बेसन भारवा मसाला रोटी (besan bharwa masala roti recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#GA4
#week25
बेसन ची ही भरवा रोटी माझ्या आई च्या हाताची स्पेशल डिश आहे जेव्हा आम्ही बहिणी माहेरी आलो कि तेव्हा आई हि भरवा रोटी बनवत असते. साधारणता ही रोटी नाश्ता म्हणून बनवली जात असते. नाश्ता जर हेल्दी असेल तर पूर्ण दिवस आपल्याला एनर्जी मिळते. नाश्ता म्हटला की साउथ मध्ये इडली-वडा डोसा हे बनवले जाते, महाराष्ट्र मध्ये पोहा, मिसळपाव, बनवले जाते आणि नॉर्थ मध्ये पराठे बनवले जातात पण मी आज भरवा बेसन रोटी बनवली आहे ती राजस्थानची स्पेशलनाश्ता डिश आहे. काही कारणास्त मी माझ्या माहेरी आली होती , आणि माझ्या आईने रोटी बनवली मसाला रोटी खाऊन मी खूपच खुश होऊन गेली कारण बऱ्याच दिवसानंतर माझ्या आईच्या हाताच मला काहीतरी खायला मिळाले होतो. आणि तीच रेसिपी आज मी इथे सेंड केली आहे , सिंपल झटपट होणारी आणि कमी इन्ग्रेडियंट मध्ये पोटभर नाश्ता होईल अशीही डिश आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
5 व्यक्ती
  1. 1 कपबारीक बेसन
  2. 2 टेबलस्पूनतेल
  3. 1/4 टीस्पूनहळद
  4. चिमुटभरहिंग
  5. चवीनुसारमीठ
  6. 1/2 टीस्पूनधने-जिरेपूड
  7. 1/2 टीस्पूनजिर
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1/2 टीस्पूनओवा
  10. कणिक तयार करण्यासाठी
  11. 2 कपगव्हाचे पीठ
  12. चवीनुसारमीठ
  13. 2 टेबलस्पूनतेल
  14. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम एका ताटामध्ये बेसन पीठ घ्या त्यामध्ये ओवा, जीरे, मीठ,लाल तिखट, हिंग, हळद, धने जीरे पूड,मीठ, सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आवश्‍यकतेनुसार थोडे पाणी टाकून मध्यम पीठ बांधून घ्या.

  2. 2

    त्याचप्रमाणे गव्हाच्या पिठापासून कणिक तयार करून घ्या.

  3. 3

    बेसनच जे मसाला तयार केला आहे, त्या पिठाचे लहान लहान गोळे तयार करून ठेवा.

  4. 4

    छोटीशी पोळी लाटून मध्यभागी बेसन चा मसाला ठेवून फोल्ड करून घ्या.

  5. 5

    त्यानंतर पुन्हा त्या पोळीला हलक्या हाताने लाटून घ्या, तवा गरम झाल्यावर

  6. 6

    बेसन मसाला रोटीला दोन्ही बाजूने आपली तेल टाकून व्यवस्थित गोल्डन ब्राऊन शेकून घ्या.

  7. 7

    मस्त,यम्मी अशी बेसन भरवा मसाला रोटी तयार आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा या रोटी सोबत दही, लोणचं, लसणाची चटणी, हिरवी चटणी,शेंगदाण्याची चटणी कशा सोबत पण तुम्ही खाऊ शकतात.. पण मलाही रोटी असंच खायला आवडते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

Similar Recipes