उपवासाचे बटाटेवडे (Upwasache Batatevade Recipe In Marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#UVR
उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाणे.मन व शरीर शुद्ध करणे.सर्व संस्कृतींमध्ये उपवासाचा रिवाज आहे.उपवास म्हणजे आपल्या पचनसंस्थेला एक दिवस विश्रांती देणं.हलका आहार,फळं,दही, ताक यांचा आहारात समावेश करणं.दररोज आपली चयापचय संस्था कार्य करुन थकते,तिला विश्राम म्हणून उपवास सांगितला आहे.पण आपल्याकडे होते उलटेच!एकतर अगदी कडक उपास करुन शरिरातील पित्तप्रकोप वाढवणे किंवा उपवासाचे पचनास अतिशय जड अशा पदार्थाचे सेवन करुन तब्येत बिघडवणे.या दोन्ही गोष्टी न करता दररोजसारखेच पण थोडे कमी खाणे हा उपास.पण.....असं काही होत नाही.थोडा अध्यात्मिक भाव जरी असला तरी उपासाचे छान छान पदार्थ खाण्याची गंमत निराळीच!!म्हणतात ना...एकादशी,दुप्पट खाशी!
खरंतर उपासाचे पदार्थ जाम भारी लागतात.😋कितीही खायचे नाही म्हणलं तरी साबुदाणा खिचडी,थालीपीठं, बटाट्याची भाजी,साबुदाणे वडे,किती नि काय...शिवाय हे अगदी चारीठाव,रेलचेल केले जातात.त्यावर एखादा ज्युस किंवा स्वीटडीश...😜
मला नेहमी उपवासाचं काहीतरी वेगळं करायला आवडतं.म्हणून आज केलेत उपवासाचे बटाटेवडे..आज चतुर्थी, दमल्याभागल्या जीवाला काहीतरी खमंग हवंच की हो!😄...मग केले उपवासाचे चमचमीत बटाटेवडे आणि चटणी...चला,बघा तुम्हीही चव घेऊन,जरा वेगळं काहीतरी...😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45मिनिटे
3व्यक्ती
  1. 6-7मध्यम आकाराचे बटाटे
  2. 2हिरव्या मिरच्या
  3. 1 इंचआलं
  4. 1 वाटीभाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
  5. 1.5 टीस्पूनमीठ
  6. 1 टीस्पूनसाखर
  7. 1/2लिंबाचा रस
  8. बटाटे वड्याचे आवरण :
  9. 1 कपउपास भाजणी पीठ
  10. 1 टीस्पूनलाल तिखट
  11. 1 टीस्पूनमीठ
  12. 1 टीस्पूनजीरे
  13. 1/4 टीस्पूनखायचा सोडा
  14. 1.5 कपपाणी पीठ भिजवण्यास
  15. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

45मिनिटे
  1. 1

    बटाटे उकडून घ्यावेत.वड्यासाठी लागणाऱ्या साहित्याची तयारी करावी.

  2. 2

    उकडलेले बटाटे किसून घ्यावेत.त्यात दाण्याचे कूट,मीठ,साखर,वाटलेली आलं-मिरची,लिंबाचा रस घालून वड्याचे सारण करावे.व हाताला थोडेसे पाणी लावून वडे थापून घ्यावेत.

  3. 3

    बटाटेवड्याच्या कव्हरसाठी/आवरणासाठी उपासाची भाजणी घ्यावी.त्यात तिखट,मीठ,जीरे व खायचा सोडा घालून पीठ थोडेसेच सैलसर भिजवावे.पीठात आता थापलेले वडे सगळीकडे पीठ लागेल असे बुडवावेत व काट्याच्या(फोर्कच्या)सहाय्याने तेलात अलगद सोडावेत.

  4. 4

    कढईत पुरेसे तेल घालून तेल कडकडीत तापवावे.मध्यम आचेवर वडे तेलात सोडावेत.व खरपूस तळून घ्यावेत.
    दाणे-ओले खोबरे, मिरची,मीठ,स खर,लिंबूरस घालून मिक्सरमध्ये चटणी करावी.

  5. 5

    उपासासाठी खमंग कुरकुरीत व गरमागरम बटाटेवड्याबरोबर चटणीसह सर्व्ह करावा.
    (वड्यात,चटणीत कोथिंबीर घालू शकता.... आज माझी संपली होती,त्यामुळे कोथिंबीर घातली नाहीये😊)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes