दही कढी पकोडा

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793

#lockdown recipe #goldenapron (week 10 ) दही आपल्याकडे नेहमी अवेलेबल असते त्यापासून आपण ही एक डिश बनवू शकतो

दही कढी पकोडा

#lockdown recipe #goldenapron (week 10 ) दही आपल्याकडे नेहमी अवेलेबल असते त्यापासून आपण ही एक डिश बनवू शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १/२ वाटी दही
  2. 2 टेबल स्पून बेसन पीठ
  3. चवीपुरते मीठ
  4. १ चमचा लसूण हिरवी मिरची पेस्ट
  5. १/२ टि स्पून हळद
  6. १,१/२ ग्लास पाणी
  7. 150 ग्रॅमपकोडा बनवण्यासाठी--- बेसन पीठ
  8. 2चिरलेले कांदे
  9. १ वाटी चिरलेली कोथिंबीर
  10. १ टिस्पून लसूण हिरवी मिरची पेस्ट
  11. १/२ टी स्पून जीरा
  12. १/२ टी स्पून ओवा
  13. गरजेनुसार मीठ
  14. तळण्यासाठी तेल
  15. १ टीस्पून तडका-------जीरा
  16. १ टीस्पून मोहरे
  17. ६-७ कढीपत्त्याची पाने
  18. अर्धा चिरलेला कांदा
  19. १/२ वाटी कोथंबीर
  20. ६-७ लसणाच्या पाकळ्या

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम एका पातेल्यामध्ये दही घ्या. नंतर त्यात बेसन पीठ, हिरवी मिरची पेस्ट, मीठ,आणि हळद टाकून चांगले मिक्स करून घ्या. एकपण गुठळी राहू देऊ नका.नंतर त्यात एक ग्लास पाणी टाका आणि मिक्स करा. आता हे गॅसवर मंद आचेवर ३-४ उकळी येईपर्यंत शिजवून द्या. जास्त घट्ट वाटल्यावर त्यात थोडेसे पाणी टाका. तयार आहे आपली कढी.

  2. 2

    एका बोल मध्ये चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची पेस्ट, बेसन पीठ,जिरे, ओवा,मीठ आणि थोडे पाणी टाकून मिक्स करून बेटर बनवून घ्या.आता याचे गोल गोल पकोडे तेलामध्ये तळून घ्या.आणी बाजूला ठेवा.

  3. 3

    कढईमध्ये थोडं तेल टाकून त्यात मोहरी टाका ती तडतडल्यावर त्यात लसून, कांदा टाका,हलकासा लालसर झाल्यावर त्यात जिरं,कढीपत्त्याची पाने टाका आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाका.

  4. 4

    हा गरम तडका आपल्या शिजलेल्या कढी वर टाका. एक मिनिटासाठी झाकण बंद करून ठेवा नंतर त्यात आपले बनलेले पकोडे टाकून मिक्स करून घ्या.हलवून घ्या.तयार आहे कढी पकोडा. गरम गरम भाताबरोबर ही कढी खायला खूप टेस्टी लागते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes