बारीक मेथी बटाटा भाजी (समुद्रमेथी) (Methi Batata Bhaji Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#WWR # सध्या बारीक समुद्रमेथी मार्केट मध्ये दिसु लागली आहे. लगेच आणुन भाजी केली खुप टेस्टी व पौष्टीक चला तर रेसिपी बघुया

बारीक मेथी बटाटा भाजी (समुद्रमेथी) (Methi Batata Bhaji Recipe In Marathi)

#WWR # सध्या बारीक समुद्रमेथी मार्केट मध्ये दिसु लागली आहे. लगेच आणुन भाजी केली खुप टेस्टी व पौष्टीक चला तर रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. १०-१२ बारीक मेथीच्या जुड्या
  2. 2बटाटे
  3. 1मोठा कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 4-5मिरच्या
  6. 1/4 टिस्पुनहळद
  7. 1-2 टिस्पुनठेचलेला लसुण
  8. 1 टिस्पुनसाखर
  9. चविनुसारमीठ
  10. 1 टेबलस्पुनतेल
  11. 1 पिंचहिंग

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    बारीक मेथी(समुद्रमेथी) ही पाण्यात३-४ वेळा स्वच्छ धुवुन घ्या मुळांना रेती असते रेती राहिली तर भाजी त कचकच राहाते नंतर जुड्या सोडुन शेवटची मुळे काढुन टाका व भाजी बारीक चिरून ठेवा तसेच बटाट्याची साले काढुन बारीक पातळ चिरून पाण्यात ठेवा इतर लागणारे साहित्य काढुन व चिरून ठेवा

  2. 2

    कढईत तेल गरम केल्यावर मोहरीजिरे हिंग, कडिपत्ता, ठेचलेला लसुण परता नंतर त्यात मिरच्या व कांदा चिरून घाला व परता गुलाबी होईपर्यत हळद घाला नंतर त्यात चिरलेला बटाटा व टोमॅटो थोडे मीठ घालुन परता व झाकण ठेवुन शिजवा

  3. 3

    बटाटा शिजल्यावर त्यात चिरलेली मेथी घाला परतुन शिजवा साखर व चविनुसार मीठ घालुन परता व भाजी शिजवा शेवटी त्यात किसलेले ओले खोबरे घाला आपली भाजी रेडी

  4. 4

    प्लेटमध्ये गरमागरम बारीक मेथीची भाजी वरून कोथिंबिर व किसलेले ओले खोबरे पेरून सर्व्ह करा सोबत पोळ्या दया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes