फराळी खिचडी (farali khichadi recipe in marathi)

Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
Mumbai

#GA4 #week11
#कडधान्य
#कार्तिकीएकादशी🙏🏻

फराळी खिचडी (farali khichadi recipe in marathi)

#GA4 #week11
#कडधान्य
#कार्तिकीएकादशी🙏🏻

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
2 व्यक्तींसाठी
  1. 1 कपहिरवे मूग
  2. 1बटाटा🥔
  3. 2हिरव्या मिरच्या🌶
  4. १०० ग्रॅम पनिर
  5. 1/2 टीस्पूनजीरे
  6. 1 टीस्पूनसाखर
  7. चवीनुसारमीठ
  8. 1/4 कपशेंगदाणे कूट🥜
  9. 1/4 कपओला नारळ (खोवलेला)🥥
  10. 1/2लिंबु
  11. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    मूग ५-६ तास भिजवत ठेवा, नंतर पाणी उपसून थोडे नवीन पाणी घाला, चिमुटभर मीठ व किंचित तेल घालून मूग उकडवून घ्या. इतर साहित्य फोटोत दर्शविले आहेच.

  2. 2

    बटाटा, पनीर, मिरची चिरून घ्या. मंद आचेवर पॅन गरम करून त्यात तेल गरम करून जिऱ्याची फोडणी करून घ्या.

  3. 3

    यांत मिरची व बटाटा सोडून वर झाकण ठेवा, म्हणजे फोडणी तडतडली तरी गॅस खराब होणारं नाही. बटाटा शिजला की यांत पनीर सोडा, पनीर एकदा परतले की यांत उकडलेले मूग घाला.

  4. 4

    यांत चवीनुसार मीठ व साखर घालून एकजीव करा व वरून झाकण ठेवा. पाच मिनिटे उकळी येऊ द्या. नंतर झाकण उघडून ओले खोबरे घालून पून्हा एकजीव करा.

  5. 5

    आत्ता शेंगदाणे कूट घालून पून्हा छान परतून घ्या. वरून लिंबू पिळून गॅस बंद करा. गरमागरम खिचडी सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes