पोहे बटाटा थालीपीठ (Pohe Batata Thalipeeth Recipe In Marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

बटाटा रेसिपी कूकस्नॅप यासाठी
प्रगती हाकिम यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.

पोहे बटाटा थालीपीठ (Pohe Batata Thalipeeth Recipe In Marathi)

बटाटा रेसिपी कूकस्नॅप यासाठी
प्रगती हाकिम यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
२ जणांसाठी
  1. 1 कपपोह्याचे पीठ
  2. २०० ग्रॅम बटाटे (मध्यम आकाराचे ३ नग)
  3. 2-3 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  4. 3-4हिरव्या मिरच्या
  5. 4-5लसूण पाकळ्या
  6. 1 इंचआले
  7. 1 टीस्पूनलाल तिखट
  8. 1/2 टीस्पूनधने पावडर
  9. 1/4 टीस्पूनहळद
  10. 1/2 टीस्पूनओवा
  11. चवीप्रमाणे मीठ
  12. थोडे तेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    पोह्यांची मिक्सरमधून बारीक पावडर करून बटाट्याच्या सालं काढून, स्वच्छ धुऊन, बारीक फोडी करून घेणे. मिक्सरच्या भांड्यात बटाट्याच्या फोडी, हिरव्या मिरच्या, लसूण,आलं घालून, त्याची बारीक पेस्ट करून घेणे.

  2. 2

    एका मोठ्या बाऊलमध्ये पोह्याचे पीठ, तिखट, हळद, ओवा, मीठ हे सर्व घालून, मिक्स करून घेणे. नंतर चिरलेली कोथिंबीर व बटाट्याची पेस्ट घालून मिक्स करून घेणे.

  3. 3

    सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर, थोडेसे तेल घालून पीठ घट्ट मळून घेणे. (पाणी लागत नाही) पीठ अर्धा तास झाकून ठेवणे.

  4. 4

    अर्धा तासानंतर पीठ व्यवस्थित मळून घेऊन त्याचे गोळे करून घेणे. एक गोळा घेऊन त्याची मध्यम जाडसर पोळी लाटून घेणे. गोलाकार हवी असेल डब्याच्या झाकणाने गोल कापून घेणे. तवा तापत ठेवून,त्यावर थोडेसे तेल घालावे. वाटलेले थालीपीठ त्यावर घालावे.

  5. 5

    एक बाजू भाजली की दुसऱ्या बाजूने उलटून,तेल लावून भाजावे.अशाप्रकारे सर्व थालीपीठ करून घेणे.
    लोणचे, चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर हे खाऊ शकतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes