रंगीत गोड चिरोटे

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#cookpaddessert
चिरोटे हा भारताचा खुप पारंपरिक प्रकार आहे.त्याचेपाकाचे चिरोटे, खारे चिरोटे, तिखट मीठाचे चिरोटे व गोड चिरोटे असे प्रकार आहेत.चिरोटे हे अतिशय खुसखुशीत चविष्ट असतात.पण करायला कीचकट व पेशन्स खुप लागतात.त्याचे पापुद्रे सुटणं महत्त्वाचे असते.
ह्यात सजावट करतांना भारत व जपान ह्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे.
भारत व जपान दोन्ही देशांचे फ्लॅग व भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर व जपानचा शुभ मानला जाणारा पक्षी त्सुरू हे दोन्ही बनवून त्यांचा वापर केला.तसेच गुलाब पण बनवले आहे.
ह्यात पालक व टमाटा बीटचा वापर केल्यामुळे एक इनोव्हेटिव्ह डीश तयार झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. पालकाच्या लेअर साठी
  2. १०० ग्रॉम मैदा
  3. १/४ टीस्पून मीठ
  4. १ टेबल स्पून+१ टीस्पून तेल
  5. ३ टेबल स्पून पालकाची प्युरी
  6. १-२ थेंब रोझ इसेन्स
  7. केशराच्या लेअर साठी
  8. १०० ग्रॉम मैदा
  9. १/४ टीस्पून मीठ
  10. 3 टेबलस्पूनकेशराचे दुध
  11. 1 टेबलस्पून+ १ टीस्पून तेल
  12. 3टमाटा व बीटच्या लेअर साठी
  13. १०० ग्रॉम मैदा
  14. १/४ टीस्पून मीठ
  15. १ टेबलस्पून+ १ टीस्पून तेल
  16. ३ टेबल स्पून टमाटा बीटची प्युरी
  17. साठा बनवण्यासाठी
  18. ११/२ टेबलस्पून तुप
  19. ११/४ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर
  20. वरून भुरभुरण्यासाठी
  21. १/२ वाटी पिठीसाखर
  22. ६ १/२ किलो किंवा दिडपाव तुप तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम पालक ब्लांच करून थंड झाल्यावर त्याची पेस्ट करून घेतली.ती गाळून घेतली. एका बाऊल मध्ये मैदा, मीठ, तेल घेऊन चांगले हाताने मळून घेतले. ते रवाळ झाले पाहिजे.मग त्यात आवश्यकतेनुसार पालकाची पेस्ट घालून घट्टसर डो तयार करून घेतला.व पुड प्रोसेसरमधून काढून अर्धा तास झाकून ठेवला. पुड प्रोसेसरमधून काढल्यामुळे चिरोटे आरवारहोतात.

  2. 2

    आता वरीलप्रमाणेच एका बाऊल मध्ये मैदा, मीठ, तेल केशराचे दुध घेऊन त्याचप्रमाणे केशराचा डो तयार तयार करून झाकून ठेवला.

  3. 3

    टमाटा व बीटची वाफवून वरीलप्रमाणे पेस्ट करून त्याच पद्धतीने कृती करून डो तयार करून झाकून ठेवला. अशाप्रकारे तीनही गोळे तयार झाले.

  4. 4

    तुप व कॉर्न फ्लोअर चांगले फेटून त्याचा साठा बनवून घेतला.त्याचा थेंब पाण्यात टाकून तो वर तरंगला म्हणजे साठा एकदम हलका बरोबर झाला. आता तीनही गोळ्यांच्या पातळ पोळ्या लाटून घेतलेल्या.पालकाची पोळी घेवून तीला साटा लावून त्यावर केशराची पोळी ठेवून तीला साठा लावला. असेच टमाटा व बीटची पोळी साटा लावून ठेवून केले. आता त्याचा टाईट रोल मधे मधे साटा लावून केला व त्यांचे १ सेंटीमीटर चे पीसेस कट करून हातावर चपटे दाबले. आता त्यांचे चिरोटे लाटून तळून घेतले.

  5. 5

    चिरोटे लाटून तळून झाल्यावर लगेच वरून पीठी साखर गाळणीने घातली म्हणजे त्याला गोडी चांगली येते. व ह्या पीठा पासून दोन्ही फ्लॅग व गुलाबाची फुलं बनवून घेतली.चिरोटे साखरेच्या गोळीबंद पाकाने कुकीज स्टीकला चिटकवून मग त्सुरू पक्षात रचले व डीशमधे पण सजवले.व बाकीची सजावट करून छान प्रेझेंटेशन केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes