एगलेस बनाना मफिन्स (eggless banana muffin recipe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#रेसिपीबुक #week13
#इंटरनॅशनल
मफीन्स हा अमेरिकन पदार्थ आहे. ब्रिटन मध्ये याला 'अमेरिकन मफिन्स' असंच म्हणतात. सकाळच्या न्याहारीला हा प्रकार खाल्ला जातो. मफिन्स दोन प्रकारचे असतात - एक फ्लॅटब्रेड सारखे  आणि दुसरे कप केक सारखे. हे गोड किंवा तिखटमिठाचे ही बनवले जातात. माझी ही रेसिपी बनाना मफिन्स ची - तीही अंडं न घालता केलेली. खूप स्वादिष्ट लागतात हे मफिन्स. आणि रेसिपी अगदी सोपी आहे. - अमेरिकन ब्रेकफास्टचा लोकप्रिय पदार्थ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपकणिक / मैदा
  2. पिकलेली केळी मध्यम आकाराची
  3. 1/3 कपसाखर
  4. 1/4 कपतूप / तेल
  5. 3/4 टीस्पूनबेकिंग पावडर
  6. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  7. 1/4 टीस्पूनदालचिनी पूड
  8. चिमूटभर मीठ
  9. १-२ टेबलस्पूनदूध (गरज पडल्यास)
  10. 1 टेबलस्पूनमध
  11. आवडीनुसार सुका मेवा

कुकिंग सूचना

50 मि
  1. 1

    एका वाडग्यात केळी सोलून कुस्करून घ्या. त्यात साखर, मध आणि तूप/तेल घालून चांगलं एकत्र करून घ्या.

  2. 2

    दुसऱ्या वाडग्यात कणिक, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ आणि दालचिनी पूड एकत्र करून घ्या.

  3. 3

    कणकेच्या वाडग्यात केळ्याचे मिश्रण घाला आणि एकत्र करा. जास्त फेटू नका.

  4. 4

    मिश्रण फार घट्ट असेल तर थोडे दूध घालून मिक्स करा.

  5. 5

    ओव्हन १९० डिग्री वर गरम करून घ्या.

  6. 6

    मफिन साच्याना तूप लावून त्यात मोठ्या चमच्याने मिश्रण घाला. पाऊण साचा भरेल एवढं मिश्रण घाला. वरून सुका मेवा घाला.

  7. 7

    ओव्हन मध्ये १९० डिग्री वर ३०-३५ मिनिटं बेक करा.

  8. 8

    गरमागरम बनाना मफिन्स कॉफीसोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
रोजी

Similar Recipes