ओल्या नारळाचे सारण भरून केलेली मिरची भजी(olya naralache saran bharun mirchi bhaji recipe in marathi)

#gur
गणेशोत्सव स्पेशल रेसिपी म्हणून इथे मी ओल्या नारळाचं सारण भरून मिरची ची भजी बनवली आहे.
रोजच्या जेवणाची लज्जत वाढवायची असेल तर ही भजी नक्की करून बघा.
रेसिपी खाली देत आहे
ओल्या नारळाचे सारण भरून केलेली मिरची भजी(olya naralache saran bharun mirchi bhaji recipe in marathi)
#gur
गणेशोत्सव स्पेशल रेसिपी म्हणून इथे मी ओल्या नारळाचं सारण भरून मिरची ची भजी बनवली आहे.
रोजच्या जेवणाची लज्जत वाढवायची असेल तर ही भजी नक्की करून बघा.
रेसिपी खाली देत आहे
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मिरच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्याव्यात. मिरचीला दोन्ही बाजूने थोडसं अंतर सोडुन मधोमध चीर पाडून घ्यावी.सूरी किंवा चमच्याच्या साहाय्याने मिरचीच्या आतील सर्व बिया काढून घ्याव्यात. मिरचीला थोडंसं मीठ लावून घ्यावे.
- 2
कढईमध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल गरम करून मिरच्या दोन ते तीन मिनिटे परतून झाकण लावून मंद आचेवर वाफवून घ्याव्यात.
- 3
मिक्सरच्या भांड्यामध्ये खवलेला ओला नारळ,हिरवी मिरची,कोथिंबीर,बडीशेप,जीरे, लसूण, लिंबाचा रस,मीठ,व साखर घालून कोरडेच वाटून घ्यावे. तयार केलेले सारण मिरच्यांमध्ये भरून घ्यावेत.
- 4
बोल मधे बेसन, तांदळाचे पीठ,मीठ, हळद, खाण्याचा सोडा व पाणी मिक्स करून भजी साठीचे चे मिश्रण तयार करून घ्यावे.
- 5
कढई मध्ये तेल गरम करून भरलेल्या मिरच्या बेसन पिठामध्ये घोळवून तळून घ्याव्यात.
- 6
भजी गरमा गरम टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कुरकुरीत अळू वडी (alu wadi recipe in marathi)
#gur गणेशोत्सव स्पेशल म्हणून बापाच्या नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवण्यासाठी अळूवडी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
हिरव्या माठाची भजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपीश्रावणात हिरवा माठ मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. लाल माठ इतकाच पौष्टीक आणि चवीला सुंदर हिरवा माठ असतो.इथे मी हिरव्या माठाची भजी बनवली आहे. छान कुरकुरीत आणि चवीला सुंदर झटपट अशी ही भजी बनते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
ढोबळी मिरची भजी (dhobhdi mirchi bhaji recipe in marathi)
#GA4#week12#besanसाधी मिरची किंवा भावनगरी मिरची भजी तर आपण नेहमीच करतो .आज मी ढोबळी मिरची भजी बनवली आहे.अत्यंत चविष्ट व झटपट ही भजी एक नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
ओल्या नारळाचे उकडीचे मोदक (olya naralache ukadiche modak recipe in marathi)
#cpm7अंगारकी चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून ओल्या नारळाचे उकडीचे मोदक बनवले आहेत. माझ्या उकडीच्या मोदकांची रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
भरलेली मिरची (bharleli mirchi recipe in marathi)
#ngnr या हिरव्या श्रावणात मोठ्या लांब मिरच्या पण आपली अधिक भर घालत असतात... या मिरच्यांमध्ये अनेक प्रकारचे सारण भरून श्रावणातील जेवणाची लज्जत वाढवतात.... Nilesh Hire -
निर फणसाची भजी (Neer Fansachi Bhaji Recipe In Marathi)
#चणा डाळ किंवा बेसन वापरून केलेली रेसिपी.भजी मग ती कसलीही असो आपल्या जेवणाची रंगत वाढवतात. वेगवेगळ्या प्रकारची भजी आपण नेहमीच करतो पण ठराविक सिझनमध्ये मिळणारा हा निरफणस,याची भजी अतिशय सुंदर वेगळ्या चवीची असतात नक्कीच करून बघा. Anushri Pai -
मका भजी (makka bhaji recipe in marathi)
#shr#week3पावसाळा सुरू झाला की मार्केटमध्ये मका म्हणजे स्वीट कॉर्न यायला सुरुवात होते. नंतर श्रावण सुरू झाला कि मार्केटमध्ये सगळीकडेच मका मोठ्या प्रमाणावर दिसायला सुरुवात होते.हा मका म्हणजे स्वीट कॉर्न जितका उकडून आणि भाजून खायला छान लागतो तितकीच मक्याची भजी सुद्धा चवीला अतिशय सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
डिस्को कट मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#KS2# पश्चिम महाराष्ट्र# सोलापूर स्पेशल कुरकुरीत डिस्को कट मिरची भजी Rupali Atre - deshpande -
मिरचीची भजी (Mirchi Bhajji Recipe In Marathi)
भजी हा विषय घरातल्या सर्वांच्या आवडीचा! बटाटा,सिमला मिरची, कच्ची केळी , ओव्याचे पानं, वांग्याची भाजी..... भजी म्हणजे कसलीही करू शकतो. त्याचप्रमाणे ही चटकदार मिरचीची भजी आज आपण पाहूया. Anushri Pai -
मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#KS8गरम व टेस्टी भजी ही मुंबईची खासियत,त्यात प्रत्येकाची प्रकार वेगळेच त्यातील एक सिमला मिरची भाजी रुचकर खमंग ..☺️👌👍 Charusheela Prabhu -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेंज विक 3 साठी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सोलापुरी स्पेशल कट मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#ks2#पश्चिममहाराष्ट्रसोलापुरी स्पेशल कट मिरची भजी Mamta Bhandakkar -
ओल्या हळदीचे लोणच (olya haldiche loncha recipe in marathi)
#EB10#week10#विंटर स्पेशल रेसिपी#ओल्या हळदीचे लोणचअतिशय पौष्टिक आणि चविष्ट,जेवणाची लज्जत वाढवणारा पदार्थ....हिवाळ्यात आवर्जून केल्या जातो....पाहुयात रेसिपी... Shweta Khode Thengadi -
भजी प्लैटर (bhaji platter recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गम्मतबाहेर मस्त पाऊस पडत असताना सगळ्यात आधी आठवते ती मस्त गरमागरम भजी .मग कांदा,बटाटा,गिल्के ,मिरच्या,भाज्या जे घरात असेल त्याची भजी बनावतोमी कांदा,बटाटा,मिरची,टोमॅटो व ओवा ची पाने च्या भजी बनवून असे छान भजी प्लैटर बनवले आहेनक्की ट्राई करुन बघा Bharti R Sonawane -
झणझणीत हिरवी मिरची ठेचा (hirvi mirchi thecha recipe in marathi)
#ठेचाचटणी तर जेवणात हवीच .जेवणाची डडावीकडील बाजु हक्कानी सांभाळणारा पदार्थ म्हणजे चटणी..मग ती कोणतीही असु देत...म्हणून खास झणझणीत हिरव्या मिरचीची चटणी म्हणजेच ठेचा...तुम्ही ही करून बघा आणि जेवणाची लज्जत वाढवा. Supriya Thengadi -
-
भरली मिरची (bharli mirchi recipe in marathi)
#Shravan chef#week 3#shrसणासुदीचे गोड गोड खाऊन कंटाळा येतो.जरा झणझणीत असं काही खावंसं वाटतंच!परवा भाजीला गेले तेव्हा अचानक लांब मिरच्या दिसल्या आणि घेण्याचा मोह आवरला नाही.ह्या भावनगरी मिरच्या असतात तशाच.... पण थोड्या लांब आणि तिखटही फारशा नसतात.श्रावण-भाद्रपदात हमखास मिळतात. दरवर्षी नाशिकला माझ्या चुलतसासूबाईंकडे नवरात्रात कुलदेवीच्या दर्शनासाठी गेलो की आम्हा सगळ्यांना आवडते म्हणून ह्या भरल्या मिरच्या त्या करतातच...खास खान्देशी टच!!त्या ही भाजी कशी करतात ते पाहिले होते,त्यापद्धतीनेच मी ही भाजी करुन पाहिली आहे. मिरची म्हणजे झणझणीतपणा.जेवणातली रुची वाढवणारी ही मिरची.याशिवाय जेवण अपूर्णच! ..तर मिरची इ.स.पू.3000वर्षापूर्वी वापरात आली.मिरचीमध्ये कँप्सिसिन नावाचा घटक हा तिच्या तिखटपणास कारणीभूत असतो.जिभेवरील आणि मेंदूमधील,त्वचेवरील नसा या घटकाने जागृत होतात आणि आपल्याला तिखट चव समजते. मिरच्यांचे भारतातले माहितीतले प्रकार म्हणजे संकेश्वरी,ब्याडगी,गुंटुर,ज्वाला,ज्योती,कश्मिरी. गुंटुर,ज्वाला या खूप तिखट,तर ब्याडगी, कश्मिरी या रंगाने मोहक आणि कमी तिखट.भारतीय पदार्थांमध्ये मिरची ही अनिवार्य आहे.अति तिखट किंवा कमी तिखट खाणारे हे दोनच वर्ग यात आहेत. "भूत जोलकिया"नावाची एक मिरचीची जात मणिपूर,शिलाँग,असाम,नागालँड इथे आढळणारी अत्यंत जहाल तिखट असते.सर्वसाधारणपणे साठवणीचे तिखट आणि रोजच्या वापरातल्या हिरव्या मिरच्या याचाच वापर स्वयंपाकात होतो.सिमला मिरची/ढोबळी मिरची ही लाल,हिरव्या पिवळ्या रंगात येते ती सँलड किंवा भाजीसाठी वापरली जाते.मीरे हे सुद्धा मिरचीवर्गीयच आहेत. अशी ही ठसकेबाज .....अनेक रुपात आपल्या जेवणाची रंगत वाढवणारी ही मिरची!!🌶️🌶️ Sushama Y. Kulkarni -
वरी साबुदाणा उपवास इडली (vari sabudana upwas idli recipe in marathi)
#nrr नवरात्र स्पेशल उपवास म्हणून इथे मी वरी आणि साबुदाणा वापरून उपवासाची इडली बनवली आहे. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
स्टफ मिरची (stuffed mirchi recipe in marathi)
आपण नेहमी तिखट लांब मिरची भजी करून तरीही भजे लांब शिमला मिरची मिरची भजी आहे Vaishnavi Dodke -
लाल मिरची ठेचा (laal mirchi thecha recipe in marathi)
#26चवीला अप्रतिम लागणारा आणि जेवणाची लज्जत वाढवणारा.. खवय्यांना आवडणारा... पारंपरिक लाल मिरची ठेचा.. Shital Ingale Pardhe -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
बेसन मसाला स्टफ मिरची (Besan Masala Stuff Mirchi Recipe In Marathi)
#SSR #बेसन मसाला स्टफ मिरची..... चटपटीत मसाला मिरची जेवणाची लज्जत वाढवते ..... Varsha Deshpande -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#gurगणेशोत्सव स्पेशल रेसिपी म्हणून येथे मी मसाला भेंडी बनवली आहे. ही मसाला भेंडी गरम गरम वरण भाता सोबत चपाती किंवा भाकरी सोबत सुद्धा खूपच सुंदर लागते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
करंजी(चंद्रकोर) ओल्या नारळाची (olya naralchi karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 नुकतीच दिव्याची अमावस्या येऊन गेली आमच्या कडे त्या दिवशी तळलेल्या मोदकांचा नैवेद्य असतो. आपली चंद्रकोर थीम असल्याने मी ओल्या नारळाचे सारण भरून छान चंद्रकोर केली आणि तळली.Pradnya Purandare
-
सिमला मिरची भजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी ,चारूशिला ताईची सिमला मिरची भजी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच झटपट आणि टेस्टी झाले आहेतभजी ...😋😋👌 Deepti Padiyar -
स्टफ मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक week 5पावसाळी गंमत,पावसाळी खाण्याची मजा ही मिरचीच्या भजी शिवाय अपुरी आहे, असे मला वाटते,,छान रिमझिम पाऊस पडत असताना छान गारवा याची सुमधुर गाणी सुरु आहेत,,छान पाऊस पडत असताना ही असली भजी आपण चहा सोबत खातो आहे...वाह!!!!! किती मजा ना!!!!....दरवर्षी आपलं हे असलं पावसाची मजा घेणे हे ठरलेला आहे...यात कुठलेही चेंजेस नसतातवेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे पाककृती ही आपली ठरलेली आहे...त्या त्या ऋतूमध्ये त्या त्या पदार्थांची पण छान मजा घेत असतो...वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थांची मजा घेतल्याशिवाय आपलं आयुष्य पुढे सरकत नाही,,आणि हीच तर खरी मजा आहे...आपल्या आयुष्यात येणारे सुखदुःख आणि आणि येणारे चढ-उतार, हे तर चालू राहणारच,,म्हणूनच आपले चार्जिंग या असल्या मजा करणे होत राहते,,,म्हणूनच मस्त खा आणि स्वस्त राहा,, पण नेहमी नेहमी तळलेले पदार्थ नको बर,,,कधीकधी मजा म्हणून,,, बस,,, 🥰 Sonal Isal Kolhe -
ओल्या नारळाचे मोदक (olya naralache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 आमच्याकडे दरवर्षी गणेश बाप्पाजींच्या आगमन ओल्या नारळाच्या मोदकानेच होते . Arati Wani -
मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीआज संध्याकाळी जेवणामध्ये चटणी वगैरे असं काहीच नव्हतं तर मग मी वेळेवर ठरवलं की आज मिरची भजी करूया म्हणजे जेवणामध्ये वेगळी चव येईल आणि मिरच्या घरी होत्याच तर काय मग पटापट बनवल्या आणि एकदम जिभेला झोंबे पर्यंत सर्वांनी ताव मारला Maya Bawane Damai -
राजस्थानी मिरची वडा (rajasthani mirchi wada recipe in marathi)
#GA4#week13#Mirchiबटाटे वडा आणि समोस्या मध्ये जसे बटाट्याचे मिश्रण भरतात त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये आकाराने मोठ्या असलेल्या हिरव्या मिरचीतील बी काढून त्यामध्ये बटाट्याचे मिश्रण भरून मिरची बेसन पिठामध्ये घोळवून तळले जाते. चला तर मग बघुया राजस्थानी मिरची वडा कसे बनवतात..... Vandana Shelar -
मिरची भजे (mirachi bhaji recipe in marathi)
#स्टफ्ड रेसिपी. भजे अनेक प्रकारे करता येतात...पण त्यातल्या त्यात पडवळ भजी आणि खेकडा भजी मला जास्त आवडतात... मिरची भजे त्यांच्या तिखट चवीमुळे मी कधी केली नव्हती पण काही दिवसांपूर्वी माझ्या एका साऊथ इंडियन मैत्रीणीने त्यांच्याकडची स्पेशल स्टफ्ड मिरची भजी खाऊ घातली ज्यांची चव मला अप्रतीम वाटली... बघुया रेसिपी Deepali Pethkar-Karde
More Recipes
टिप्पण्या (6)