उपवासाचे कटलेट (upwasache cutlets recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

उपवासाचे कटलेट (upwasache cutlets recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 2उकडलेले बटाटे
  2. 2-3उकडलेले रताळे
  3. कोथिंबीर
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 1/2 टीस्पूनखिसलेले आले
  6. 1/2 टीस्पूनलिंबू रस
  7. 1/2 टीस्पूनसाखर
  8. 2 टीस्पूनलाल तिखट / हिरवी मिरची पेस्ट
  9. चवीनुसारमीठ
  10. 2 टेबलस्पूनसाबुदाणा पीठ
  11. 2-3 टेबलस्पूनशेंगदाणा कूट
  12. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    प्रथम बटाटे व रताळे उकडून घेणे. नंतर याचे साली काढून दोनीही एका प्लेट मध्ये खिसणीने खिसुन घेणे.

  2. 2

    आता या मध्ये चवीनुसार मीठ, लालतिखट किंवा मिरची पेस्ट घालावी. आता या मध्ये जीरे, थोडी साखर, लिंबू रस,2-3 चमचे शेंगदाणा कूट, कोथिंबीर,थोडे आले घालून घेणे.

  3. 3

    आता या मध्ये साबुदाणा पीठ घालून याचा गोळा करून घेणे. आता याचे छोटे छोटे गोल आकाराचे कटलेट थापून एका प्लेट मध्ये ठेवावे.

  4. 4

    आता गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये तळण्यासाठी तेल घालावे. तेल तापले कि हे बनवून घेतलेले कटलेट त्या तेला मध्ये सोडून सोनेरी रंगावर मध्यम आचेवर तळून घेणे.

  5. 5

    अशाप्रकारे सगळे कटलेट तयार करून घेणे. गरम गरम हे कटलेट दही किंवा चटणी सोबत सर्व्ह करू शकता. खूप छान टेस्टी असे हे उपवासचे कटलेट तयार होतात.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes