उकडीचे डांगर (तांदुळाचे) (ukadiche dangar recipe in marathi)

#bfr
हा पदार्थ मी लग्नानंतर माझ्या सासूबाईंकडून शिकले. अलिबाग-पेण या भागात हा पदार्थ नाष्ट्यासाठी म्हणून केला जातो. उकडलेले डांगर कुटून त्याचे पापड ही करतात पण सकाळच्या वेळात नाष्टा म्हणून हा पदार्थ जास्त लोकप्रिय आहे.
उकडीचे डांगर (तांदुळाचे) (ukadiche dangar recipe in marathi)
#bfr
हा पदार्थ मी लग्नानंतर माझ्या सासूबाईंकडून शिकले. अलिबाग-पेण या भागात हा पदार्थ नाष्ट्यासाठी म्हणून केला जातो. उकडलेले डांगर कुटून त्याचे पापड ही करतात पण सकाळच्या वेळात नाष्टा म्हणून हा पदार्थ जास्त लोकप्रिय आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदुळाचे पिठ आणि ताक यांचे मिश्रण करून घ्यावे आणि गरजेनुसार त्यात पाणी घालून पिठ भिजवावे. पिठ अतिशय घट्ट ही नसावे अथवा पातळ ही नसावे. साधारण इडलीच्या पिठाप्रमाणे असावे. हे पिठ भिजवून झाले की साधारण 6 ते 7 तास झाकून आंबवण्यासाठी ठेवावे. (ताकाच्या आंबट पणावर आणि हवामानानुसार आपण वेळ कमी जास्त करू शकता).
- 2
काही तासांनी पिठ आंबून फुगलेले दिसेल त्यानंतर त्यात 2 चमचे तिखट, चिमुटभर हिंग, चमचाभर जीरे पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून ते पिठ थोडेसे फेटून घ्यावे. (तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करावे कारण उकडवून झाले की तिखटपणा कमी होतो)
- 3
आता गॅसवर स्टीमर ठेवून त्यात केळीचे पान अथवा मलमलचे कापड ठेवून त्यात तयार मिश्रण गोलाकार आकारात थोडेसे ओतून 10 ते 12 मिनिटे उकडवण्यासाठी झाकून ठेवावे. 10 मिनिटांनी ते उकडले की गरमागरम सर्व्ह करावे हे डांगर नुसतेच खायला छान लागते पण तेल लावून खाल्ले तर त्याची लज्जत अजुन वाढते.
टीप - स्टीमर ऐवजी इडली पात्रात इडली प्रमाणे देखील उकडवू शकता.
फुलण्यासाठी सोडा किंवा इनोचा वापर करू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तांदुळाचा पिठाची उकड (tandoocha pithachi ukad recipe in marathi)
#कोकणही उकड अगदी झटपट होते व पोट पण पटकन भरते. हा एक हेलदी नाश्ता आहे. हा नाश्ता प्रामुख्याने कोकणात केला जातो. लागतो पण छान खूप. लहान मुले व वयोवृद्ध पण आनंदाने हा नाश्ता एन्जॉय करतात.चला आज ही रेसिपी बघू Sampada Shrungarpure -
नैवेद्य उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#नैवेद्य#पोस्ट 2आज कोकणची खासियत ...उकडीचे मोदक केले.हा पदार्थ शिकण्यासाठी जास्त मेहनत नाही...फक्त हा पदार्थ खाण्याची आवड हवी. 😀😀 आणि मला हा पदार्थ करायला जास्त आवडते...खुप छान वाटते त्या पारीची वाटी करून त्यात सारण भरून त्याची पाकळी करून मोदक करायला...जणू एखाद्या नवजात बालकाला कुरवाळत आहे..❤❤त्याचे लाड करत आहे. Shubhangee Kumbhar -
ताकातलं पीठ (takatla pithla recipe in marathi)
#ताकातलं पीठहा कोकणातला एक पारंपारिक पदार्थ आहे. आयत्या वेळी झटपट होणारा. केव्हाही भूक लागली तर पटकन होणारा. ताकातलं पीठ हे जास्ती करून महिला वर्गांना आवडत असे. मला आणि माझ्या मुलींनाही खुप आवडते. Shama Mangale -
कांदेपोहे (Kandepohe recipe in marathi)
पोहे हा महाराष्ट्रीयन पदार्थ भारतामध्ये सकाळच्या नाश्त्या मधला लोकप्रिय पदार्थ असून सोपा आणि कमी वेळात होणारा नाश्ता आहे. Nishigandha More -
-
दिलवालो का खमन ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#heartव्हॅलेंटाईन वीक चालू आहे हार्ट या आकाराचे खमण ढोकळे तयार केले आहे हिंदीत एक म्हण आहे 'दिल का रास्ता पेठ से होके गुजरता है' माझ्या लग्नानंतर या म्हणीचा अर्थ मला कळला आणि मला फॅमिली ही अशी मिळाली तिथे दिल का रस्ता खरच पोटा पासूनच होता खाण्याची खूप आवड असणारी फॅमिलीं असल्यामुळें माझ्या कूकींग च्या आवडीला अजून उत्साहा मिळाला माझ्या फॅमिलीत सर्वात जास्त ढोकळा हा पदार्थ खूपच आवडीने खाल्ला जातो. सर्वांच्याच खूप आवडीचा पदार्थ आहे त्यामुळे मी व्हॅलेंटाईन स्पेशल मध्ये ही डिश निवडली आणि तयार केली तसे प्रेम व्यक्त करण्यासाठी कुकिंग ही खूपच छान कला आहे याने खरंच मन जिंकता येते . आपल्यासाठी प्रेम व्यक्त करण्यासाठी बारा महिने , प्रत्येक दिवस आपण प्रेम व्यक्त करत असतो . आपल्यावर कोणी प्रेम करो किंवा ना करो तरी आपण तितक्याच प्रेमाने प्रत्येकासाठी जेवण तयार करून हसतमुखाने आपले प्रेम व्यक्त करत असतो. खमण ढोकळा ची हार्ट शेपमध्ये फॅमिली तयार केली मोठ्याहार्ट पासून स्मॉल हार्ट शेप चे ढोकळे तयार केले . आपण म्हणतो ना मोठा जिवाचा माणूस मोठा दिलवाला ज्याचे मन छोटा असतो त्याला आपण म्हणतो छोट्या जीवाचा असेच हे हार्ट शेप आहे आपल्या मनासारखे थोडे खट्टे ,मीठे ,तिखट ,असे हे हार्ट शेप ढोकळे आहे❤️❤️💕 अशाप्रकारे हे खमण ढोकळे फॅमिली तयार केली नक्कीच बघा Chetana Bhojak -
रसिया मुठिया (Rasiya Muthia Recipe In Marathi)
#LORरसिया मुठिया हा गुजराती प्रकार आहे हा उरलेल्या भाता पासून तयार केला जातो बऱ्याच दा हा प्रकार रात्रीच्या जेवणातून घेतला जातो म्हणून सकाळीच भात जास्त लावला जातो त्या भाता चा वापर करून रात्रीच्या जेवणातून रसिया मुठिया हा प्रकार तयार करतात.खायला एकदम चविष्ट लागतो हा प्रकार शिवाय खूप पौष्टिकही आहे.मी पण सकाळच्या उरलेल्या भाताचा हा प्रकार केला आहे हा प्रकार उरलेल्या भाता पासून तयार केला तरच खूप छान तयार होतो. मी ही रेसिपी माझ्या गुजराती फ्रेंड 'ज्योती वसानी' कडून शिकली आहे ती नेहमी मला खाण्यासाठी रसिया मुठिया द्यायची तिच्याकडून मीही रेसिपी शिकून घेतली माझ्या घरात मलाच हा प्रकार जास्त आवडतो मी आवडीने हा प्रकार खाते रात्रीचे जेवणातून घ्यायला अगदी परफेक्ट असा प्रकार आहे'रसिया मुठिया' म्हणजे रस्सा तयार करून मुठिया तयार केला जातो.तुमचाही भात जर उरला तर हा प्रकार एकदा ट्राय करून बघा. Chetana Bhojak -
तांदूळ पिठाची उकड (tandul pithachi ukad recipe in marathi)
#KS1# कोकण रेसिपी#तांदूळ पिठाची उकड कोकणातील पारंपारिक हा पदार्थ नाष्ट्यासाठी बनवला जातो. खूप पौष्टिक अशी ही उकड खूप चवदार लागते.करायला सोपी आणि झटपट होते. Rupali Atre - deshpande -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
#UVR उपवास स्पेशल मध्ये संकष्टी चतुर्थी चा उपवास सोडताना गोड पदार्थ म्हणून, आणि माझ्या घरी सर्वांना आवडतात असे, व गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजेच उकडीचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पोह्याचे मुटकुळे (pohyanche mutkule recipe in marathi)
ks7लॉस्ट रेसिपी ऑफ महाराष्ट्र हि थीम यावेळची असल्यामुळे डोळ्यासमोर एक पदार्था आला . माझी आत्या करायची पण हा पदार्थ आता लोकं विसरून गेलेले आहे मला पण या थीम मुळे हा पदार्थ आठवला. लहानपणी खूप खायची पण आता कोणी हे करत मला तरी वाटत नाही. चला तर मग बघूया हा आगळावेगळा झटपट होणारा पोह्याचा एक पदार्थ. Deepali dake Kulkarni -
तांदूळ पीठाची उकड (tandul pithichi ukad recipe in marathi)
#bfr#breakfast_recipes_challenge..#तांदूळ_पीठाची_उकड...😋😋 तांदूळ पीठाची ताक घालून केलेली उकड म्हणजे breakfast साठी उत्तम पर्याय...मस्त चटपटीत आणि पोटभरीचा..😍..त्यामुळे घरी ताक केले की ही उकड हमखास करते मी..अतिशय,साधा,सोपा, झटपट होणारा आणि तामझाम नसलेला हा पदार्थ ...सकाळच्या घाईगडबडीत वेळ वाचवणारा ..नोकरदार मैत्रिणींचा तर हमखास हुकमाचा एक्का..😀 चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
तांदुळाचे उकडीचे मोदक (tandalache ukadiche modak recipe in marathi)
#26🙏🎉🇮🇳भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपणांस सर्वाना 🇮🇳🎉🙏स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं.हे आपलं आद्यकर्तव्य आहे.आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आणि मंगळवार पण आहे आज या निमित्ताने गणपती बाप्पांसाठी #तांदुळाचे__उकडीचे__मोदक बनवले आहेत.. Archana Ingale -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकघरोघरी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व बाप्पाचा आवडता मोदकही करतातमी पण आज तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक केले चला तुम्हाला दाखवते. Chhaya Paradhi -
गडगीळं (Jaggery Sticks) (gadgil recipe in marathi)
#ks5ग्रामीण भागात मिळणार्या गोड शेवेसारखा हा पदार्थ आहे. कणीक, साजुक तूप व गुळ वापरून केला जातो असा हा पौष्टिक पदार्थ. काही भागात हा पदार्थ साखर वापरून ही करतात पण मुळ पारंपरिक पद्धतीने गुळ वापरूनच केला जातो..लहान मुलांच्या संध्याकाळच्या भुकेसाठी असा हा छान ऑप्शन आहे. प्रवासाला जाताना सोबत नेण्यासाठी पण चांगला पर्याय आहे, ४-५ दिवस टिकतात ही गडगीळं. आजकालची पिढी अशा पदार्थांना नाकं मूरडते पण हे हेल्दी ऑप्शन आपण केले पाहिजेत. माझ्या मुलांनी आवडीने खावे ह्यासाठी मी ह्याचे आधुनिक नामकरण केले आहे ते म्हणजे 'जॅगरी स्टिक्स'. असा हा मराठवाड्यातील हेल्दी गोड पदार्थ..... Shilpa Pankaj Desai -
गुजराती खट्टा ढोकला (khatta dhokla recipe in marathi)
#bfr#dhokla#ढोकळा#snacksगुजराती लोकांचा फेमस 'नाश्तो'ढोकळा हा गुजरातचा फेमस असा नाश्त्याचा प्रकारहा ढोकळा सगळ्यांच्याच आवडीचा असा हा प्रकार आहे शिवाय हा हेल्दी असा प्रकार आहे सकाळी नाश्त्यातून घेतला तर हेवी असा नाश्ता होतो आणि शरीरासाठीही पौष्टिक आहे. गुजराती कम्युनिटीत 'नाश्तो 'हा खूप महत्त्वाचा भाग आहे. या कम्युनिटीमध्ये जेवणा बरोबरही स्नेक हा प्रकार वाढला जातो सकाळी स्नॅक्स, जेवणात , संध्याकाळी स्नॅक्स हा प्रकार लागतोचअसा हा खट्टा ढोकळा आपल्याला प्रत्येक हलवाई च्या दुकानात तुम्हाला बघायला मिळेल आता घरी कशा प्रकारे तयार करायचा रेसिपी तून नक्कीच बघा हा ढोकळ्याचा प्रकार मी माझ्या गुजराती फ्रेंड करून शिकलेला आहे परफेक्ट असा ढोकळा आहे चवीला जबरदस्त असा लागतो. Chetana Bhojak -
आंबील (ambil recipe in marathi)
#रेसिपीबुक week2 ... लातूर भागात आंबील हे खूप लोकप्रिय, प्रसिद्ध आहे. दर्श वेळ अमावस्येला हे खास करून बनवले जाते. ह्या दिवशी शेतात पूजा करता तेव्हा आंबील, भज्जी, खीर, वरण भात हे प्रसाद म्हणून बनवले जाते. शेतातच कोपीची पूजा करून सर्वजण शेतात जेवण करतात. Jyoti Kinkar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
उकडीचे मोदकमोदक हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रत्येक घरात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चौथ्या तिथीला म्हणजेच गणेश चतुर्थीला गणेशाची मूर्ती स्थापन करून गणपती बाप्पाला मोदक प्रसाद म्हणून बनवण्याची पद्धत आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला सुद्धा गणेशासाठी प्रसाद म्हणून मोदक बनवले जातात.#KS1 महाराष्ट्राचे Kitchen स्टार चॅलेंज - थीम : कोकण साठी मी हि तिसरी पाककृती पोस्ट करत आहे. :) सुप्रिया घुडे -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रबाप्पाचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. मोदक हा गोड पदार्थ अतिशय लोकप्रिय आहे. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी विशेषतः उकडीचे मोदक (Ukadiche Modak) केले जातात. गणेशोत्सवादरम्यान घराघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार केले जातील. आता मिठाईच्या दुकानांमध्येही कित्येक प्रकारचे मोदक उपलब्ध असतात.पण या मोदकांऐवजी घरामध्ये केलेले उकडीच्याच मोदकांचे सेवन करावे. उकडीचे मोदक चवीला स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर देखील असतात. उकडीचे मोदक तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी सामग्री आपल्या शरीरासाठी पोषक आणि फायदेशीर असते. तांदळाचे पीठ आपल्या आरोग्यासह त्वचेसाठीही लाभदायक आहे. तांदळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे.महत्त्वाचे म्हणजे तांदळामध्ये ग्लुटेन नावाचे प्रोटीन नसते त्यामुळे तांदळाच पीठ पचायला हलके. गुळाच्या सेवनामुळे शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि खनिजांचा पुरवठा होतो. स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. वेलचीमध्ये लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम, सल्फर आणि मॅग्नेशिअमयासारख्या खनिजांचा साठा आहे. मोदकामधील सर्वात महत्त्वाची सामग्री म्हणजे खोबरे. ओल्या नारळाच्या खोबऱ्यापासून मोदकाचे सारण तयार केलं जाते. ओल्या नारळाच्या खोबऱ्यामुळे जेवण पचण्यास मदत मिळते. यामध्ये अँटी व्हायरल, अँटी फंगल, अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी पॅरासायटिक गुणधर्म आहेत. तुपाचे आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक देखील लाभ आहेत. मग हे सर्व गुणधर्म असलेले हे मोदक मी तुमच्यासाठी आज बनले आहेत Sneha Barapatre -
कापण्या (kapnya recipe in marathi)
आषाढ महिन्यात सागंली सातारा भागात आषाढ तळणे हा प्रकार केला जातो मग कोणी कापण्या,चकल्या तिखट पुर्या असे पदार्थ बनवले जातात. चला तर मग आज आपण कापण्या बनवूयात.या कापण्या खुसखुशीत असतात. शंकरपाळीची मोठी बहीण म्हटले तरी चालेल. Supriya Devkar -
-
सुरळी वडी (survi vadi recipe in marathi)
#wdमाझ्या आईचा आवडीचा पदार्थ म्हणजे सुरळी वडी.हा पदार्थ बनवायला मी माझ्या आई कडूनच अगदी सोप्या पद्धतीने शिकले . ही पाककृती मी माझ्या आयुष्यातील खास व महत्त्वाची व्यक्ती ,जिच्यामुळे माझे आज माझे अस्तित्व आहे अश्या माझ्या प्रिय आईला समर्पित करते. आज काल आपण जेवणाची सुरवात काही स्टार्टर ने करतो पुर्वी असं काही नाव न्हवते पण ही सुरळीची वडी तेच स्टार्टर चे काम करायची, घरी उपलब्ध साहित्यामधून कमी घटक पदार्थ वापरून करता येणारी पाककृती. मग ती स्टार्टर म्हणून पण चालायची,नाष्टा म्हणून पण चालायची अशी ही माझ्या आईच्या आवडीची खमंग व स्वादिष्ट सुरळीची वडी एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची ते आपण पाहू. Pooja Katake Vyas -
-
मेथी थेपला हेवी ब्रेकफास्ट (methi thepla recipe in marathi)
#bfr morning breakfast:आमच्या घरात सर्वांना सकाळच्या नाश्त्याला मेथी ठेपला नाष्टा फार आवडतो.मी त्या सोबत बटाटा भाजी,दही, टोमॅटो केचप ,लसूण चटणी खायला घेतो . म मी मेथी ठेपला बनवून दाखवते. Varsha S M -
मेथी पावभाजी खाकरा (methi pavbhaji khakhra recipe in marathi)
# पश्चिम#गुजरात # पश्चिम# गुजरात# मेथी पावभाजी खाकरापश्चिम भारतात विविध प्रकारच्या पाककृती आहेत.आज मी गुजरात मधील लोकप्रिय असलेला मेथी खाकरा हा कुरकुरीत आणि टिकावू पदार्थ करत आहे.भारता मध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये निरनिराळे पदार्थ लोकप्रिय. आहेत आमच्या शेजारी खूप गुजराथी लोक राहतात. त्यांना रेसिपी विचारून मी आज पहिल्यांदाच मेथी खाकरा हा पदार्थ केला आहे. बिना तेलाचा हा पदार्थ पौष्टिक,आणि टिकावू आणि हेल्दी नाष्टा आहे.प्रवासामध्ये पण नेता येतो .दहा पंधरा दिवस हा पदार्थ खराब होत नाही. गुजराथी लोकांचा ऑल टाईम फेवरेट नाष्टा आहे. rucha dachewar -
पालक कढी (palak kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी#फोटोग्राफी ल्कासहोमवर्ककढी हा आपल्या पानातील उजव्या बाजूचा पदार्थ मानला जातो .आज मी पारंपरिक कढी न बनवता थोडा वेगळा प्रकार केला. Jyoti Chandratre -
नाचणीचे आंबिल (nachniche ambil recipe in marathi)
#KS1 #कोकण रेसिपीज कोकणातील तांदळाबरोबरच टिकणारी एक प्रमुख पीक म्हणजे नाचणी.. नाचणी अतिशय थंड गुणधर्माची असल्याने उन्हाळ्यामध्ये विशेष करून त्याचा जास्त उपयोग केला जातो.. या नाचणीपासून कोकणामध्ये मुख्यत: भाकरी नाचणीची खीर नाचणीचे आंबील नाचणीचे लाडू वड्या इत्यादी पदार्थ आवर्जून केले जातात आणि आपल्या शरीरामध्ये थंडावा कायम टिकावा उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून हे पदार्थ घरोघरी केले जातात..चला तर मग आपण पण beat the heat करण्यासाठी नाचणीची आंबिल कशी करायची ते बघू.. Bhagyashree Lele -
मिक्स पिठाचे थालीपीठ (Mix Pithache Thalipeeth Recipe In Marathi)
#BPRथालीपीठ हा सर्वात पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार आहे ना त्यातून थालीपीठ घेतली तर जेवणाची जास्त गरज पडत नाही त्यात मी तयार केलेले थालिपीठे म्हणून मिक्स पिठाचे आहे बरेच जण भाजणी तयार करून भाजणीचे पीठ करतात ते त्याचे थालिपिठ बनवतात पण मी माझ्याकडे असलेल्या बरेच पीठ एकत्र करून अशा प्रकारची थालीपीठ बनवते.रेसिपी तून नक्कीच बघू या कशाप्रकारे थालीपीठ तयार केले आहे. Chetana Bhojak -
गौरी स्पेशल कथली (kathli recipe in marathi)
विदर्भ स्पेशल कथली#KS3कथली हा एक विदर्भातील पारंपारिक पदार्थ आहे याचे वैशिष्ट्य असे आहे की भाद्रपद महिन्यात महालक्ष्मी ला म्हणजेच गौरीला दुसऱ्या दिवशी जेवणात याचा प्रसाद केला जातो. या प्रसादाला खूप महत्व व तितकाच मान असतो.आंबील सोबत कथली ही महालक्ष्मीला घरोघरी बनविली जाते तितक्याच आवडीने व भक्तीने खाल्ली जाते.मी हा गौरीचा प्रसाद आहे म्हणून यात लसुण टाकले नाही तुम्हाला जर तसेच खायचे असेल तर तुम्ही टाकू शकता पण बिना लसणाचे खूप छान अप्रतिम लागते व यासाठी आंबट ताक घ्यावे त्यामुळे चव खूप छान लागते.याचे अजून एक वैशिष्ट्य ही खराब होत नाही दुसऱ्या दिवशी याची चव अजूनच छान लागते Sapna Sawaji -
आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक (ambyachya rasatil ukadiche modak recipe in marathi)
गणेश जयंती 🙏🌺🙏१५ फेब्रुवारी सोमवार म्हणजे १५ फेब्रुवारी च्या दिवशी पौराणीक मान्यतेनुसार शुक्ल महिन्यात गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि पूर्ण विश्वावर गणेशलहरी सर्वप्रथम आल्या तो दिवस म्हणजे माग शुक्ल चतुर्थी. महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र गणेश हे प्रथमपूजनीय मानले गेले आहे. आपल्या कडे कोणतेही शुभ कार्य असो त्याच्या सुरवातीला गणपतीची पूजा केली जाते. या तिथीला गणपतीच्या चतुर्थीच्या दिवसाचे महत्वव किती तरी पटीने जास्त असते. गणेश चतुर्थीला विनायक चतुर्थी देखील मानले जाते. ह्या वर्षीचे विनायक चतुर्थी सोमवारी १५ फेब्रुवारीला आली आहे. विनायक चतुर्थी प्रारंभ हि १५ फेब्रुवारी सकाळी प्रातःकाली १:५८ मिनिटांनी सुरु होते आहे आणि चतुर्थी समाप्त होत आहे १६ फेब्रुवारी पहाटे ३:३६ मिनिटांनी. ह्या विनायक चतुर्थीच्या दिवशी केली जाणारी गणेशांची पूजा अत्यधिक लाभदायक ठरते. आपल्या कडे भद्रपतामाध्ये गणेश जयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. भाद्रपत मधील गणेश जयंती निमीत्त पूजा केल्यानंतर आपण उकीडीच्या मोदकाचा नैवद्य दाखवला जातो. तर माघे गणेश जयन्तीमध्ये तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो म्हणूनच मागील गणेश जयंती तिलकुंद गणेश जयंती म्हणून देखील ओळखली जाते. अग्निपुराणामध्ये ह्या तिलकुंद चतुर्थी चे महत्व सांगितले आहे म्हणतात कि मोक्षप्राप्तीसाठी ह्या चतुर्थीला लोक व्रत करतात. ह्या दिवशी गणेशजींची पूजा अगदी भक्ती भावाने केल्याने आपल्याला गणेशजींचा आशीर्वाद वर्षभर आपल्या कायम सोबत राहतो आपल्यावर कोणतेही संकटे येऊन देत नाही. Archana Ingale -
पारंपारिक पद्धतीने पापड पासून तयार केलेला स्नॅक्स'गिली रोटी' (gilli roti recipe in marathi)
#GA4#week23#papad#राजस्थानीगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये पापड हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पापड पासून बनवलेला हा नाश्त्याचा प्रकार राजस्थान मध्ये फेमस असा नासत्याचा प्रकार आहे. भारतात किंवा भारताबाहेर जिथे मारवाडी असतात हा पदार्थ नक्कीच बनवून खातात. आपल्या देशाची संस्कृति आहे कधीही अन्न वाया जाऊ देत नाही हा पदार्थ त्यातूनच तयार झालेला आहे बऱ्याच वेळेस आपल्याकडे रात्रीच्या पोळ्या किंवा सकाळच्या पोळ्या उरतात तेव्हा त्या पासून काय तयार करायची त्यासाठी हा नाश्त्याचा प्रकार तयार झाला आहे माझ्या लहानपणी आमची आझी नेहमीच आम्हाला हे बनून द्यायची तिला स्वतःला ही हा पदार्थ खूप आवडीचा आहे मारवाडी कम्युनिटीमध्ये जितके आजी-आजोबा मोठे वृद्धांमध्ये हा पदार्थ जास्त आवडीचा आहे उरलेल्या पोळ्यांमध्ये पापड टाकून नरम करून पोट भरून असा नाश्ता खाल्ला जातो चवीला खूप छान लागतो यात अजूनही एक प्रकारांनी पोळ्या मध्ये मुगाच्या वड्या टाकून ही हा पदार्थ तयार केला जातो. म्हणजे हा पदार्थ असा आहे भाजी आणि पोळी दोघं एकत्र तयार करून पोट भराऊ असा पदार्थ तयार होतो .माझ्याही घरात आठवड्यातून दोनदा तरी हा पदार्थ तयार होतो हा पदार्थ बनवण्यासाठी शिळ्या पोळ्या असल्या तर जास्त चविष्ट लागतो. कमी वेळात झटपट तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे आता तुमच्याकडे पोळ्या उरल्या तर नक्कीच नाश्ता बनवून ट्राय करा याला कवे,गिल्ली रोटी असे म्हणतात. Chetana Bhojak
More Recipes
- आलू-मटार कांदेपोहे रेसिपी (aloo matar kande pohe recipe in marathi)
- मुंबई स्ट्रीट स्टाईल - झटपट ब्रेड चिला / पुडला (bread chilla recipe in marathi)
- मॅक डी (Mac Donalds) स्टाईल बर्गर आणि पोटॅटो वेजेस (burger and potato wedges recipe in marathi)
- कोबी-ज्वारी वङ्या (kobi jowari vadya recipe in marathi)
- फोडणी चा भात (phodnicha bhaat recipe in marathi)
टिप्पण्या (2)