हळदीच्या पानातल्या पातोळ्या (haldichya panatlya patolya recipe in marathi)

Pallavii Paygude Deshmukh
Pallavii Paygude Deshmukh @cook_19803521

गणपतीच्या नैवेद्यासाठी बनवलेला एक पारंपारिक पदार्थ आहे.
#gur

हळदीच्या पानातल्या पातोळ्या (haldichya panatlya patolya recipe in marathi)

गणपतीच्या नैवेद्यासाठी बनवलेला एक पारंपारिक पदार्थ आहे.
#gur

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमतांदळाची सुवासिक पिठी
  2. 100 ग्रॅमओल्या नारळाचा चव
  3. 100 ग्रॅमगूळ बारीक चिरलेला
  4. 1 टीस्पूनखसखस
  5. 125 मि.लीपाणी
  6. 1 टीस्पूनवेलची पूड
  7. मीठ चवीनुसार
  8. 3हळदीची पानं
  9. 1 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    एका पॅन मधे पाणी उकळायला ठेवणे त्यात 1 चिमूट मीठ, आणि 1 टी स्पून तूप टाकणे, पाण्याला उकळी आली की त्यात तांदळाचे पीठ टाकून मिक्स करणे आणि एक वाफ देऊन गॅस बंद करणे. थोड्या वेळाने उकड छान मळून घेणे

  2. 2

    सारणासाठी, एका पॅन मधे खसखस कोरडी भाजुन घेणे, त्यात नारळाचा चव टाकून परतवून घेणे, नंतर त्यात गूळ टाकून मिक्स करणे, गूळ पूर्ण वितळला की त्यात वेलची पावडर टाकणे, आणि सारण कोरड करून घेणे

  3. 3

    हळदीचे पण स्वच्छ धुवून पुसून घेणे, त्याला तूप लावून घेणे व त्यावर तांदळाची उकड हलक्या हाताने सगळीकडे थापून घेणे व एका बाजूने ओल्या खोबऱ्याच सारण त्यावर पसरणे. आणि पान फोल्ड करून स्टीमर मधे 7 ते 8 मिनिटे वाफवून घेणे,

  4. 4

    स्टीम झाल्यावर तूप टाकून सर्व्ह करणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pallavii Paygude Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes