उपवासाचे इंस्टंट आप्पे (Upvasache Instant Appe Recipe In Marathi

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#JPR
आज एकादशी निमित्त उपवासाचे झटपट होणारे असे आप्पे तयार केले. करायला एकदम सोपे आणि खायला ही एकदम चविष्ट असे आप्पे तयार झाले आहे.
तर रेसिपी तून नक्कीच बघा उपवासाचे आप्पे.

उपवासाचे इंस्टंट आप्पे (Upvasache Instant Appe Recipe In Marathi

#JPR
आज एकादशी निमित्त उपवासाचे झटपट होणारे असे आप्पे तयार केले. करायला एकदम सोपे आणि खायला ही एकदम चविष्ट असे आप्पे तयार झाले आहे.
तर रेसिपी तून नक्कीच बघा उपवासाचे आप्पे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
2-3 व्यक्ति
  1. 1/3 कपबारीक साबुदाणा
  2. 1/3 कपभगर
  3. 2उकडलेले बटाटे
  4. 3 टेबलस्पूनशेंगदाण्याचे कूट
  5. 1/2 टेबलस्पूनआले, मिरची पेस्ट
  6. 1 टीस्पूनसाखर
  7. जीरे
  8. चवीनुसारसेंधव मीठ
  9. तेल गरजेनुसार

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    झटपट आप्पे तयार करायचे तर बारीक साबुदाणा घ्यायचा.
    बारीक साबुदाणा नसेल तर जाडा साबुदाणा मिक्सर मधून फिरवून घ्यायचा आणि मग भिजवायचा
    बारीक साबुदाणा आणि भगर अर्धा तास भिजवून घेउ

  2. 2

    दोन्ही वेगवेगळे भिजून घेऊ
    साबुदाणा भिजल्यानंतर भगर मध्ये थोडे पाणी टाकून भगर शिजवून घेउ
    भगर खूप पाणी टाकून नाही शिजवायची थोडीच शिजवायची.

  3. 3

    आता भिजलेल्या साबुदाणा मध्ये शेंगदाण्याचे कूट, आले-मिरची पेस्ट, साखर चवीनुसार मीठ,जीरे टाकून देऊ

  4. 4

    उकडलेला बटाटा स्मॅश करून टाकून देऊ शिजलेली भगर टाकून देऊ

  5. 5

    आता सगळे एकत्र करून गोळा तयार करून घ्यायचा. हातावर तेल लावून चपटे गोळे तयार करून घ्यायचे

  6. 6

    आता आप्पे पात्र मध्ये तेल टाकून चपटे गोळे ठेवून आप्पे आलटून पालटून भाजून घेऊ.
    आप्पे छान फुलून येतात आणि छान सगळे शिजलेले असल्यामुळे आतूनही खूप छान तयार होतात.

  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10

    तयार गरमा गरम आप्पे बरोबर नारळाची चटणी तुम्ही उपवासात खात असल्यास पुदिन्याची चटणी घेऊ शकतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes