कोबीची भजी चकली भाजणी वापरून (kobichi bhaji recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

कोबीची भजी चकली भाजणी वापरून (kobichi bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 150 ग्रॅम कोबी साधारण
  2. 2कांदे
  3. 3 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  4. 2 टेबलस्पूनआलं लसूण मिरची ठेचा
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनतिखट
  7. 1/2 टीस्पूनओवा
  8. 1 टीस्पूनधने पावडर
  9. 1/2 कपचकली भाजणी
  10. 1/4 कपचण्याचे पीठ
  11. 2 टेबलस्पूनतांदळाच पीठ
  12. चवीनुसारमीठ
  13. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    मध्यम आकाराच्या कोबीचा अर्धा भाग वापरला आहे... कोबी, कांदा, कोथिंबीर आणि ठेचा मिसळून घ्या... मग त्यात ओवा, धने पावडर, हळद आणि तिखट घाला...

  2. 2

    तांदळाचं पीठ, चकलीची भाजणी आणि बेसन घालून व्यवस्थित मिसळून घ्या... कॉन्टिटी चा अंदाज घेऊन चवीनुसार मीठ ऍड करा... साखर ॲड करणे ऑप्शन आहे, मी अर्धा टी स्पून साखर घातली...

  3. 3

    मी वापरलेला कोबी फ्रोजन असल्यामुळे त्याला बऱ्यापैकी पाणी सुटला... तुम्ही ताजा कोबी वापरत असाल तर आवश्यकता वाटली तर थोडा पाणी घाला... सर्व मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्या...

  4. 4

    मध्यम आचेवर छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या...

  5. 5

    आपली भजी तयार आहे... गरमागरम चहा जोडी ला आस्वाद घ्या...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes