खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#ब्रेकफास्ट
#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर
#बुधवार_खमण ढोकळा

खुप सुंदर, चविष्ट, जाळीदार होतो ढोकळा.. माझ्या घरातील सगळ्यांनी आवडीने खाल्ला..

खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)

#ब्रेकफास्ट
#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर
#बुधवार_खमण ढोकळा

खुप सुंदर, चविष्ट, जाळीदार होतो ढोकळा.. माझ्या घरातील सगळ्यांनी आवडीने खाल्ला..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
पाच, सहा
  1. 2 कपबेसन पीठ
  2. 1 टीस्पूनमिरची, आले वाटलेले
  3. 3हिरव्या मिरच्या
  4. 5 टेबलस्पूनसाखर
  5. 1 टीस्पूनसायट्रिक ऍसिड
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. चवीनुसारमीठ
  8. 1/4 टीस्पूनहिंग
  9. 4 टेबलस्पूनतेल
  10. 2 कपपाणी पीठ भिजवण्यासाठी
  11. आवडीनुसार कोथिंबीर
  12. 1 टीस्पूनबेकिंग सोडा

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    एका वाटी मध्ये दोन कप पाणी घेऊन त्यात मीठ, चार टेबलस्पून साखर, सायट्रिक ऍसिड घालून चांगले मिक्स करावे..

  2. 2

    बेसन पीठ चाळून एका वाटी मध्ये घेऊन त्यात हळद, हिंग, आले मिरची वाटून घेतलेली पेस्ट घालून घ्यावी...व मिश्रण एकजीव करावे..

  3. 3

    पीठाच्या मिश्रणात पाणी, मीठ व सायट्रिक ऍसिड मिक्स केलेले पाणी थोडे थोडे घालून चांगले मिक्स करावे..व दहा मिनिटे झाकून ठेवावे

  4. 4

    एका बर्फी ट्रे ला किंवा केक टिनला तेलाने ग्रीस करून घ्यावे..

  5. 5

    ढोकळ्याचे मिश्रणात एक टीस्पून बेकिंग सोडा घालून चांगले पाच मिनिटे फेटावे..मिश्रणाचा कलर बदलतो आणि मिश्रण खुप हलके होते... जाळीदार होते

  6. 6

    मोठ्या पातेल्यात किंवा कढईत पाणी घालून गरम होण्यासाठी ठेवावे. मिश्रण ट्रे मध्ये घालून टॅप करु नये हलक्या हाताने उचलून पाण्याला उकळी आलेल्या भांड्यात जाळी ठेवून त्यावर ठेवावे व झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटे शिजू द्यावे..

  7. 7

    वीस मिनिटांनंतर टुथपीक किंवा सुरी ढोकळ्यामध्ये टाकून शिजला का ते बघावे..सुरीला चिकटला नाही तर ढोकळा शिजला असे समजावे..

  8. 8

    ढोकळा थोडा थंड झाल्यावर आपोआप ट्रे च्या कडा सोडतो..प्लेट मध्ये काढून घ्यावे...

  9. 9

    पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल घालून गरम झाले की त्यात मोहरी, हिंग, उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घालून कडकडीत फोडणी झाली की त्यात अर्धा कप पाणी घालावे व एक टेबलस्पून साखर घालून उकळी आणावी.. गॅस बंद करावा

  10. 10

    तडका पाणी थोडे कोमट होईपर्यंत ढोकळा हवा त्या आकारात कापून घ्यावा..

  11. 11

    तडका पाणी कोमट हवे आणि आपला ढोकळा ही साधारण गरम हवा... तेव्हा हे पाणी सगळ्या ढोकळ्यावर चमच्याने घालून घ्यावे..व दहा मिनिटे तसाच राहु द्यावे..

  12. 12

    ढोकळा हिरवी चटणी किंवा चिंच गुळाची चटणी सोबत सर्व्ह करावा...

  13. 13
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes