बेसन मावा बर्फी (besan mava barfi recipe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#रेसिपीबुक #week14
साखरेच्या पाकाचं झंझट नाही,बेसनाचा गोड पदार्थ खूप खमंग आणि स्वादिष्ट लागतो. आणि बेसनाच्या बर्फीत मावा / खवा घातला तर सोने पे सुहागा. ही बेसन मावा बर्फी बनवायला अगदी सोपी आहे कारण यात साखरेचा पाक न घालता पिठीसाखर घातली आहे. त्यामुळे बर्फी फसण्याची शक्यता जवळजवळ शून्य.

बेसन मावा बर्फी (besan mava barfi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week14
साखरेच्या पाकाचं झंझट नाही,बेसनाचा गोड पदार्थ खूप खमंग आणि स्वादिष्ट लागतो. आणि बेसनाच्या बर्फीत मावा / खवा घातला तर सोने पे सुहागा. ही बेसन मावा बर्फी बनवायला अगदी सोपी आहे कारण यात साखरेचा पाक न घालता पिठीसाखर घातली आहे. त्यामुळे बर्फी फसण्याची शक्यता जवळजवळ शून्य.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मि
8 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपबेसन
  2. 2 टेबलस्पूनबारीक रवा
  3. 1 कपमावा / खवा
  4. 2 कपपिठीसाखर / बुरा साखर
  5. 1 टेबलस्पूनदूध
  6. 1 कपसाजूक तूप (अंदाजे)
  7. 1/4 टीस्पूनवेलची पूड
  8. ८-१० बदाम पातळ तुकडे करून
  9. ८-१० काजू पातळ तुकडे करून

कुकिंग सूचना

60 मि
  1. 1

    मावा / पेढे कुस्करून घ्या आणि एका जाड बुडाच्या कढईत मंद आचेवर २ मिनिटं परतून घ्या. एका ताटलीत काढून घ्या. 

  2. 2

    त्याच कढईत तूप घालून बेसन आणि रवा घाला. आणि मंद आचेवर खमंग भाजून घ्या. बेसन भाजल्याचा छान सुगंध आला पाहिजे. हे मिश्रण प्रवाही असू दे. त्यासाठी जरूर पडेल तर आणखी १-२ चमचे तूप घाला.

  3. 3

    गॅस बंद करून मिश्रणात दूध घाला आणि लगेच नीट ढवळा. मिश्रणातले बुडबुडे येणं बंद होईपर्यंत ढवळा.

  4. 4

    मिश्रण एका मोठ्या वाडग्यात काढून गार करायला ठेवा. बर्फी थापण्यासाठी एका ताटलीला तूप लावून ठेवा.

  5. 5

    मिश्रण कोमट झालं की त्यात भाजलेला मावा घालून मिक्स करा.

  6. 6

    पिठीसाखर, वेलची पूड आणि सुक्या मेव्याचे तुकडे घाला. थोडे तुकडे सजावटीसाठी बाजूला ठेवा.

  7. 7

    मिश्रण नीट मिक्स करा. आता मिश्रण घट्ट होत आलं असेल. तूप लावलेल्या ताटलीत मिश्रण घालून कायलाथ्याने समतल करून घ्या. वर सुक्या मेव्याचे तुकडे घालून हलक्या हाताने दाबून घ्या.

  8. 8

    ताटली गार करत ठेवा. व्यवस्थित गार झाल्यावर मिश्रण घट्ट होतं आणि वड्या कापता येतात. सुरीच्या साहाय्याने वड्या कापून घ्या.

  9. 9

    वड्या काढण्याआधी ताटली जरा गरम करून घ्या. वड्या अगदी सहज काढता येतात.

  10. 10

    स्वादिष्ट बेसन मावा बर्फी तयार आहे. ही बर्फी फ्रिजबाहेर ५-६ दिवस राहते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
रोजी

Similar Recipes