मिक्स डाळीची आमटी (mix dalichi amti recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#HLR #हेल्थी रेसिपी चॅलेंज मिक्स डाळीची आमटी झटपट होणारी हेल्दी डिश आहे डाळी मधील अनेक चांगले घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात जे शरीरातील स्नायुंना बळकटी देतात डाळीं मध्ये झिंक तंतुमय पदार्थ शरीरात नैसर्गिकरीत्या तयार न होणारी अमिनो आम्लेही असतात. बद्धकोष्टता आतड्यातील हालचाली वाढतात अॅलर्जी वर पथ्यकारक ठरते. सी व के व्हि टॉमिन जस्त हृदय, मृत्रपिंड, मेंदु ह्या अवयवांचे रक्षण करायला मदत करतात. डाळीं मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. प्रतिकार शक्ति वाढते. कॅल्शियम मुळे नखे, दात मजबुत होतात. रक्तदाब नियंत्रणात राहातो. अशा बहुगुणी डाळींचीच रेसिपी आज आपण बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-२५ मिनिटे
२-३ जणांसाठी
  1. ५० ग्रॅम मिक्स डाळी(तुरडाळ, मुगडाळ, मसुरडाळ, सालाची उडिद व मुगडाळ)
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1 टीस्पूनमोहरी
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. 1 पिंचहिंग
  7. 1 टीस्पूनआललसुण पेस्ट
  8. चविनुसारमीठ
  9. 1 लहानगुळाचा खडा
  10. 1 टेबलस्पुनतेल
  11. १/८ टीस्पूनहळद
  12. 1 टीस्पूनतिखट
  13. 1-2 टेबलस्पुनकांदा लसुण मसाला

कुकिंग सूचना

२०-२५ मिनिटे
  1. 1

    मिक्स डाळींची आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य काढुन ठेवा नंतर मिक्स डाळी स्वच्छ धुवुन १/२ तास भिजत घाला. कांदा व टोमॅटो बारीक चिरून ठेवा

  2. 2

    छोट्या कुकरमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंगाची फोडणी करा नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकुन परता त्यातच आललसुण पेस्ट मिक्स करून परता कांदा गोल्डन होईपर्यंत नंतर त्यात हळद, तिखट, कांदा लसुण मसाला टाकुन परता नंतर त्यातच चिरलेले टोमॅटो टाकुन परता व २ मिनिटे झाकण ठेवुन शिजवा नंतर त्यात भिजवलेली मिक्स डाळ टाकुन परता चविनुसार मीठ व थोड़ा गुळ टाकुन गरम पाणी मिक्स करा व कुकरचे झाकण लावुन १-२ शिट्टया काढा आपली मिक्स डाळींची आमटी रेडी

  3. 3

    हेल्दी मिक्स डाळीची आमटी बाऊलमध्ये ओतुन सोबत वाफाळता भात किंवा पोळी भाकरी सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या (4)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
धन्यवाद चेतना, प्रांजल 🙏🙏

Similar Recipes