शेवग्याच्या शेंगांची चमचमीत आमटी (Shevgyachya shengachi amti recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

शेवग्याच्या शेंगांची चमचमीत आमटी (Shevgyachya shengachi amti recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३५ मिनिट
  1. 5शेवग्याच्या शेंगा
  2. 1बटाटा
  3. 2 टेबलस्पूनतेल
  4. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  5. 1/2 टिस्पून मोहरी
  6. 1/2 टिस्पून जीरे
  7. 1/4 टिस्पून हळद
  8. १/८ टिस्पून हिंग
  9. 1 टिस्पून तिखट
  10. 1 टिस्पून शेवभाजी मसाला
  11. मीठ चवीनुसार
  12. 2 टेबलस्पूनमसाल्याचे वाटण

कुकिंग सूचना

३५ मिनिट
  1. 1

    प्रथम शेंगा स्वच्छ धुऊन त्याचे पीसेस कट करून वाफवून घेतल्या.बटाटा पण वाफवून फोडी करून घेतल्या.

  2. 2

    आमटीच्या मसाल्यासाठी खोबरं, तीळ,खसखस, कांदा, आलं, लसूण, लाल मिरच्या, खडा मसाला सर्व परतून थंड करून पेस्ट करून घेतली. हि पेस्ट तेलावर चांगली परतून थंड करून टप्परवेअरमधे पॅक करून ठेवली. फ्रिजर मधे ठेवून १ महीनाभर पण वापरता येते. ह्याचे सर्व प्रमाण माझ्या पातोड्यांची आमटी ह्या रेसिपी तर आहे.

  3. 3

    आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, हिंग, हळद कढीपत्ता पुड घालून फोडणी केली. त्यात वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतले. नंतर तिखट, शेव भाजी मसाला, मीठ मीक्स करून गरम पाणी घालून उकळून घेतले.

  4. 4

    उकळी आल्यावर त्यात वाफवलेल्या शेवग्याच्या शेंगा, व वाफवलेल्या बटाट्याच्या फोडी घालून ३-४ मिनीटे उकळल्यावर गॅस बंद केला. थोडी कोथिंबीर घातली.

  5. 5

    तयार शेवग्याच्या शेंगांची मस्त चमचमीत टेस्टी आमटी बाऊलमधे काढून सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes