टोमॅटो पुरी..(tomato puri recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#GA4 #Week12 की वर्ड- बेसन
पुरी आणि सणवार यांचं घट्ट कॉम्बिनेशन ..पण पुरीचं खासकरून गुढीपाडव्याशी भलतचं सूत जमलेलं आहे.. म्हणजे एखाद्या चालत आलेल्या परंपरेसारखचं.. हो ..उगाच ही परंपरा मोडायची माझ्यासारख्या खवैय्यीची अजिबात हिम्मत होत नाही हो 😜.. खाने वालों को खाने का बहाना चाहिये .. सोनेरी रंगावर तळलेली गोल गरगरीत गोलमटोल गरमागरम खुसखुशीत पुरी ..आहाहा..अगदी वीक पॉईंट हो सगळ्यांचा.😋 अशा या टम्म फुगलेल्या पुरीबरोबर बटाट्याची भाजी आणि केशर श्रीखंड करणे आणि त्यावर ताव मारणे म्हणजेच गुढीपाडवा असं मला आता कधीकधी वाटायला लागले..😜 या पुरीचा घरोबा तरी बघा कोणा बरोबर आहे ते.. शिरापुरी, बासुंदी पुरी, आलू रस्सा पुरी,तिखटमीठाची पुरी,मेथी पुरी, अग्गं बाई सासुबाई या सिरीयल मुळे स्टार वलय प्राप्त झालेले आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले भोपळं घारगे, गोडमिट्ट पाकातली पुरी.. अंगाखांद्यावर पाक मिरवणारी... नको नको अजून नाव नको घ्यायला. तोंडातून पाण्याची गंगा व्हायला लागली..😊.. अशा या गोल गरगरीत पुरीने आपले अवघे खाद्यजीवन व्यापून टाकून स्वतःमध्ये सामावून घेतले आहे.." ये दुनिया गोल है बाकी सब झोल है.. पुर्यांचा विषय खोल है'..😀.. रंगांचे अत्यंत आकर्षण असलेल्या माझ्यासारख्या बाईला पालक पुरी, बिटाची पुरी, टोमॅटो पुरी यांनी भूल घातली नाही तर नवलच.. म्हणून मग बेसन हा की वर्ड वापरून मी आज टोमॅटो पुरी केली आहे.. तळल्या तळल्या पुर्यांनी लचेच माना टाकू नयेत, टम्म फुगलेल्या राहाव्यात..जसा make up खूप वेळ टिकावा म्हणूनsilicon based makeup करतात अगदी तस्सचं (फोटोसाठी हो 😜.. आधी फोटोबा.. खूळ अपना अपना😜) म्हणून हा बेसनाचा प्रपंच.. चला तर मग हा प्रपंच कसा खमंग खुसखुशीत करायचा ते पाहू..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-50 मिनीटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 4 कपकणीक
  2. 1 कपबेसन
  3. 4टोमॅटोची प्युरी
  4. 1 टीस्पूनओवा
  5. 2 टीस्पूनतीळ
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 2 टेबलस्पूनरवा
  8. 2 टीस्पूनगरम मसाला
  9. 2 टीस्पूनधने पावडर
  10. 2 टीस्पूनकाश्मिरी लाल मिरची पावडर
  11. 3 टीस्पूनलाल तिखट
  12. मीठ चवीनुसार
  13. 2 टेबलस्पूनतेलाचे मोहन

कुकिंग सूचना

40-50 मिनीटे
  1. 1

    प्रथम टोमॅटो चे तुकडे करून मिक्सर मधून फिरवून त्याची प्युरी करून घ्या.प्युरी गाळून घ्या.

  2. 2

    आता कणकेमध्ये कडकडीत तेलाचे मोहन घाला.नंतर यात बेसन, रवा, हळद,तिखट, ओवा,तीळ,गरम मसाला, धने पावडर,काश्मिरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एकत्र करून हळूहळू टोमॅटो प्युरी घालत कणीक भिजवून घ्या. आपल्याला कणीक घट्ट भिजवायची आहे. आणि कणिक झाकून पंधरा ते वीस मिनिट ठेवा.

  3. 3

    नंतर कणकेच्या पुऱ्या लाटून घ्या.

  4. 4

    एका कढईत तेल गरम करून मिडीयम आचेवर सर्व पुऱ्या तळून घ्या. अशाप्रकारे आपल्या टोमॅटो पुर्‍या खाण्यास तयार.

  5. 5

    तयार झालेल्या टोमॅटो पुर्‍या टोमॅटो सॉस एखादी चटणी किंवा मिरचीचे लोणचे किंवा नुसत्याच चहा बरोबर खाण्यासाठी सर्व्ह करा.

  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes