तडका दिलेली बाजरीची खिचडी/ खिचडा (bajrichi khichdi recipe in marathi)

#cpm8 # बाजरीची खिचडी/ खिचडा...
पौष्टिक अशी बाजरी, वेगवगळ्या प्रकारे खाल्या जाते. त्यात बाजरीची खिचडी, थंडीच्या दिवसांत केली जाते, बाजरी गरम असल्यामुळे... अशीच, झटपट होणारी , चविष्ट अशी बाजरीची खिचडी...
तडका दिलेली बाजरीची खिचडी/ खिचडा (bajrichi khichdi recipe in marathi)
#cpm8 # बाजरीची खिचडी/ खिचडा...
पौष्टिक अशी बाजरी, वेगवगळ्या प्रकारे खाल्या जाते. त्यात बाजरीची खिचडी, थंडीच्या दिवसांत केली जाते, बाजरी गरम असल्यामुळे... अशीच, झटपट होणारी , चविष्ट अशी बाजरीची खिचडी...
कुकिंग सूचना
- 1
बाजरी, मूग डाळ, तांदूळ, स्वच्छ निवडून, घ्यावी. बाजरी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यावी. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावे.
- 2
बाजरी चांगली निथळून घ्यावी. आता मिक्सर जार मध्ये बाजरी टाकून जाडसर वाटून घ्यावी. रव्यापेक्षा जाडसर हवी. डाळ आणि तांदूळ निथळून घ्यावे. आले आणि लसूण शक्यतोवर कुटून घ्यावे.
- 3
आता कुकरमध्ये तेल टाकून, ते गरम झाल्यावर त्यात, जीरे मोहरी टाकून ते तडतडल्यावर त्यात कांदा टाकावा. हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकावा.खोबऱ्याचे तुकडे आणि हिंग टाकून कांदा सोनेरी होईपर्यंत परतावा. नंतर त्यात हळद, तिखट, धणे पूड आणि मसाला टाकावा.
- 4
मिक्स करून त्यात बारीक केलेली बाजरी आणि निथळून घेतलेले डाळ तांदूळ टाकावे. आणि चांगले दोन मिनिट कमी आचेवर परतून घ्यावे.
- 5
आता त्यात गरम पाणी टाकावे. भाजलेले शेंगदाणे, मीठ टाकावे.
- 6
कोथिंबीर टाकावी चांगले एकत्र करून घ्यावे. आता कूकरच्या 3-4 शिट्या, मध्यम आचेवर काढून घ्याव्यात. थंड झाल्यावर कुकरचे झाकण उघडावे.
- 7
चविष्ट बाजरीची खिचडी तयार झाली आहे. आता त्यावर तडका देण्यासाठी, एका पॅनमध्ये तूप टाकून त्यात जीरे मोहरी टाकावी. लाल मिरची आणि कढीपत्ता टाकावा. तिखट आवडत असेल तर गॅस बंद करून तिखट टाकावे.
- 8
आता हा गरम तडका, खिचडीवर ओतावा.. वरून कोथिंबीर टाकावी.. अशी ही तडका दिलेली बाजरीची खिचडी जेवणासाठी तयार आहे. ही खिचडी, तडका न देताही, वरून तूप घेवून ही जेवता येईल...
Similar Recipes
-
बाजरीची मसाला खिचडी (bajrichi masala khichdi recipe in marathi)
#kr # वन पॉट मील # बाजरीची मसाला खिचडी # नेहमीच्या डाळ तांदुळाच्या खिचडी पेक्षा वेगळी... पौष्टिक असलेली अशी ही बाजरीची खिचडी, त्यात भाज्या टाकून आणखी स्वादिष्ट झाली आहे.. Varsha Ingole Bele -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#GA4 #WEEK24 #KEYWORD_BAJRAबाजरी हे एकदल धान्य.भरपूर मँगनीझ व पोटँशिअमचा स्त्रोत असलेले हे धान्य pearl millet म्हणून ओळखले जाते.महाराष्ट्र,गुजरात आणि राजस्थान ही मुख्यत्वे बाजरी पिकवणारी राज्ये.मुबलक प्रमाणात बाजरीचा आहारात समावेश असल्यास कोलेस्टेरॉल पातळी कायम नियंत्रणात रहाते.तसेच रक्तवाहिन्यांंचे रक्त वाहून नेण्याचे कार्य सुरळीत करते.ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवते.फायबरही भरपूर प्रमाणात असते.बाजरी गुणाने उष्ण असते त्यामुळे थंडी व पावसाळ्यात खाणे इष्ट.बाळंतीण व बाजरीची भाकरी हे सर्वमान्य आहे.भरपूर प्रमाणात दूध येण्यासाठी बाजरीची भाकरी आवर्जुन दिली जाते.संक्रांतीत भोगीला तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आपण करतोच.तरीही भाकरीशिवाय थालिपीठाच्या भाजणीत,कडबोळ्याच्या भाजणीत बाजरी अग्रक्रमाने घातली जाते.बाजरीच्या पीठाची पातळ अशी ओवा,लसूण,जीरे,ताक घालून केलेली हाव(सूप)सर्दीवर रामबाण आहे.बाजरीच्या पीठाची धुरी घेतल्यास सर्दीने चोंदलेले नाक मोकळे होते.अशी ही बहुगुणी बाजरी....पण सगळ्यांनाच आवडते असे नाही.तरीही ग्लुटेनफ्री असल्याने सध्या डाएट प्लँनमधेबाजरी/ज्वारीचा समावेश असतो.आम्ही दिवाळीसुट्टीत गेलो की बाजरीची खिचडी माझी आजी हमखास करायला सांगायची.तीच आज मी बनवली आहे ...बाजरीची खिचडी!!खूप पौष्टीक आणि चविष्ट...,🙋 Sushama Y. Kulkarni -
पारंपारिक पद्धतीने बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
"पारंपारिक पद्धतीने बाजरीची खिचडी" आमच्या गावी बाजरीचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे बाजरीचे पदार्थ जास्त बनवले जातात.त्यातील एक ही रेसिपी.. लहानपणी आम्ही गावी जायचं तेव्हा आजी, मावशी ,आत्त्या या सगळ्यांना ही खिचडी बनवताना बघीतले आहे.आज आम्हालाही बाजरीची खिचडी खाण्याची इच्छा झाली.मग काय रात्रीपासून च तयारी सुरू झाली.ही खिचडी कुकरमध्ये बनवली तर अर्धा तास लागतो,पण आज आम्ही गॅसवर बनवली, पुर्ण एक तास लागला शिजायला... चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#kr#भारतीय वन पाॅट मील#खिचडी😋बाजरीची खिचडी पचायला हलकी वजन कमी करण्यासाठी फार उपयोगी Madhuri Watekar -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
बाजरी ही शरीरासाठी खूप उपयुक्त आहे.थोडी ही खाण्यासाठी उष्ण असते.परंतुयाची भाकरी हिवाळ्यात खाण्यासाठी खूप युक्त आहे.#cpm8 Anjita Mahajan -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#cpm8 बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम यांचे प्रमाण जास्त असून, त्यामुळे रक्तपुरवठा नियमित होण्यास मदत होते. बाजरीमध्ये फायबर (तंतुमय पदार्थ) अधिक असून, ते पचनक्रियेसाठी मदत करतात. बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात. मधुमेही व्यक्तींसाठी बाजरीची भाकरी लाभदायी ठरते. तर अशा बहुगुणी बाजरीची खिचडी मी बनवली आहे. सुप्रिया घुडे -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#cpm8 रेसिपी मॅगझिन. बाजरी ह्या धान्यापासून आपल्याला एनर्जी मिळते.कॅलशियम,लोह, व्हिटॅमिन बी,असते.बाजरी खाल्ल्याने कोलॅस्ट्रोल कंट्रोल होण्यास मदत होते.फायबर असल्याने पचन व्यवस्थित होते. Pragati Hakim -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#cpm8#अतिशय पोष्टीक वन पाॅट मिल .सोबत पापड कुरडई एकदम झकास लागते.विदर्भातील पारंपारीक पदार्थ. Hema Wane -
-
खानदेशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 #खानदेशी मसाला खिचडी... आता खिचडी ही वेगवेगळ्या प्रकारे केल्या जाते.. अगदी खानदेशात सुध्दा, प्रत्येक घरात वेगळ्या पद्धतीने केलेली असते खिचडी .मी ही अशीच केली आहे खिचडी... फक्त तिखटाचे प्रमाण कमी केले आहे ..😀 Varsha Ingole Bele -
-
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#cpm8Week 8बाजरी हे धान्य शरिराला उष्णता पुरवण्याच काम करत .थंडीत हे धान्य खाल्ल जात. Supriya Devkar -
बाजरी ची खीचडी (bajrichi chi khichdi recipe in marathi)
#cpm8 बाजरी ची खीचडी ही तशी थंडी च्या दिवसात जास्त खाल्ली जाते. पौष्टिक व हेल्दी अशी ही खीचडी भाज्या घालुन पण छान लागते. Shobha Deshmukh -
तडका खिचडी (Tadka Khichdi Recipe In Marathi)
#TBRपौष्टिक व चविष्ट असणारी ही तडका खिचडी लहानपासून मोठ्यांना सगळ्यांना खुप आवडते Charusheela Prabhu -
बाजरीची इडली (bajrichi idli recipe in marathi)
ग्लूटेन फ्री पदार्थांपैकी एक चविष्ट आणि पौष्टिक धान्य ...बाजरी...बाजरीची इडली चटणी केली नेहमीच्याच पद्धतीने ..फक्त तांदळाऐवजी बाजरी वापरली.मस्त झाल्या इडल्या एकदम .त्याच बॅटर पासून डोसे पण बनवले.तेही मस्त झाले. Preeti V. Salvi -
पौष्टिक बाजरीची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi)
#LCM या थीम साठी पौष्टिक बाजरीची खिचडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
फोडणीची खिचडी (phodnichi khichdi recipe in marathi)
#tmr झटपट होणारी, चविष्ट, पचायला हलकी अशी फोडणीची खिचडी.. Varsha Ingole Bele -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#kr बाजरीमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस सारख्या अनेक पोषक घटक असतात.बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरावर खूपच चांगला परिणाम होतो. शरीराची हाडे मजबूत होतात तर हृदयही निरोगी राहते. सर्दीचाही त्रास होत नाही. इतकंच नाही बाजरी मुळे प्रतिकारशक्तीही वाढते. Sapna Sawaji -
डाळ खिचडी (Dal Khichdi Recipe In Marathi)
घरी उपलब्ध साहित्य वापरून झटपट होणारी लहानांन पासून मोठ्यांपर्यंत सर्वाना आवडणारी अशी ही रेसीपी 'डाळ खिचडी ' Kshama's Kitchen -
पौष्टिक मुगडाळ खिचडी (moongdaal khichdi recipe in marathi)
#kr#खिचडीआजारी असो की नसो झटपट पौष्टिक आणि चविष्ट होणारा पदार्थ म्हणजे खिचडी...त्यात सालीची हिरवी मुगडाळ घातली की पचायला ही हलकी.... Shweta Khode Thengadi -
पौष्टिक मसाला खिचडी (Masala khichdi recipe in marathi)
#खिचडी... नेहमी खिचडी करताना त्यामध्ये काही बदल केला म्हणजे चांगलं वाटतं जेवायला ...म्हणून आज मी खिचडी करताना त्यात, घरी असलेले पंचरंगी दाणे, मटार गाजर टोमॅटो टाकून केलेली आहे मसाला खिचडी... आणि सोबत गरम कढी आणि पापड.... Varsha Ingole Bele -
बाजरीची खिचडी(bajrichi khichadi recipes in marathi)
आपण नेहमी तांदूळ वापरून खिचडी बनवतो ही खिचडी जरा वेगळी आहे यातही तांदूळ वापरले पण कमी प्रमाणात बघा तुम्हालाही आवडेल Arati Wani -
बाजरा खिचडी (bajra khichdi recipe in marathi)
#GA4#week24#bajraपझल मधुन बाजरी हा क्लु ओळखुन हि पौष्टीक अशी बाजरा खिचडी केली आहे. Supriya Thengadi -
बाजरी खिचडी (bajari khichdi recipe in marathi)
#cpm8#week8#बाजरी_खिचडी बाजरी खिचडी हा माझ्यासाठी अगदी अनोळखी पदार्थ.. कारण आता पर्यंत कधीच करायची वेळ आली नाही..त्यामुळे चव कशी असते ते देखील माहित नव्हते..रेसिपी मँगझिन साठी बाजरी खिचडी ही रेसिपी मी जेव्हां वाचली तेव्हाच मनाशी ठरवलं की इस बार तो जरुर खिचडी पकेगी...बिरबलाची खिचडी नाही बरं...😀😀 थंडीचे हिवाळ्याचे दिवस होते. सम्राट अकबराने एके दिवशी एक अजब फर्मान काढले. त्याच्या राजवाड्यासमोरच्या जलकुंडात रात्रभर कुणी उभा राहिल्यास त्याला शंभर सुवर्ण मुद्रा देण्यात येतील, अशी दवंडी पिटवली जाते. ती ऐकून एक गरीब माणूस ते साहस करायला तयार होतो.तो रात्रभर त्या जलकुंडात काकडत उभा राहतो. सकाळी अकबर येतो, तेव्हाही तो आपल्या जागेवर उभा असतो. पण अकबराची नजर जलकुंडाजवळ ठेवलेल्या एका छोट्याश्या दिव्याकडे जाते.अकबर विचारतो, दिवा रात्रभर तेवत होता का? सेवक, होय म्हणतो. रात्रभर दिवा तेवत राहिल्याने जलकुंडात उभा राहणार्या माणसास उब मिळाल्याचा निष्कर्ष अकबर काढतो.आणि शंभर सुवर्ण मुद्रांचे बक्षीस देता येणार नसल्याचे बजावतो.तो गरीब माणूस बिचारी दु:खी होतो. त्याला वाटते की आता बिरबलच आपल्याला न्याय देईल. तो बिरबलाकडे जाऊन संपूर्ण घटना सांगतो. बिरबल त्याला म्हणतो, 'तू आता घरी जा. मी बघतो काय करायचे ते.'दुसर्या दिवशी दरबार भरतो. रोज वेळेवर येणारा बिरबल आज आला नाही, म्हणून अकबर सेवकामार्फत बोलाविणे पाठवितो. सेवक जाऊन परत येतो व बिरवल खिचडी शिजवत असल्याचे सांगतो. ...तर अशी ही बिरबलाची खिचडी... चला तर मग बिना कांदा लसणाची अगदी सात्विक तरीही अफाट चविष्ट ,झटपट होणारी अशी बाजरीची खिचडी करु या...😊 Bhagyashree Lele -
रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी (dal Khichdi recipe in marathi)
#kr# Indian one pot meal#रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी Rupali Atre - deshpande -
-
मिश्र डाळ खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7अतिशय पौष्टिक आणि पटकन होणारी मिश्र डाळ खिचडी मी आज केली kavita arekar -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#krबाजरी ही उष्ण असल्याने ही खीचडी सहसा हिवाळ्यात करतात. पण एरवी पण आपण करू शकतो. हि खीचडी चमचमीत, अतिशय टेस्टी, व ती कढी आणि लसणाच्या तिखटा बरोबर खुपचं अप्रतिम लागते. Sumedha Joshi -
दाल खिचडी तडका (dal khichdi tadka recipe in marathi)
#kr खिचडी ही प्रत्येक घरी बनतेच आणि अनेक प्रकारे बनवतात. मी मुग डाळ खिचडी बनवली आहे. अतिशय पौष्टिक व पचायला हलकी आहे. Shama Mangale -
पंचधान्य मिश्रीत खिचडी (panchadhanya khichadi recipe in marathi)
#GA4#week7 खूप पौष्टिक अशी ही खिचडी कधीही खायला मस्त लागते.भुक नसतानाही दोन घास जास्त खाल्ले जातात. Archana bangare
More Recipes
टिप्पण्या