शाही शेवई शिरा (Shahi Sevai Sheera Recipe In Marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#SWR स्वीट रेसिपी कूकस्नॅप यासाठी मी माधुरी शहा यांची शाही शेवई शिरा ही
रेसिपी करून बघितली.खूप छान झाला.
*शेवई जशी आपण घेऊ, त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण वाढवणे. मी येथे गणेश शेवई वापरलेली असल्यामुळे एकदम बारीक आहे.म्हणून 1कपच पाणी घातले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2-3 जणांसाठी
  1. 1 कपशेवया
  2. 1/2 कपसाखर
  3. 1.1/2 टेबलस्पून दूध पावडर
  4. 1 टेबलस्पूनओल्या नारळाचा चव
  5. 1 टीस्पूनवेलची पावडर
  6. 1 कपगरम पाणी
  7. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  8. काजू, बदाम, आक्रोड,पिस्ता काप व बेदाणे

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    गॅसवर पॅन तापत ठेवणे. त्यात तूप घालून गरम करणे. तू तापले की त्यात ड्रायफ्रूट्स घालून गुलाबीसर तळून घेणे. डीशमध्ये काढून घेणे.

  2. 2

    त्याच उरलेल्या तुपात बेदाणे व नारळाचा चव घालून परतून घेणे. नंतर शेवया घालून परतणे.

  3. 3

    शेवया परतून झाल्या की त्यात दूध पावडर घालून मिक्स करावे. गरम केलेले पाणी घालून शेवया शिजवून घेणे.

  4. 4

    5-6मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावे.शेवया शिजल्या की साखर घालून घेणे.परत झाकण ठेवून 5-6 मिनिटे शिजू द्यावे.

  5. 5

    साखरेचे पाणी आटले की, त्यात ड्रायफ्रूट्स व वेलची पूड घालून मिक्स करून घेणे. गॅस बंद करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes