दत्तगुरुची प्रिय घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#ccs

#week2

#cookpad_ची_शाळा

#घेवडा_भाजी

घेवड्याची भाजी म्हणजेच वालाच्या शेंगा...
ही भाजी माझ्या घरातील लोकांना म्हणजेच मुलींना आवडत नाही. पण हो आमच्या दोघांच्याही आवडीची बर का..😊
त्याच प्रमाणे श्री दत्तगुरु ची देखील प्रिय भाजी.. म्हणजेच घेवडा भाजी.. करायला सोपी झटपट होणारी पौष्टिकतेने परिपूर्ण असलेली अशी ही भाजी..
चला तर मग करुया *घेवडा भाजी*.. 💃 💕

दत्तगुरुची प्रिय घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)

#ccs

#week2

#cookpad_ची_शाळा

#घेवडा_भाजी

घेवड्याची भाजी म्हणजेच वालाच्या शेंगा...
ही भाजी माझ्या घरातील लोकांना म्हणजेच मुलींना आवडत नाही. पण हो आमच्या दोघांच्याही आवडीची बर का..😊
त्याच प्रमाणे श्री दत्तगुरु ची देखील प्रिय भाजी.. म्हणजेच घेवडा भाजी.. करायला सोपी झटपट होणारी पौष्टिकतेने परिपूर्ण असलेली अशी ही भाजी..
चला तर मग करुया *घेवडा भाजी*.. 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
4लोक
  1. २५० ग्राम वालाच्या शेंगा
  2. 1कांदा बारीक चिरलेला
  3. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  4. 5-6कढीपत्ताची पाने
  5. 1/2 टेबलस्पूनआले लसुण पेस्ट
  6. 1 टेबलस्पूनतिखट
  7. 1/2 टीस्पूनधनेपावडर, जिरापावडर, मोहरी, गोंडा मसाला
  8. 1/4 टीस्पूनहिंग
  9. चवीनुसारमीठ
  10. थोडीशी कोथिंबीर
  11. 1/4 कपतेल (४-५ टेबलस्पून)
  12. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम वालाच्या शेंगा तोडून घ्याव्यात. शेंगा तोडतांना खालचे टोक तोडून, दोन्ही बाजूच्या शिरा काढून घ्याव्यात व तुमच्या आवडीनुसार तुमच्या सोयीनुसार हव्या त्या आकारात या शेंगा तोडून घ्याव्यात. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावेत.
    तसेच भाजी साठी लागणारे सर्व साहित्य रेडी करून ठेवावे. म्हणजे कांदा, आलेलसूण पेस्ट, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

  2. 2

    पॅनमध्ये तेल गरम करावे. तेल गरम झाले की, त्यामध्ये मोहरी घालावी. मोहरी तडतडली की त्यामध्ये चिरलेला कांदा, आले लसूण पेस्ट, कढीपत्ता घालावा. अर्धा मिनिट होऊ द्यावे. त्यानंतर त्यात तिखट, हळद, धने पावडर, जीरे पावडर, हिंग घालून अर्धा सेकंद परतून घ्यावे.

  3. 3

    त्यानंतर यामध्ये तोडलेल्या शेंगा, चिरलेला टोमॅटो, मीठ घालावे. चांगले मिक्स करून पॅन वरती झाकण ठेवून, दोन मिनिटे वाफ काढून घ्यावी. नंतर त्यामध्ये किंचित पाणी घालावे. परत झाकण ठेवून पाच मिनिटे भाजी शिजवून घ्यावी. भाजी शिजली की त्यात गोंडा मसाला घालावा. मिक्स करून कोथिंबीर घालावी.

  4. 4

    तयार आहे आपली दत्तगुरु ची आवडती *घेवड्याची भाजी* म्हणजेच *वालाची भाजी* गरमागरम फुलक्यासोबत.. चपाती सोबत.. भाकरी सोबत सर्व्ह करावी.. 💃 💕

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes