मिरची वडा - पावसाळा स्पेशल (mirachi wada recipe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#रेसिपीबुक #week5
पावसाळा
ह्या राजस्थानी पदार्थामध्ये भावनगरी मिरची मध्ये उकडलेल्या बटाट्याचे सारण भरून मिरच्या बेसनाच्या पिठात बुडवून तळतात. भावनगरी मिरच्या कमी तिखट असतात आणि बटाट्याच्या सारणामुळे तिखटपणा आणखी कमी होतो. खूप चमचमीत असा नाश्त्याचा प्रकार आहे. आता पावसाचे दिवस आहेतच . बाहेर छान पाऊस पडत असताना गरम गरम मिरची वडे आणि चहाचा बेत नक्कीच करा ह्या पावसाळ्यात.

मिरची वडा - पावसाळा स्पेशल (mirachi wada recipe in marathi)

#रेसिपीबुक #week5
पावसाळा
ह्या राजस्थानी पदार्थामध्ये भावनगरी मिरची मध्ये उकडलेल्या बटाट्याचे सारण भरून मिरच्या बेसनाच्या पिठात बुडवून तळतात. भावनगरी मिरच्या कमी तिखट असतात आणि बटाट्याच्या सारणामुळे तिखटपणा आणखी कमी होतो. खूप चमचमीत असा नाश्त्याचा प्रकार आहे. आता पावसाचे दिवस आहेतच . बाहेर छान पाऊस पडत असताना गरम गरम मिरची वडे आणि चहाचा बेत नक्कीच करा ह्या पावसाळ्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. ८-१०भावनगरी मिरच्या
  2. ६-७ मध्यमउकडलेले बटाटे
  3. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  4. 1/2 टीस्पूनजिरे पूड
  5. 1/2 टीस्पूनधने पूड
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1/2 टीस्पूनआमचूर
  8. 1 चमचाचिरलेली कोथिंबीर
  9. चवीनुसारमीठ
  10. २ टीस्पून तेल आणि तळण्याकरता
  11. बाहेरील आवरणासाठी
  12. 6 टेबलस्पूनबेसन
  13. 2 टेबलस्पूनतांदूळ पीठ
  14. 1/4 टीस्पूनलाल तिखट
  15. 1/4 टीस्पूनहळद
  16. 1/4 टीस्पूनओवा
  17. 2 चिमूटहिंग
  18. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    मिरच्या धुवून सुकवून घ्या. देठं काढू नका. प्रत्येक मिरचीला एका बाजूने उभी चीर द्या. पूर्ण कापू नका.

  2. 2

    हलक्या हाताने मिरचीच्या शीरा आणि बिया काढून टाका. हे करताना शक्यतो हातात ग्लोव्हज किंवा प्लास्टिक पिशवी घाला. नाहीतर नंतर हाताची आग होईल.

  3. 3

    बटाटे साले काढून कुस्करून घ्या.

  4. 4

    एका कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात हळद घाला.

  5. 5

    बटाट्याचा कुस्करा, लाल तिखट,धने, जिरे पूड, आमचूर, मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करा. चांगले मिक्स झाले की मिश्रण एका ताटलीत काढून गार करायला ठेवा.

  6. 6

    हे मिश्रण प्रत्येक मिरचीमध्ये भरा. मिरची तुटू देऊ नका.

  7. 7

    बाहेरील आवरणासाठी एका वाडग्यात बेसन आणि बाकी सर्व पदार्थ एकत्र करा. पाणी घालून जाडसर पीठ भिजवून घ्या. नेहमीच्या भज्यांच्या पिठापेक्षा जाड हवे.

  8. 8

    एका कढईत तळण्यासाठी तेल गरम करा. २ चमचे कडकडीत तेल बेसनाच्या पिठात घालून मिक्स करा.

  9. 9

    आता मिरची ह्या बेसनाच्या पिठात बुडवून तेलात सोडा. आणि खमंग तळून घ्या.

  10. 10

    गरमागरम मिरची वडा वर चाट मसाला भुरभुरवून खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes