनवेलची पावडर
  7. कव्हरिंग साठी
  8. 1गव्हाचे पीठ
  9. 1/2 टीस्पूनमीठ
  10. 1 टेबल स्पूनतूप
  11. थोडे पाणी

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    कव्हरिंग साठी आधी कणीक मळून घ्यायची. त्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये मीठ घालून एकदम घट्ट माळायची. नाहीतर कानुले व्यवस्थित होत नाहीत.

  2. 2

    सारणासाठी एका पातेल्यात एक टेबलस्पून तूप गरम करायचे. त्यात खसखस घालून थोडी परतायची. मग गूळ घालून पातळ होऊन विरघळू द्यायचा. गूळ विरघळल्यानंतर त्यात खोबरे घालून तसेच वेलची पूड घालून चांगले मिक्स करायचे आणि चार ते पाच मिनिट चांगले परतून शिजवून घ्यायचे. जास्त वेळ शिजवायचे नाही नाहीतर सारण पड

  3. 3

    सारण पूर्णपणे थंड होत आले की मग मळलेल्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या अगदी छोट्या छोट्या लाटे करून ठेवायच्या. त्यावर मध्ये सारण ठेवून आपण करंजी करतो त्याप्रमाणे त्याच्या कडा जोडून घ्यायच्या आणि फोटो दाखवल्याप्रमाणे त्याला डिझाईन करायचे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे डिझाईन करू शकता.

  4. 4
  5. 5

    आता मोदकाच्या चाळणीला तेल लावून घ्यायचे आणि त्यावर हे बनवलेले कानुले ठेवायचे. एका पसरट कढाईमध्ये पाणी घालून गरम करून त्यावर ही मोदकाची ठेवायची आणि त्यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटे उकडून घ्यायचे.

  6. 6

    तयार आहेत आणि गरमागरम ओल्या नारळाचे उकडीचे कानुले... 😍😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
रोजी
Pune

Similar Recipes