समोसा (Samosa recipe in marathi)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
Mumbai and Anand
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४०-४५ मिनीटे
४ जणांसाठी
  1. 1.5 कप मैदा
  2. 2 टेबलस्पूनडालडा किंवा वनस्पती तुप
  3. चिमुटभरओवा
  4. चवीनुसारमीठ
  5. पाणी
  6. तळण्यासाठी तेल
  7. स्टफिंग साहित्य:
  8. 4-5उकडलेले बटाटे
  9. 1/2 कपउकडलेले मटार
  10. 1/2 कप चिरलेला कांदा
  11. 1/4 कपचिरलेली कोथिंबीर
  12. 1/2लिंबाचा रस
  13. 1 टेबलस्पूनकाश्मिरी लाल मिरची पावडर
  14. 1 टीस्पूनधणे - जीरे पावडर
  15. 1/2 टीस्पूनजीरे
  16. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  17. 1/4 टीस्पूनहळद
  18. 1/4 टीस्पूनआमचूर पावडर
  19. 2 टेबलस्पूनतेल
  20. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

४०-४५ मिनीटे
  1. 1

    मैद्यामधे डालडा मिसळून, साधारण घट्टसर कणिक मळून घ्यावे आणि अर्धा तास झाकून ठेवावे.

  2. 2

    समोसा स्टफिंग बनवण्यासाठी:
    १. तेल गरम करुन त्यात जीरे व चिरलेला कांदा परतून घ्यावा.
    २. मग त्यात, मटार आणि पावडर मसाले घालून २-३ मिनीटे परतून घ्यावे.
    ३. आता त्यात उकडलेले बटाटे हाताने स्मॅश करुन मिसळावे.

  3. 3

    नंतर गॅस बारीक करुन २-३ मिनीटे झाकून बटाटे शिजवावे.
    मग गॅस बंद करुन त्यात लिंबू रस आणि कोथिंबीर मिक्स करुन मिश्रण थंड करावे.

  4. 4

    आता मळलेल्या कणकेच्या मैदा-कॉर्न फ्लोर पिठी घेऊन जाडसर पोळ्या लाटून मध्यभागी कापून ठेवाव्यात.

  5. 5

    खालील विडियो मध्ये दाखवल्याप्रमाणे स्टफिंग भरुन समोसे तयार करावे.

  6. 6

    कढईत तेल गरम करुन त्यात १ किंवा २ समोसे गोल्डन ब्राऊन तळावे आणि चटणी-सॉस सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Vartak Mohite
रोजी
Mumbai and Anand
Explore & Nurture the Creativity within you through Tasty Recipes 💃😋👍😋
पुढे वाचा

Similar Recipes