पुरी भाजी (Puri Bhaji Recipe In Marathi)

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
Satara

#DR2
#डिनर रेसिपी
# पुरी भाजी
रविवार म्हटलं की काहीतरी वेगळं मग काय आज डिनरला मस्त गरम गरम पुरी भाजीचा बेत. बेत खास कारण मी वाटण जे केला आहे. छान देशी पद्धतीने पाट्यावर वाटून केलेला आहे म्हणून त्याची टेस्ट अजून छान लागते आहे.

पुरी भाजी (Puri Bhaji Recipe In Marathi)

#DR2
#डिनर रेसिपी
# पुरी भाजी
रविवार म्हटलं की काहीतरी वेगळं मग काय आज डिनरला मस्त गरम गरम पुरी भाजीचा बेत. बेत खास कारण मी वाटण जे केला आहे. छान देशी पद्धतीने पाट्यावर वाटून केलेला आहे म्हणून त्याची टेस्ट अजून छान लागते आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मी.
२जणांसाठी
  1. 4उकडलेले बटाटे
  2. 1/2 वाटीमटाराचे दाणे
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. चिरलेली कोथिंबीर
  6. २ लसूण पाकळ्या
  7. 1हिरवी मिरची
  8. ४-५ कढिपत्ता
  9. 1 टिस्पून तिखट
  10. 1 टिस्पून गरम मसाला
  11. 1/4 टिस्पून हळद
  12. 1/2 टिस्पून मो‌हरी जीरे
  13. 1/4 टिस्पून हिंग
  14. 1 टेबल स्पूनतेल
  15. 1 वाटीकणीक
  16. 1/4 टिस्पून ओवा
  17. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

३० मी.
  1. 1

    सर्वप्रथम कांदा बारीक चिरून घ्या टोमॅटो चिरा, लसणाच्या पाकळ्या एका खलबत्त्यामध्ये कोथिंबीर कांदा कढीपत्ता हिरवी मिरची लसूण हे सर्व घालून अर्धवट वाटून घ्या.

  2. 2

    एका पॅनमध्ये तेल घालून राई हिंग जिरं घाला. त्यानंतर त्यात वाटलेलं सगळं वाटण घाला. हळद, तिखट, गरम मसाला घालून थोडे पाणी घाला आणि छान परतवून घ्या.

  3. 3

    आता कणीक मीठ,थोडं तेल,ओव घालुन भिजवून घ्या. दहा मिनिटे झाकून ठेवा. आता छान परतलेल्या रस्सामध्ये उकडलेला बटाटा, मटार घाला चवीनुसार मीठ घाला आणि छान दणदणीत भाजीला वाफ येऊ द्या.

  4. 4

    आता कणकेचा एक गोळा घ्या आणि त्याची एक मोठी पोळी लाटा. आणि छोट्या वाटीने छोट्या छोट्या पुऱ्या करून गरम गरम तेलात तळून घ्या. आणि सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
रोजी
Satara
Hay I am Deepali Dake Kulkarni by profession I am cosmetologist but cooking is my passion I love cooking I do cooking demo with Maharashrtha time also participated in all Marathi TV Chalel I also participated master chef season 1st
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes