शेपू डाळ वड्या (sepu dal vadya recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#GR

शेपूची डाळ घालून कोरडी भाजी, शेपूची शेंगदाणे कूट लाऊन भाजी ,शेपूच्या मुटकुळे ,पराठे,धीरडे असे अनेक पदार्थ आपण करतोच .
पण त्यातच थोडेसे वेरिएशन व हेल्दी अशी मी शेपू च्या डाळ वड्या केले आहेत .
खूप सोप्या व चविष्ट होणाऱ्या वड्या एकदा नक्की ट्राय करा .
जे शेपू खात नाही ते पण मागून मागून खातील अशी ही रेसिपी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20  मिनीटं
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामशेपू (3 मोठ्या वाट्या)
  2. 100 ग्राममुग डाळ
  3. 150 ग्रामउडीद डाळ
  4. 4-5 हिरव्या मिरच्या
  5. 1 इंचआले
  6. 100 ग्रामकोथिंबीर (दीड वाटी)
  7. 1 टेबलस्पूनमीठ
  8. 1कांदा
  9. 2 टेबलस्पूनतेल
  10. फोडणीसाठी
  11. 2 टेबलस्पूनतेल
  12. 1 टीस्पूनमोहरी
  13. 1 टीस्पूनतीळ
  14. 2 टेबल्स्पूनसुके खोबरे सजावटीसाठी

कुकिंग सूचना

20  मिनीटं
  1. 1

    मूग डाळ व उडीद डाळ कमीत कमी दोन तास भिजवावी व पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची,आलं, कोथिंबीर व मीठ घालून मिश्रण सरबरीत वाटून घ्यावे

  2. 2

    वाटलेले मिश्रण एका भांड्यात काढून त्यात बारीक चिरलेला कांदा व शेपूची भाजी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे व त्यात गरम करून तेल घालावे परत मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे

  3. 3

    एकीकडे स्टीमर मध्ये पाणी उकळत ठेवावे व एका प्लेटला तेल लावून त्यात हे मिश्रण पसरून घ्या व 15 ते 18 मिनिटे वाफवून घ्यावे व थोडे थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्या

  4. 4

    तडका कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी व तीळ याची फोडणी करून तयार वड्यांवर घाला व किसलेले खोबरे ने सजावट करून टोमॅटो केचप किंवा पुदिना चटणी बरोबर खायला द्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes