मेथीचे आळण (methiche alan recipe in marathi)

Rohini Jagtap Gade
Rohini Jagtap Gade @cook_20092993
Thane

#EB1
#week 1
हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यात मसत गरम गरम अस मेथीच आळण आणि मस्त ज्वारीची भाकरी खाण्याची मजा काही औरच असते.हिवाळ्यात मेथीची भाजी भरपूर प्रमाणात असते. तेव्हा एकच पद्धत वापरून केलेली मेथीची भाजी खाण्याचा आपल्याला कंटाळा येतो.म्हणून आज मी खानदेशी पद्धतीने मेथीच आळण केले आहे.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

20/25मिनिट
4 लोकांनसाठी
  1. 250 ग्रॅमचिरून मेथीची भाजी
  2. 4 टीस्पूनबेसनपीठ
  3. 150 ग्रॅमदही
  4. 4-5हिरवी मिरची
  5. 10-12 लसणाचा पाकळ्या
  6. 1/2 इंच आल
  7. थोडी कोथिंबीर
  8. 1/2 टीस्पून हळद
  9. चिमूटभर हिंग
  10. चवीनुसार मीठ
  11. 2-3 लाल मिरचा

कुकिंग सूचना

20/25मिनिट
  1. 1

    प्रथम मेथीची भाजी स्वच्छ निवडून,धुवून,बारीक चिरून घ्यावी

  2. 2

    नंतर एका मोठ्या वाटीत बेसनपीठ घेवून त्यामधे दही व 1/2ग्लास पाणी घालून पेस्ट करावी त्यामधे 1/2टीस्पून हळद व चवीनुसार मीठ घालावे,नंतर आल,लसूण,मीरची,कोथिंबीर मिक्सरमधून जाडसर बारीक करावे (मिरचीचा खरड्या प्रमाणे

  3. 3

    नंतर गॅसवर कढई ठेवून त्यात 2टीस्पून तेल घालावे,तेल गरम झाले की त्यात 1 टीस्पून जीरे घालावे जिर चांगल तडतडले की चिमूटभर हिंग व मिरचीचा खरडा घालून तेलात परतून घ्यावे व नंतर त्यामधे चिरून घेतलेली मेथीची भाजी घालून ती तेलात परतून घ्यावी

  4. 4

    नंतर 5मिनिट कढईवर झाकण ठेवावे

  5. 5

    5मिनटाने कढईवरील झाकण काढून त्यामधे दही व पाणी घालून तयार केलेली बेसनपीठाची पेस्ट घालून चमचाने व्यवस्थित हलवावे जेणेकरून पिठाचा गुठळ्या होणार नाहीत.नंतर त्यावर 7/8मिनट झाकण ठेवावे बेसनपीठाचा कच्चा वास जाईपर्यंत पीठ शिजवून घ्यावे(झाकण ठेल्या नंतर थोड्या थोड्या वेळाने भाजी हलवून घ्यावी जेणेकरून भाजी चिकणार नाही)

  6. 6

    7/8मिनटात बेसन पिठ शिजलेकी त्याला वसून तडका देणे तडका देण्यासाठी गॅसवर फोडणीचे भांड ठेवून त्यात तेल घालावे तेल गरम झाले की त्यामधे बारीक चिरलेला लसूण,2/3लाल मिरची व चिमूटभर हिग घालावे लसूण खपूस भाजला गेला की मग हा तडका भाजीवर घालून 2मिनट झाकण ठेवावे

  7. 7

    2मिनटाने झाकण काढावे अशा रितीने आपल मेथीचे आळण खाण्यासाठी तयार होते नंतर ने भाकरी बरोबर कींवा पोळी बरोबर सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

यांनी लिहिलेले

Rohini Jagtap Gade
Rohini Jagtap Gade @cook_20092993
रोजी
Thane

Similar Recipes