खमंग कुरकुरीत पंचमिश्रित थालीपीठ (Thalipeeth Recipe In Marathi)

Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
Mumbai

#WWR
हिवाळ्यात गरमागरम थालीपीठाची मजा काही वेगळीच. मग ते सात्विक कसे बनवले जाईल हा माझा प्रयत्न. धान्य मिश्रित.. असे थालीपीठ

खमंग कुरकुरीत पंचमिश्रित थालीपीठ (Thalipeeth Recipe In Marathi)

#WWR
हिवाळ्यात गरमागरम थालीपीठाची मजा काही वेगळीच. मग ते सात्विक कसे बनवले जाईल हा माझा प्रयत्न. धान्य मिश्रित.. असे थालीपीठ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाऊण तास
३-४ जणांसाठी
  1. 1 वाटीगहू
  2. 1 वाटीज्वारी
  3. 1 वाटीतांदूळ
  4. 1/4 कपचणा डाळ
  5. 1/4 कपमूग
  6. 1 चमचाजीरे
  7. 1 चमचाओवा
  8. 1 चमचामेथी
  9. तेल
  10. हळद
  11. लाल तिखट
  12. कोथिंबीर
  13. 1मोठा कांदा
  14. पाणी
  15. 1मूठ पोहे
  16. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

पाऊण तास
  1. 1

    प्रथम १ वाटी गहू, १ वाटी ज्वारी, १ वाटी तांदूळ, पाव कप मूग डाळ, १चमचा जीरे, १ चमचा ओवा, १ चमचा मेथी हे सर्व जिन्नस एक एक करून भिडयाच्या तवात मंद आचेवर भाजून घ्या. नंतर हे सर्व मिश्रण एकजीव करून थंड झाल्यावर दळण दळून घ्या.

  2. 2

    प्रथम एका परातीत दीड कप भाजणीचे पीठ घेऊन त्यात मूठभर भिजवलेले पोहे, हळद, लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ हे सर्व पीठात मिसळून एकजीव करून घ्या.आता त्यात थोडे थोडे पाणी घालून हे पीठ चांगले मळून घ्या.

  3. 3

    नंतर पोळपाटावर एक सुती पातळ कपडा ओला करून तो पसरुन त्या वर पीठाचा एक गोळा घेऊन तो हाताने दाबून थोडे थोडे पाणी लावून हा गोळा कपड्यावर व्यवस्थित थापून घ्या. ते व्यवस्थित भाजले जावेत म्हणून त्याला बोटाने तीन चार भोक करून घ्यावेत. गॅस वर तवा गरम करून त्या वर अलगद कापडासकट हे थालीपीठ तव्यावर उलटे घालून कपडा अलगद काढून टाकावा.

  4. 4

    आता तव्यावर चारही बाजूने तेल सोडून थोडे थोडे भोकामध्ये ही तेल सोडून थालीपीठ चांगले दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.

  5. 5

    तयार गरमागरम कुरकुरीत पंच मिश्रित थालीपीठ दहयासोबत सव्हऀ करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes