रताळ्याचा कीस (ratalyacha khis recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#tri

Tri_इन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंज 

मी tri_इन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंज (15 Aug) च्या थीम साठी रताळ्याची रेसिपी शेयर करत आहे.
हा पदार्थ उपवासाला तर खाऊ शकतात, पण रताळे असल्यामुळे हे खूप पौष्टिक आहे. तुम्ही इतर वेळीही ब्रेकफास्ट साठी पण ही रेसिपी बनू शकतात व सर्व वयोगटासाठी रेसिपी खूप उपयुक्त आहे

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

25 मिनट
4 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रामरताळे
  2. 1 कपशेंगदाणे कूट
  3. 1 टेबलस्पूनमीठ
  4. फोडणीसाठी
  5. 3 टेबलस्पूनतूप
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 3-4हिरव्या मिरच्या
  8. 8-10 कडीपत्त्याची पानं
  9. सजावटीसाठी कोथींबीर (ऑप्शनल)

कुकिंग सूचना

25 मिनट
  1. 1

    रताळी स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्यांना किसून घ्यावे व किस पाण्यात ठेवावा

  2. 2

    एका कढईत तूप गरम करून त्यात जीरे, हिरवी मिरची व कढीपत्त्याची फोडणी करावी व त्यात रताळ्याचा कीस घालून परतून घ्यावे

  3. 3

    एक दोन मिनिटं परतून झाल्यावर त्यात शेंगदाण्याचा कूट व चवीनुसार मीठ घालावं मिश्रण एकत्र करून घ्यावे व झाकण ठेवून त्याला एक वाफ आणावी. उपावासाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबिर घालावी

  4. 4

    रताळे शिजल्यावर गरम गरम सर्व करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

यांनी लिहिलेले

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

Similar Recipes