मालवणी चिकन ग्रेव्ही आणि जिरा मसाला राईस

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#RJR
#रात्रीचे_जेवण_रेसिपीस
#मालवणी_चिकन_ग्रेव्ही_आणि_जिरा_मसाला_राईस
दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी रात्रीच्या जेवणामधे चमचमीत असा मेनू असला तर घरचे एकदम खुश होतात. म्हणून मी सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून दिले. छान मसाले वाटून मस्त चमचमीत तर्रीदार मालवणी चिकन ग्रेव्ही बरोबर जिरा मसाला राईस हे काॅम्बिनेशन मस्तच लागते. त्याची रेसिपी पुढे देत आहे.

मालवणी चिकन ग्रेव्ही आणि जिरा मसाला राईस

#RJR
#रात्रीचे_जेवण_रेसिपीस
#मालवणी_चिकन_ग्रेव्ही_आणि_जिरा_मसाला_राईस
दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी रात्रीच्या जेवणामधे चमचमीत असा मेनू असला तर घरचे एकदम खुश होतात. म्हणून मी सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून दिले. छान मसाले वाटून मस्त चमचमीत तर्रीदार मालवणी चिकन ग्रेव्ही बरोबर जिरा मसाला राईस हे काॅम्बिनेशन मस्तच लागते. त्याची रेसिपी पुढे देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. ७५० ग्रॅम चिकन
  2. 3कांदे
  3. १०० ग्रॅम सुकं खोबरं
  4. १०० ग्रॅम ओलं खोबरं
  5. 1 टीस्पूनआख्खे धणे
  6. 1/2 टीस्पूनजिरे
  7. 8मिरी दाणे
  8. 4लवंग
  9. 1 इंचदालचिनी तुकडा
  10. 2 टेबलस्पूनमालवणी मसाला
  11. 1 टीस्पूनहळद
  12. चवीनुसारमीठ
  13. तेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    चिकन स्वच्छ धुवून त्याला तिखट पूड, हळद, मालवणी मसाला, मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवावे.

  2. 2

    थोड्या तेलावर खडे मसाले आणि उभा चिरलेला कांदा, थोडी लसूण घालून चांगले परतून घ्यावे. मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.

  3. 3

    कुकर मधे तेल घालून त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा घालून परतून त्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालून जरा परतावे मग त्यात खोबर्याचे वाटण घालून पुन्हा जरा परतून त्यात चवीनुसार मीठ आणि ग्रेव्ही साठी हवे आहे तेवढे पाणी घालून मिक्स करून कुकरचे झाकण लावून पाच शिट्या काढून चिकन शिजवून घ्यावे.

  4. 4

    जिरा मसाला राईस बनवण्यासाठी तांदूळ धुवून घ्यावेत. फोडणीसाठी लहान कढईमधे दोन टीस्पून तूप घालून त्यात जिरे, मिरे, मसाला वेलची, लवंग घालून ती फोडणी तांदळात घालून मिक्स करावी आणि त्यात चवीनुसार मीठ व लिंबाचा रस घालावा.

  5. 5

    कुकरची एक शिटी काढून जिरा मसाला राईस शिजवून घ्यावा. एकदम झटपट हा राईस बनतो आणि चविला पण खूप मस्त लागतो.

  6. 6

    रात्रीच्या जेवणासाठी गरमागरम मालवणी चिकन ग्रेव्ही बरोबर गरमागरम वाफाळता जिरा मसाला राईस सर्व्ह करावा. हे काॅम्बिनेशन खायला खूप मस्त लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes