अळूचं फदफदं (aloch fadfand recipe in marathi)

#md #Mothers_Day_Recipe #अळूचं_फदफदं...
Happy Mother's Day to you all💐🌹#स्वामीतिन्हीजगाचाआईविनाभिकारी🏵️🙏
मातृदिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा 💐💐
#आई या शब्दातच आपले सारे विश्व सामावलेले असते ना...#आ म्हणजे #आत्मा आणि #ई म्हणजे #ईश्वर.....असं म्हणतात की परमात्म्याने सर्वां बरोबर राहता यावे म्हणून आई निर्माण केलीये...अगदी बरोबर म्हटलयं नं..मातृदेवो भव🙏🙏आई म्हणजे जणू त्या विधात्याचे सगुण रुपच👩👧👦...सारी माया ममता इथूनच सुरू होऊन परत इथेच येऊन थांबते..#आई शब्दात सारं ब्रम्हांड सामावलं आहे म्हणून #आई या शब्दाचा अर्थ काढण्यास शब्दही कमी पडतील...तर अशा या शब्दांच्या महासागरातून #आई विषयी काही #शब्दमोती मी वेचायचा छोटा प्रयत्न केलाय...
सर्व मातृदेवतांना समर्पित🙏🙏🙏🙏
आई तूचि गुरु जीवनाचा तारु ,आणि असे तू कल्पतरू
आई तूचि लळा,जीविचा जिव्हाळा असे तू चैतन्याचा सोहळा
आई तूचि ज्ञानमाऊली,आभाळासम साऊली वसे तू देह राऊळी
आई तूचि मायेचा ओलावा,भावनांचा गोडवा,असे तू कुशीतील विसावा
आई तूचि मैत्रीचे बंध,ह्रदयाचे स्पंद ,असे तू रुधिर अन्् मेरुदंड
आई तूचि श्र्वास, प्रेमाची आस,असे तू अंतरीचा ध्यास
आई तूचि सह्याद्रीचा बाणा,सत्याच्या आणा ,असे तू कणखर कणा
आई तूचि पहिला शब्द,तू पहिली साद,असे तू अनंताची संगत
आई तूचि दीपस्तंभ,सुख दुःखाची साथ संगत, संस्कारांचा आकृतीबंध..आई माझी
आई तूचि वटवृक्ष ,खंबीर परी मायेची नाळ,सकल जनांचा आधार...आई माझी
आई तूचि सांग कसे फेडू मी पांग..वात्सल्याची उतराई कशी होऊ सांग....आssई माझी🙏🙏
©️भाग्यश्री लेले
आईच्या हातच्या अळूच्या पातळ भाजीला तोड नाही..मला प्रचंड आवडते तिच्या हातची भाजी..😋😋..चला तर मग रेसिपीकडे जाऊ या..
अळूचं फदफदं (aloch fadfand recipe in marathi)
#md #Mothers_Day_Recipe #अळूचं_फदफदं...
Happy Mother's Day to you all💐🌹#स्वामीतिन्हीजगाचाआईविनाभिकारी🏵️🙏
मातृदिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा 💐💐
#आई या शब्दातच आपले सारे विश्व सामावलेले असते ना...#आ म्हणजे #आत्मा आणि #ई म्हणजे #ईश्वर.....असं म्हणतात की परमात्म्याने सर्वां बरोबर राहता यावे म्हणून आई निर्माण केलीये...अगदी बरोबर म्हटलयं नं..मातृदेवो भव🙏🙏आई म्हणजे जणू त्या विधात्याचे सगुण रुपच👩👧👦...सारी माया ममता इथूनच सुरू होऊन परत इथेच येऊन थांबते..#आई शब्दात सारं ब्रम्हांड सामावलं आहे म्हणून #आई या शब्दाचा अर्थ काढण्यास शब्दही कमी पडतील...तर अशा या शब्दांच्या महासागरातून #आई विषयी काही #शब्दमोती मी वेचायचा छोटा प्रयत्न केलाय...
सर्व मातृदेवतांना समर्पित🙏🙏🙏🙏
आई तूचि गुरु जीवनाचा तारु ,आणि असे तू कल्पतरू
आई तूचि लळा,जीविचा जिव्हाळा असे तू चैतन्याचा सोहळा
आई तूचि ज्ञानमाऊली,आभाळासम साऊली वसे तू देह राऊळी
आई तूचि मायेचा ओलावा,भावनांचा गोडवा,असे तू कुशीतील विसावा
आई तूचि मैत्रीचे बंध,ह्रदयाचे स्पंद ,असे तू रुधिर अन्् मेरुदंड
आई तूचि श्र्वास, प्रेमाची आस,असे तू अंतरीचा ध्यास
आई तूचि सह्याद्रीचा बाणा,सत्याच्या आणा ,असे तू कणखर कणा
आई तूचि पहिला शब्द,तू पहिली साद,असे तू अनंताची संगत
आई तूचि दीपस्तंभ,सुख दुःखाची साथ संगत, संस्कारांचा आकृतीबंध..आई माझी
आई तूचि वटवृक्ष ,खंबीर परी मायेची नाळ,सकल जनांचा आधार...आई माझी
आई तूचि सांग कसे फेडू मी पांग..वात्सल्याची उतराई कशी होऊ सांग....आssई माझी🙏🙏
©️भाग्यश्री लेले
आईच्या हातच्या अळूच्या पातळ भाजीला तोड नाही..मला प्रचंड आवडते तिच्या हातची भाजी..😋😋..चला तर मग रेसिपीकडे जाऊ या..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चणाडाळ आणि शेंगदाणे स्वच्छ धुऊन पाण्यात पाच ते सहा तास भिजत ठेवा त्याचबरोबर चिंच देखील पाण्यामध्ये भिजवून ठेवा.
- 2
आता अळू स्वच्छ धुऊन त्याची देठं काढून देठांवर ची सालं काढून पातळ कापून घ्या.त्याच पद्धतीने आळूची पाने देखील बारीक चिरून घ्या.आता ही देठं आणि पानं मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्या. तसेच एकीकडे चणाडाळ आणि शेंगदाणे भिजलेले आहेत ते देखील उकडून घ्या साधारण बोटचेपे झाले की गॅस बंद करा.
- 3
आता एका कढई मध्ये तेल घालून अळूची पेस्ट घालून परतून घ्या नंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घाला मिरच्यांचे तुकडे आल्याचे तुकडे कढीपत्त्याची पाने,मुळा घालून व्यवस्थित मिक्स करा आणि उकळी येऊ द्या.आता यामध्ये चिरलेली चणा डाळ आणि शेंगदाणे घालून व्यवस्थित मिक्स करा. त्याचबरोबर खोबऱ्याचे काप आणि काजू देखील घाला..अळूच्या या भाजीला जे आपल्याला बेसन लावायचे आहे ते एका भांड्यात घेऊन त्यात थोडे पाणी घाला आणि त्याची पेस्ट करून घ्या.
- 4
आता वरील भाजीमध्ये तिखट, गोडा मसाला घालून भाजी व्यवस्थित मिक्स करा.आता यामध्ये चिंचेचा कोळ घाला आणि गूळ घाला. आणि भाजीला चांगल्या उकळी आणा. आता जे पण बेसन कालवलेले आहे पाण्यामध्ये ते या भाजीमध्ये हळूहळू घालून एकीकडे सतत भाजी ढवळत राहा म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत बेसनामुळे अळूच्या भाजीला थोडा दाटपणा येतो. आता भाजीला अजून एक ते दोन उकळ्या काढा.
- 5
दुसरीकडे एका कढल्यात जरासे जास्त तेल घेउन तेल तापले की त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली कि त्यात जीरे घाला,हिंग हळद,थोडा कडीपत्ता, थोडी कोथिंबीर आणि मेथी दाणा घालून खमंग फोडणी करून घ्या.या भाजीला खमंग फोडणी ची आवश्यकता असते नाहीतर या भाजीची चव बिघडते. आता भाजी मध्ये कोथिंबीर आणि ओले खोबरे घालून एक दोन उकळ्या आणा आणि गॅस बंद करा तयार झाले आपले आळूची पातळ भाजी किंवा अळूचं फदफदं..
- 6
तयार झालेले अळूची भाजी गरमागरम आंबेमोहोर तांदळाच्या भाताबरोबर आणि गरमा गरम पोळीबरोबर सर्व्ह करावी.
- 7
- 8
- 9
- 10
Similar Recipes
-
कोहळ्याचे बोडं (kohlyache bodam recipe in marathi)
#md#jyotshanskitchen#वल्डमदर्सडे#आई माझा अनमोल दागिना#आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, 🙏#आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, 🙏#आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, 🙏#आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी , 🙏#मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐माझी आई सुगरण तर आहेच पण तिच्या हाताला चवही खूप आहे. मला आईच्या हातच्या सगळ्याच रेसिपी आवडतात तीच्या कडूनच मी बघुन बघुन अनेक रेसिपी शिकलेय. तिने बनवलेले सर्वच पदार्थ खूप आवडतात पण बोंडं आणि पुरणपोळी हे जास्त प्रिय आहे, म्हणून मी आज स्पेशल कोहळ्याचे बोंडे बनविले चला तर मग mother's Day रेसिपी बघूया ........ 💁 Jyotshna Vishal Khadatkar -
पंचामृत(आंबट गोड चवीचे मिरची चे) (Panchamrut recipe in marathi)
#ट्रेडिग रेसिपी #या आठवड्यातील ट्रेडिग रेसिपी म्हणून ही केली आहे .पंचामृत म्हणजे तिखट,गोड, आंबट, खारट,कडु या सर्व स्वादाचे मिश्रण.तोंडी लावण्याचा उत्तम पदार्थ.जेवणाची डावी बाजू सजवणारा पदार्थ. Hema Wane -
अळूची पातळ भाजी (aluchi patal bhaji recipe in marathi)
#श्रावणस्पेशलभाजी#cooksnapअळूमध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6 आणि फोलेट देखील जास्त प्रमाणात असतात. यात मॅग्नेशियम, लोह, तांबे, जस्त, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज देखील असतात. अळूच्या पानात मोठ्या प्रमाणात फायबर असते. म्हणूनच आपल्या आहारात पावसाळ्यात मिळणाऱ्या अळूचे सेवन जरूर केले पाहिजे.आज मी नंदिनी अभ्यंकर ह्यांची अळूची भाजी कुकस्नॅप केली,खूपच छान झाला आहे भाजी...👌👌Thank you dear for this delicious cooksnap..😊🌹 Deepti Padiyar -
आळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 आळूवडीआणिबर्फीरेसिपीpost1कुरकुरीत खमंग अळूवडी बहुधा लहान-थोर सर्वानाच आवडते. पूर्ण श्रावण आणि पावसाळ्यामधे अळूची पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. काळसर देठाची अळू ही अळूवडीसाठी वापरली जातात आणि साधारण हिरवट देठाची पाने अळूच्या भाजीसाठीवापरली जातात.तळताना अळूवडीच्या सुटत जाणा-या खमंग पदरासारख्या कितीतरी आठवणी ह्या एका मराठमोळ्या पदार्थांभोवती घुटमळतात. एकेका सुरेख आठवणींचे पदर हळूहळू उलगडत पार भुतकाळाची वारी घडवून आणतात. अळूवडीची पाने आता जरी सर्रास १२ महिने मिळत असली तरी पूर्वी जास्त करून पावसाळ्यात उपलब्धता असे. मस्त पावसाळ्यातील दिवस, हिरवाईच्या अनेक छटा ल्यालेली झाडे, धुंद वातावरण आणि खमंग शाकाहारी जेवणाचा बेत. गौरी-गणपतीत तर घरी हमखास अळूवडीचा बेत असतो. यात एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे अळूची पाने (Taro Leaf). अळूच्या पानांपासून बनवलेल्या अळूवड्या ह्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. पण तुम्हाला माहिती आहे औषधी गुणधर्म असलेल्या या अळूच्या पानांपासून न केवळ अळूवडी बनवता येते तर आणखी खमंग, चटकदार चवदार अशा रेसिपीज बनविता येतात.अळूची पाने खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात आणता येते. त्याचबरोबर पोटाचे विकार, सांधेदुखी यांसारखे आजारही बरे होण्यास मदत होते. त्यामुळे अळूची पाने खाताना जर तुमची नाकं मुरडत असतील तर तुम्ही ही आळूवडीची रेसिपीज ट्राय करुन त्यावर ताव मारू शकता. Nilan Raje -
चुरमा लाडू (Churma Ladoo recipe in marathi)
#आईकिती मंद तो प्रकाश तुझ्या गर्भामध्ये होता.स्वर्गातील तो काळ माझ्या भोवताली होता.एकटीच मी आणि माझं जग तू होतीस.या भयाण जगापासून मला लपवून तू होतीस.तुझ्या हृदयाचा आवाज किती मधुर तो होता.तुझ्या प्रत्येक स्पंदनावर माझा छोटा जीव होता.तुला मला जोडणारी एक कोमल दोर आत होती.तुझी नाळ ती जणू वेल मला लपेटलेली होती.तुझा आवाज येताच ओठ माझे हसायचे.कान माझे फक्त तुझ्या आवाजाला तरसायचे.तू स्वत: ला कित्ती कित्ती जपायचीस.एक मी जगावं म्हणून तू किती किती मरायचीस.जन्म मला देताना किती सोसले तू त्रास.पण मी जगावं फक्त हाच तुझा ध्यास.गर्भातले ते महिने पून्हा येणार नाहीत.पण मी अजुनही तुझ्याशिवाय जगू शकणारच नाही....... - शिल्पा कुलकर्णी ज्योतीषाचा-याअजून काय सांगू मी माझ्या आईबद्दल......आई या दोन शब्दांची थोरवीच इतकी प्रचंड आहे की आपण देवाला सुद्धा आई, माऊली म्हणून हाक मारतो.अश्या या आईची आवडनिवड काही वेगळी नसतेच कधी...संपूर्ण घराची आवड तीच तिची आवड असते...ते ही न कुरकुरता न कुरबुरता,तिला तिच्यासाठी मी वेगळं काही करताना मी कधी पाहीलेच नाही....पण तरी सुद्धामला जाणवलेल्या तिच्या आवडीनिवडीमधील तिचा अगदी आवडीचा पदार्थ म्हणजे "चुरमा लाडू".....माझी आई गुजराती.माझे वडील कोकणी.त्यामुळे आईला सगळेच पदार्थ मी आवडीने करताना आणि खाताना पाहिले आहे....पण तरी सुद्धा,सगळ्यात वर ज्या पदार्थाचा नंबर लागतो तो म्हणजे," चूरमा लाडू " च......चला तर पाहूगुजरातची आण, बाण, शान.....चूरमा लाडू चे साहित्य आणि कृती....🙏Anuja P Jaybhaye
-
अळूवडी.. (aloowadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्त्विक रेसिपीज सात्त्विक रेसिपीज या बिना कांदा लसणाच्या असतात..मागच्या सात्त्विक रेसिपी मध्ये आपण श्रावण महिन्यात सणासुदीला सात्त्विक रेसिपी का खातो ते बघितलंय. श्रावणात क्षणात येते सरसर शिरवे...श्रावणसरी बरसत असतात..आणि या दिवसात खूप सार्या रानभाज्या उगवतात..त्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात..त्याचप्रमाणे भाजीचं अळू,वडीचं अळू देखील फोफावलेलं असतं..म्हणूनच का याला *वेडं अळू *म्हणतात.🤔..असो..अळूचे गुणधर्म मी आता इथे काही सांगत बसत नाही..तुम्ही तेवढे गुगलून घ्या..म्हणजे गुगल करा हो..😄.... तर या अळूवडीला,अळूभाजीला नैवेद्याच्या पानात अग्रभागी स्थान असतेच असते..या दोन्ही शिवाय नैवेद्य पुरा होत नाही..फक्त याची एक खोड म्हणजे..अळू खाजरा असतो काही वेळेस..म्हणून मग चिंचेचा कोळ घातला की अळूमधले crystals त्यात विरघळतात..आणि मग घसा खवखवत नाही..आणि मग प्राप्त होते स्वर्गीय चवीची खमंग खरपूस चवदार रुचकर अशी अळूवडी..आहा...तर मग चला चला लवकर..या माझ्या पाठोपाठ या cookpad च्या virtual किचनमध्ये😄😄 Bhagyashree Lele -
अळुवडी (alu wadi recipe in marathi)
#shr श्रावण सुरू झाला आणि या अळूवड्या चाखल्याच नाही असा एखादाच बघायला मिळेल... तर आज श्रावण स्पेशल आमच्याकडे अळुवड्या Nilesh Hire -
अळूच्या वड्या (aluchya vadya recipe in marathi)
#shr#श्रावण_स्पेशल #cooksnap_चॅलेंज#महाराष्ट्रीयन_रेसिपी#महाराष्ट्रयीन_रेसिपीदिप्ती हीची अळूवड्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. अळूवड्या खूप छान टेस्टी झाल्या. श्रावण महिन्यात खूप छान छान सणांची रेलचेल असते. विविध प्रकारचे पदार्थ बनवायला खूप उत्साह असतो. सगळीकडे हिरवेगार निसर्ग सौंदर्य बघायला मिळाते. श्रावणात भरपूर हिरव्या गार भाज्या उपलब्ध असतात. यादिवसात अळूच्या वडीची आणि भाजीची हिरवीगार पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. खमंग कुरकुरीत अळूवड्या खायला मिळणे म्हणजे पर्वणीच असते.आळूवडीची पाने आणि अळूच्या भाजीची पाने यात फरक असतो. आळूवडीची देठं पानांच्या शेवटी असतात आणि भाजीची देठं पानांच्या शेवटाकडून दिड ते दोन इंच पुढे असतात, आणि ती चकचकीत पण असतात. वडी साठी पानांची देठ काढून पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. अळूची पानं धुताना हाताला खाज सुटते, म्हणून हाताला चिंच फासून मग पानं धुवायची. आमच्या कडे नैवेद्यासाठी अळूवड्या ठेवताना त्यामधे आलं लसूण घालत नाहीत. Ujwala Rangnekar -
मँगो कस्टर्ड संदेश (Mango Custard Sandesh Recipe In Marathi)
#MDR #मदर्स_डे_रेसिपीHappy Mother's Day💐🌹❤️🎉🎊 आपल्या सर्वांमधील मातृदेवतेला माझं वंदन🙏🌹🙏 *आई*माझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणांसाठी तू स्वतःची कूस मायेनं बहाल केलीस....अन् तुझ्या धमन्यातील जीवनरसावर माझ्यात प्राण ओतून मला प्राणापलिकडे पोसलंस....अचानक एका क्षणी जीवघेण्या वेदनांनाआपणहून तू सामोरी गेलीस....आणि माझी भूमिका पार पाडण्यासाठी तू मला जगाच्या रंगभूमीवर entry करुन दिलीस...हर रोज जगण्यातली प्रत्येक भूमिका माझ्यासाठी तू समरसतेने जगलीस...कधी वैशाख वणव्यात माझ्यासाठी तू सावली बनून राहिलीस...तर कधी भावनांची समीकरणं सोडवायला ओलाव्याची साथ दिलीस...जीवनपटावर माझं व्यक्तिशिल्प साकारुन मला ओळख मिळवून दिलीस...लेकरांसाठी आईपणाच्या खस्ता खात असतानाच तुझी पावले आता आधार शोधू लागलीत...अन् आता मी काय करु ..कसं करु विचारीत आमची बोटं तू निर्धास्तपणे पकडलीस...नेमक्या याच क्षणांत माझं बालपण मला फिरुन तुझ्यात अनुभवायला मिळतंय...मला पाहताच तुझे ते लकाकणारे डोळे पाहूनआता मीच खूप भरुन पावतीये....तुझ्यातील मी आणि माझ्यातील तू पाहून मीच प्रेमाने हरखून जातीये....आताशा तुझ्यात दिसणारर्या त्या निरागस मुलाशी मी वात्सल्याने खेळतीये....तुझ्याभोवतीच फिरणारं सगळं जग माझंहीच भावना तृप्त मला करतीये....सगळं काही भरभरुन देताना आईआणखी एक सुख तू माझ्या पदरात टाकलंस...*आईची आई* होण्याचं दान माझ्या पदरात टाकून सार्या जगात भाग्यवान मला केलंस..सार्या जगात भाग्यवान मला केलंस..🙏❤️🙏©®भाग्यश्री लेले आजच्या खास दिवसाची खास fusion रेसिपी... Mango Custard Sandesh..🍨🍨 Bhagyashree Lele -
वांग्याची चटणी (wangya chi chutney recipe in marathi)
#GA4 #week4 #चटणी साठी खूप options होते, अजून अवकाश आहे, जवळपास काय मिळू शकेल याचा अंदाज घेणं चालू होतं. आणि आमची घरमालकीण बागेतली ताजी ताजी वांगी घेऊन आली. इथे आल्यापासून महिन्याभरात तिने बागेतली भरपूर वांगी दिली होती. वांग्याची रस्सा भाजी, भरली वांगी, भरीत, वांगी भात, वांगीपोहे सगळं करून झालं होतं. थोडक्यात वांगी खाऊन कंटाळा आला होता म्हणा ना.पण मग एकदम सुचलं याची मस्त #चटणी करावी. गंमत म्हणजे याला लागणारं सगळं सामान घरात होतं, त्यामुळे बाहेर कुठे जाऊन शोधाशोध करावी लागणार नव्हती (नाही म्हणायला इथे कढीपत्ता मिळाला नाही, पण काश्मीर मध्ये कढीपत्ता वापरतच तर मिळणार कुठून? असो. तुम्ही मात्र नक्की वापरा हां). मग लागलीच हुरूप आला. आणि चटणी हा कीवर्ड फिक्स करून #वांग्याची चटणी बनवली.सांगायची गोष्ट म्हणजे तिला, तिच्या घरच्यांना आणि माझ्याही घरच्यांना खूप आवडली ही चटणी. तुम्ही पण करून बघा आणि कोणत्या पदार्थाबरोबर खाल्ली तेही कळवा. कारण ही खरोखर कश्याही बरोबर खाता येते, डब्यात देता येते. पाण्याचा वापर नसल्याने आरामात टिकते, प्रवासात नेता येते.मी यात लसूण वापरला आहे पण नाही वापरला तर जे लसूण खात नाहीत त्यांनाही बनवून खाता येईल. मुलांना तर फार आवडते. Rohini Kelapure -
-
आंबट गोड वरण (ambat god varan recipe in marathi)
#रेसिपीबुक#खाटी #week2 रेसिपी बुक या माझ्या सखीने सांगितलेल्या *गावाकडच्या आठवणी* या पुष्पातील दुसरी गोड आठवण ...माझ्या आजोळची..मामाच्या गावाची..मामाचा गाव हा आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय...माझं आजोळ *कडूस* पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक छोटंस, सुंदर गांव..मनाचा हळवा कोपराच..सुट्टया लागल्या की आम्ही चाललो मामाच्या गावाला..टुमदार वाडे, गल्लीबोळातले रस्ते, निसर्गरम्य परिसर, चहुबाजूंनी शेती, जिल्हा परिषदेची शाळा..सगळं काही उत्साहाला प्रेरित करणारं..आमच्या कडूसचे पंचक्रोशीतील प्रसिद्ध श्री पांडुरंग देवस्थान🙏...गेली ३७४ वर्ष येथे माघ शुद्ध दशमी ते माघ शुद्ध पौर्णिमा हे सहा दिवस श्री पांडुरंगाचा उत्सव अव्याहतपणे सुरू आहे.तुकाराम महाराजांनी या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली.ते २८ वर्ष या उत्सवाला येत होते. दहा दिवसात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काकड आरती होत नाही..कारण तुकाराम महाराजांच्या विनंतीनुसार प्रत्यक्ष पांडुरंग येथे विश्रांती घेतात..महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातून पण भाविक दर्शनासाठी येतात ..त्यांच्यासाठी अन्नछत्र चालू आहे..हजारो भाविक पंगतीचा लाभ घेतात..अशा या उत्सव काळातील पंगतीतील एक अविभाज्य पदार्थ म्हणजे *खाटी*...अर्थात आंबट गोड वरण..ज्याची चव केवळ अलौकिकच...भात पोळी बरोबर खाल्ली जाते..*खट्टी* या शब्दाचा अपभ्रंश होऊन *खाटी* म्हणत असावेत..खाटी..खाटी..खाटी...असं म्हणत वाढायचं शास्त्र आहे ते...😄आणि पानात पडताच खाटी ओरपताना तिचे ओघोळ हातातल्या कोपरापर्यंत जावेच लागतात...चला तर मग सुरू करुया आजची रेसिपी...😊4..#खाटीअर्थात Bhagyashree Lele -
अळूच फदफद (aluch fadfad recipe in marathi)
#श्रावण स्पेशल cooksnap Challenge#महाराष्ट्रीयन रेसिपी.मी नंदिनी अभ्यंकर ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#md आज जागतिक मातृदिन 💐 कूकपॅड वरच्या माज्या सर्व माता ,भगिनी, मैत्रिणी यांना जागतिक मातृदिन च्या हार्दिक शुभेच्छा💐.आई म्हणजे आ-आत्मा व ई- ईश्वर अशी जिची महती तिच्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच ,या सुष्टीची निर्माती ती पृथ्वी माता . आई म्हणजे पहिलं प्रेम,पहिला गुरू, पहिला उच्चारलेला शब्द ,पहिली मैत्रीण,ती म्हणजे सर्व आयुष्य,अश्या या माझ्या आईच्या स्मृतीस वंदन करून तिच्याकडुन शिकलेल्या व माज्या आवडीच्या पाककृती शेयर करते. तसं तर माझी आई सुगरण होती त्यामुळे तिच्या हातचं सगळंच मला आवडायचं पण आज या दिनाचे निमित्ताने मी आज तिच्या हातचा एक गोड पदार्थ शेयर करत आहे ते म्हणजे मँगो लस्सी ,ती लस्सी मिक्सरमध्ये न करता हाताने व्हीस्क चा वापर करून छान फेटून करायची तर बघू मग तिच्या हातची सोप्या पद्धतीने केलेली मँगो लस्सी.. Pooja Katake Vyas -
खतखतं (khatkhat recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap #DeepaliDakeMunshiदिपाली ताई,मी कुकस्नॅप केलेली खतखतं या रेसिपीशी बहुतांशी साधर्म्य असलेली भाजी आमच्या परिसरात गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे ऋशीपंचमीच्या दिवशी केली जाते. या दिवशी बैलाच्या कष्टाचे पदार्थ न वापरता जेवण बनविले जाते. त्यामुळे ही भाजी बनविण्यासाठी नैसर्गिक रित्या उगविणारे घटक वापरले जातात. मी ही रेसिपी बनविताना त्या पारंपारिक पद्धतीने बनविण्याचा प्रयत्न केला आहे. Ashwini Vaibhav Raut -
नारळाच्या दुधातली अळूवडी (naralachya doodhatli aluwadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #पारंपरिक पदार्थउकडून🥖, फोडणी🌀🍥 देऊन किंवा शॅलो फ्राय करून आपण नेहमी अळूवडी🍀🌀 करतो, पण ही आहे नारळाच्या दुधात🥥🥛 शिजवलेली अळूवडी🥘🍥🌀. माझ्या चुलत सासूबाई म्हणजे नवरोबांची मोठी काकी (आम्ही त्यांना नवसईच्या आई म्हणतो... नवसई गावाचे नाव आहे बरं, उगीच सस्पेन्स मध्ये नका जाऊ😜😜) खूप छान करायच्या.. आता वयानुसार नाही जमत त्यांना, पण अजूनही गावी गणपती मध्ये नैवेद्याच्या ताटात हा पदार्थ कम्पल्सरी... आणि त्यांच्या हातच्या नारळाच्या दुधात केलेल्या आळुवड्या म्हणजे सगळ्यांसाठी पर्वणी असायची.आता आम्ही सगळ्या सूना मिळून करतो पण ह्या लुगडं/पातळ नेसणाऱ्या म्हाताऱ्या बायकांच्या👵🏼🧕🏼 हाताला कसली चव होती, अगदी मोजक्या वेळेत आणि मोजके जिन्नस वापरून केलेले पदार्थ सुद्धा इतके रुचकर😋😋 कसे व्हायचे हे एक न उलगडलेले कोडे आहे. माझी आजी सुद्धा अशीच सुगरण. घरात असलेल्या भाज्या🍆🍅🥔🥬🍤🌶️🧄 आणि काही मसाले एका भांड्यात🍜🍲 कालवून ते भांडे चुलीवर🔥 ठेवायची. आणि घरा मागच्या वाडीत काहीतरी काम करायला🌱🌿🎋 निघून जायची, परत आल्यावर भाजी तयार🥘 आणि ती पण अतिशय चविष्ट. 😋😋😋मूळ मुद्दा राहिला बाजूला🤦🏻♀️तर बघुया नारळाच्या दुधात केलेली अळूवडी.😋🌀👌🏻 नेहमीसारखेअळूच्या पानाचे रोल करून न शिजवता कापायचे. कुकर मध्ये थोडे जास्त तेल घालून जिरे हिंग मोहरी कढीपत्ता याची फोडणी देऊन त्यात रचायचे मग वरून नारळाचे दूध घालून ४-५ शिट्ट्या घ्यायच्या. ही अळुवडि दुसऱ्या दिवशी शिली जास्तच चांगली लागते... Minal Kudu -
अननस सासव किंवा अननस सासम.. (anasas sasav recipe in marathi)
#दक्षिण #कर्नाटक #दक्षिण भारत रेसिपीजमाझ्या एका GSB मैत्रिणीच्या मुलाच्या मुंजीला मी गेले होते.. त्या मुंजीच्या जेवणात मी पहिल्यांदा अननसाचे सासव खाल्ले. खूप रुचकर खमंग चटपटीत अशा चवीचे ते होते. म्हणूनच तिच्याकडे सहज मी चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं की गोव्यापासून ते कर्नाटक राज्यातील उडपी, मेंगलोर ,कारवार या जिल्ह्यांमध्ये अननसाचे सासव प्रामुख्याने शाकाहारी जेवणात करतात. पण प्रामुख्याने उडुपी मंगलोरमध्येकरतात.गप्पांच्या ओघात उडुपी चं तेराव्या शतकात बांधलेलं श्रीकृष्ण मंदिर मठ आणि एक हजार वर्षांपूर्वी चे जुने भगवान शंकरांचे चंद्रमौलेश्वर मंदिर तसेच उडुपी रेस्टॉरन्ट मधील स्वादिष्ट व्यंजने आणि शिक्षणाची पंढरी मणिपाल , माल्पे चा अद्भुत नितळ बीच,सेंट मेरीज हे निसर्गाच्या सृष्टिसौंदर्याने नटलेले नितांत सुंदर शांत रम्य बेट ही सर्व बघण्यासाठी तू नक्कीच एकदा तिकडे भेट दे असेही आवर्जून सांगितले . मैत्रिणीने एक मजेदार कथा सांगितली ती अशी आपल्या 27 नक्षत्रांनी,तारृयांनी चंद्राबरोबर लग्न केलं होतं आणि त्यानंतर लगेच चंद्राचा आपला प्रकाश, आपली चमक लुप्त झाली. मग यावर उपाय म्हणून चंद्र आणि तारे यांनी भगवान शंकरांचे शिवलिंग तयार केले आणि त्याची पूजा केली .. ते चंद्रमौलेश्वर शिवलिंग.. संस्कृत मध्ये उडू चा अर्थ आकाशातील चंद्र-तारे आणि पा म्हणजे स्वामी.. म्हणून चंद्र तार्यांचा स्वामी.. चंद्राला धारण करणारे चंद्रमौलेश्वर म्हणजेच भगवान शंकर यांच्यावरून उडुपा.. किंवा उडुपी हे नाव त्या भागाला मग मिळाले.. किती रोचक आहे ना कथा.. म्हणून याला चंद्रआणि तार्यांची भूमी देखील म्हणतात..किती सखोल ज्ञान होते तिच्याकडे..काही क्षण माझी मलाच लाज वाटली.. तर असे हे आंबा,अननस सासव तिकडे घरघरातून ओरपतात Bhagyashree Lele -
अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
#PRRअळूवडी असा पदार्थ आहे तो ताटात, पानावर वाढला जातो . प्रत्येक ताट वाढताना अळूवडी चे स्थान हे असतेचजवळपास सगळ्यांचीच आवडती अळूवडी हा पदार्थ आहे अळूवडी हा साईड डिश म्हणून सर्व्ह केला जातो.अळूची पाने जवळपास सर्वत्रच उगतात आणि सगळीकडेच अळूवडी ही बनवली जाते.भजीच्या प्रकारासारखाच हा प्रकार असतो बनवतानाही खूप छान वाटते आणि तयार झाल्यावर पटकन संपते पण.भारतात सर्वत्रच अळूवडी तयार होते आणि सगळेच याचा आनंद घेतात. सर्वात जास्त महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात सर्वात जास्त हा पदार्थ लोकप्रिय आहेअळूवडी याला गुजरातीत पात्रा अजूनही बऱ्याच वेगळ्या नावाने लोक या पदार्थाला ओळखत असेल.बऱ्याच ठिकाणी अळूवडी बरोबर पोळीही खातात आणि बऱ्याच ठिकाणी हिरवी चटणी मिरची बरोबरही अळूवडी खातात. वरण-भाताबरोबरही अळूवडी खूप छान लागतेआता वळूया रेसिपी कडे. Chetana Bhojak -
केळी कोशिंबीर उपवासाची (keli koshimbeer recipe in marathi)
#आई उपवासासाठी स्पेशल हि रेसिपी बनवत भावाला आवडत असे म्हणून.उपवासाला वेगवेगळे पदार्थ नेहमीच घरात बनत असे आणि आई आमच्यासाठी केळाचे स्पेशली कोशिंबिरी थालीपीठ बरोबर खाता यावे म्हणून बनवत होती. त्या आठवणींना स्मरून मी आईसाठी ही डेडीकेट करते आणि इथे केळ्याची कोशिंबीर ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. जरुर ट्राय करा आणि एन्जॉय करा. Sanhita Kand -
अळुवडया (alu vade recipe in marathi recipe in marathi)
#ashr#अळुवडी आवडत नाही असा माणूस विरळाच. नांव काढलं तरी तोंडाला पाणी सुटले ना.पावसाळ्यात अळूच्या पानांना वेगळीच छान चव असते .या दिवसात केलेली अळुवडी अप्रतिम लागते.अळुमधे औषधी गुणधर्म खुप आहेत. अळुमधे ए,बी,सी जीवनसत्वे,कॅल्शियम,पोटॅशियम असते अॅन्टीऑक्सिडंट चे प्रमाण जास्त असल्याने प्रकृतीसाठी फायदेशीर आहे.शिवाय पित्त कफनाशक आहे.बाळंतिणीला जर दुध येत नसेल तर भाजी खायला देतात.असा हा बहुगुणी अळु त्याची जर अळुवडी केली तर आणखीन बहार.चला तर कशी करायची बघुयात. Hema Wane -
ड्राय फ्रुट उकडीचे मोदक (dryfruit ukadiche modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पा मोरया🙏🌹🙏 गौरी -गणपती उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐 गणपती बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक मी आज बनविलेल्या आहे,तर मग पाहुयात ड्राय फ्रूट उकडीचे मोदक रेसिपी... Pooja Katake Vyas -
बेरीची चीक्की (berichi chikki recipe in marathi)
#बेरीचिचीक्कीतूप केल्यानंतर उरलेली बेरी संपवायची कशी बय्राच वेळी साखर बेरी किंवा केक मध्ये वापरून संपवली जाते . तर आज अशीच बेरीची कुरकुरीत रेसिपी बनवली आहे कशी झालीय बघूया कशी झालीय ही रेसेपि बघूया. Jyoti Chandratre -
कोल्हापूरचे रावण पिठलं (kolhapuriche ravan pithla recipe in marathi)
#md #mother's Day recipe #रावण पिठलं..Happy Mother's Day 🥰🌹❤️ Happy Mother's Day to you all..😊💐 आई....आ...आत्मा आणि ई... ईश्वर यांचा वास *आई *या दोन शब्दात आहे.. परमात्म्याचा वास आईच्या रुपाने आपल्या ठायी अाहे..आई शब्दात सार्या जगाची ताकद सामावलीये..सगळी माया ,ममता,प्रेम तिच्यात सामावलंय..*आई *म्हणजे आपल्या आयुष्याला वळण लावणारं,अनुभवांची शिदोरी देणारं,खंबीरपणे आधार देणारं हस्तलिखितच जणू...त्यातील प्रत्येक पान दिशादर्शक,प्रत्येक पानावर जाणवणारी तिची आभाळमाया,घाबरु नकोस..मी आहे हा विश्वास , ज्ञान संस्काराची दिलेली आणि कायम पुरणारी शिदोरी..असे हे मानाचं सदैव हिरवेगार पान..हे पान सदैव ज्ञान,संस्कार,DNA च्या रुपात आपल्याबरोबर असतं..आंब्याच्या पानांचा रंग ते पान सुकलं तरी बदलत नाही..हिरवच राहातं तसंच आईचं प्रेम,माया कधीच आटत नाही..ते आपल्या जन्माच्या आधीपासून जसं असतं तसंच कायम राहतं..आईच्या नऊ नाड्यांची आपण कधीच उतराई होऊ शकणार नाही..तर अशी ही वात्सल्याचा सिंधू म्हणजेच वात्सल्याचा सागर असलेली प्रत्येकाची आई..तिला कशाचीच तोड नाही..एकमेवाद्वितीय...!!!! आपली शीतल छाया...🥰.. सर्व मातृदेवतांना माझं नमन, 🙏🌹🙏माझ्या आईच्या हातचं पिठलं हा प्रकार माझ्या खूप आवडीचा..मग ते कुठलंही पिठलं असो..तव्यावरचं असो,झुणका असो,थोडं पातळसर गुठळ्यांचे असो..किंवा रावण पिठलं असो.. अप्रतिम चव..😋😋..चला तर मग आपण रेसिपी कडे जाऊया.. Bhagyashree Lele -
मिक्स पिठाची पौष्टिक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#मिक्स पिठाची पौष्टिक अळू वडीअळू वडी हा एक पारंपरिक प्रकार आहे यात मी थोडा नाविन्यता आणुन पौष्टिक वकुरकूरीत अशी अळू वडी बनवली आहे.आमच्या कडे जनता कर्फ्यू मुळे मला अळूची पाने मिळत नव्हती. माझ्या एका मैत्रिणीला मी बोलले तिने लगेचच तिच्या कुंडितील अळूची पाने काढून दिली मी तिला आधी धन्यवाद देते. कारण मी ही थीम तीच्यामूळे पुर्ण करू शकले.हा पदार्थ पुर्वापार आपण करत आलो आहे.यात पाने वापरताना वडी लहान व कोवळी पाने तर भाजी साठी मोठी पाने वापरावी. आणि नेहमी दोघं प्रकार करताना चिंच कोळ वापरावा म्हणजे घशाला खाजरे येत नाही.आमच्या गावी (महाराष्ट्रात काही भागात नंदूरबार ,शहादा, दोंडायच्या इकडे चिंचेच्या चटणी बरोबर सर्व्ह करतात.) Jyoti Chandratre -
अंबाडीची पातळ भाजी (ambadichi patal bhaji recipe in marathi)
#mdआईच्या हाताची आंबाडीची पातळ भाजी..अतिशय मस्त करते माझी आई ही भाजी. तिच्या या भाजीला तोड नाही.. आणि तसेही मला देखील आईच्या हाताची ही भाजी खूप आवडते..चला करूया मग... *आंबाडीची पातळ भाजी*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
सिमला मिरचीचे लोणचे (shimla mirchi lonche recipe in marathi)
#GA #week4च्या पझल मध्ये सिमला मिरची हा क्लू ओळखून विचारच करत होते काय बरे बनवू?? आणि काय आश्चर्य बऱ्याच वर्षंपूर्वी खाल्लेलं सिमला मिरचीचे लोणचे आठवले.. माझी आई बनवत असे... Monali Garud-Bhoite -
खमंग खुसखुशीत अळू वडी (alu wadi recipe in marathi)
#श्रावण_स्पेशल_cooksnap_challenge#shr #cooksnap_challenge श्रावण महिना हा वेगवेगळ्या सणांचा महिना.. ऊन-पावसाचा महिना.. या दिवसात चहुकडे हिरव्यागार पानाफुलांनी बहरलेला निसर्ग पहायला मिळतो..त्या हिरव्या रंगाच्या विविध छटा पाहून मन आणि डोळे तृप्त होतात..म्हणूनच दूर्वा,तुळस,आघाडा,बेल, वेगवेगळ्या पत्री , सोनटक्का,पिवळा चाफा,मोगरा,चमेली,शेवंती,गुलाब ही फुले ..ही निसर्गाने आपल्यावर केलेली उधळण आपण देवाला वाहून निसर्गाचे देणे निसर्गाला अर्पण करुन कृतज्ञता व्यक्त करतो ..😊🙏 पावसाळ्यात पिकणाऱ्या हिरव्यागार भाज्यांची तर लयलूट असते.दोडका,पडवळ,घोसाळी,लाल भोपळा,भेंडी,काकडी,भाजीचे अळू,वडीचे अळू ..या भाज्यांचे नैवेद्य मग आपसूकच होतात..तर अशा या सणांच्या दिवसात बाहेरचे आल्हाददायक वातावरण तसेच घरामधील मंगलमय वातावरण यामुळे मन प्रसन्न प्रफुल्लित होत असते आणि म्हणूनच हे सणवार आपण उत्साहाने साजरे करतो..असाच एक घरोघरी साजरा केला जाणारा सण म्हणजे श्रावणी शुक्रवारची श्री जिवती देवीची पूजा..🙏🌹🙏..आपल्या मुलाबाळांना आयुरारोग्य,सुख समाधान,यश प्राप्त व्हावे म्हणून महिला जिवतीची पूजा करतात..आघाड्याची माळ, विविध फुले वाहतात..पुरणावरणाचा,चणेगुळ,दुधाचा नैवेद्य दाखवतात,सवाष्णीला जेवायला बोलावून तिचे मनोभावे पूजन करुन खणा नारळाचे ओटी भरुन आपल्या मुलाबाळांसाठी उदंड आयुष्य मागतात..संध्याकाळी पुरणाची दिवे करून जिवतीला ,तिच्या बाळांना,आपल्या मुलाबाळांना औक्षण करतात..जिवतीची कहाणी वाचतात.श्री जिवतीला दाखवण्यात येणार्या नैवेद्यातील एक महत्वाचा पदार्थ म्हणजे अळूवडी..ही नैवेद्याच्या पानात हवीच..तर मी आज@ArtiTareयांचीरेसिपीcooksnapकेलीआहे.Thank you आरती.. खूप मस्तखमंग झाली अळूवडी😊🌹❤️ खूप आवडली मला..🌹 Bhagyashree Lele -
अळूचं गरगटं (alucha gargata recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#सात्विक-बिना कांदा- लसुण रेसिपी #पोस्ट 2 आज मी अळूचं गरगटं केल.आमच्या कडे श्रावणात उपवास सोडते वेळी ही भाजी आवर्जून खाल्ली जाते. नुसती खायला पण ही भाजी छान लागते. तिखट, गोड,आंबट या तिन्ही चवींचा सुरेख संगम या भाजीमधे छान जुळून येतो.🥰🥰🥰 Shubhangee Kumbhar -
अळूवडी (alu wadi recipe in marathi)
#पश्चिम # महाराष्ट्र😋अळूवडी😋अळूवड्या खायला जेवढ्या खमंग चटकमटक-कुरकरीत,असतात तेवढ्याच करायला खूप मेहनत, कठीण,आणि वेळखाऊ असतात. करणाऱ्याचा दम काढणाऱ्या आणि त्यांच सर्व कसब पणाला लावणाऱ्या असतात. कारण अळूवड्या बनविताना त्यांची चव व्यवस्थित जमवावी लागते. वडीला आंबटगोड चव लागली नाही, तर अळूवडी 'ही अळूवडी लागतच नाहीत😊अळूवड्याच हे'अळूवडीपण' असतं पानांना लावले जाणारे मसाले , त्यात वापरले जाणारे जिन्नस, पिठाचे प्रमाण, पिठाचा घट्टपणा ह्यात ते जमलं की अळूवडी तुम्हाला जमलीच समजा.😋खमंग-कुरकुरीत अळूवडी तोंडात टाकल्यावर तिची जी आंबड-गोड चव जिभेवर रेंगाळते, तिचं वर्णन करायला शब्दही सापडत नाहीत. त्यासाठी अळूवडी बनवून एखादी अळूवडीच तोंडात टाकायला पाहिजे हा.(कधी घेताय मग बनवायला)😃कुणाच्याही तोंडाला पाणी आणणाऱ्या अळूवड्या या जाडसर मोठ्या चमकदार पानांच्या,काळसर देठाच्या अळूपासूनच बनवतात. Prajakta Patil -
कूल कूल कलिंगड डिलाईट...(cool cool Kalingad delight recipe in marathi)
#jdr की वर्ड--कलिंगड.. बा अदब बा मुलाहिजा होशियार.. राजाधिराज ऋतुराज वसंत महाराजांचे प्रधानजी श्री.कलिंगड रसाळ यांचे आपल्या साथीदारांबरोबर राज्यात आगमन झाले आहे होsssss.. तरी प्रजेच्या ज्या काही तक्रारी असतील त्यांचे निवारण करण्यासाठी प्रधानजी श्री.कलिंगड रसाळ सर्व तयारीनिशी सज्ज आहेत होssssss.. सर्व प्रजाजनांना विनंती करण्यात येत आहे की प्रधानजी रोज दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत राजदरबारात उपलब्ध असतील..तरी सर्वांनी उपस्थित राहून आपापल्या तक्रारींचे ,त्रासाचे प्रधानजीं कडून निवारण करुन घ्यावे होssssss.. विशेष सूचना..सध्याच्या कोविड काळात कृपया मास्क लावून यावे..अन्यथा राजदरबारात प्रवेश नाकारला जाईल आणि social distancing देखील पाळायचे आहे..त्यासाठी Rajdarbar.Com या संकेतस्थळावर जाऊन registration करावे..मग तुम्हांला ठराविक वेळ दिली जाईल..त्यावेळेस उपस्थित रहावे..वेळ चुकवू नये होsssss.. ही दवंडी ऐकताच मी देखील appointment घेऊन प्रधानजींना जाऊन भेटले आणि उन्हाच्या काहिलीची तक्रार केली..प्रधानजींनी माझ्या तक्रारीची ताबडतोब दखल घेतली आणि मला उपाय सुचवला..कोणता???🤔🤔.. ऐकायचाय..चला तर मग माझ्या बरोबर सांगते तुम्हांला..😊😊 Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या