मिरचीचे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)

बाजारात मिळणाऱ्या भाज्या घरातच उगविण्याचे, आमचे जे प्रयोग मागच्या काही महिन्यांपासून सुरु आहेत त्यातला एक यशस्वी प्रयोग म्हणजे मिरच्या. मिरचीच्या बिया एका लहान कुंडीत टाकल्या होत्या. त्यांची इतकी रोपे झाली की चार कुंड्यांमधे विखरून लावावी लागली. मिरचीची रोपे हातभर उंचीची झाल्यावर, एका वाऱ्या-पावसात खुपच झोडपली होती. त्यांना काही काळ घरात ठेऊन सांभाळले आणि तरतरीत झाल्यावर पुन्हा बाहेर ठेवली. या मैत्रीचे त्यांनी भरभरून रिटर्न गिफ्ट दिले. ते गिफ्ट जास्तीत जास्त काळ सोबत रहावे म्हणून त्यांचे लोणचे भरायचे ठरवले.
मिरचीचे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)
बाजारात मिळणाऱ्या भाज्या घरातच उगविण्याचे, आमचे जे प्रयोग मागच्या काही महिन्यांपासून सुरु आहेत त्यातला एक यशस्वी प्रयोग म्हणजे मिरच्या. मिरचीच्या बिया एका लहान कुंडीत टाकल्या होत्या. त्यांची इतकी रोपे झाली की चार कुंड्यांमधे विखरून लावावी लागली. मिरचीची रोपे हातभर उंचीची झाल्यावर, एका वाऱ्या-पावसात खुपच झोडपली होती. त्यांना काही काळ घरात ठेऊन सांभाळले आणि तरतरीत झाल्यावर पुन्हा बाहेर ठेवली. या मैत्रीचे त्यांनी भरभरून रिटर्न गिफ्ट दिले. ते गिफ्ट जास्तीत जास्त काळ सोबत रहावे म्हणून त्यांचे लोणचे भरायचे ठरवले.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मिरच्या स्वच्छ धुवून व पुसून घ्याव्यात. मिरचीचे साधारणपणे एक इंचाचे तुकडे करून घ्यावे.आता चित्रात दाखवल्याप्रमाणे सगळे साहित्य घ्यावे. राई पूड एकदा मिक्सरला फिरवून घ्यावी.
- 2
आता एका टोपात तेल घेऊन चांगले कडकडित गरम करावे. त्यात मोहरी घालावी. मोहरी छान तडतडली की गॅस बंद करावा. आणि तेल थंड करून घ्यावे.
- 3
तेल थंड झाल्यावर त्यात हिंग, हळद, मेथीची पूड, राईची पूड, मीठ व लिंबाचा रस घालून चांगले फेसून घ्यावे.
- 4
नंतर त्यात विनेगर घालून नीट एकजीव करून घ्यावे. तयार तेलाच्या मिश्रणात मिरचीचे तुकडे घालून व्यवस्थित मिक्स करावे.
- 5
मिरचीचे लोणचे तय्यार!!!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिरचीचे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)
#GA4 #Week13 की वर्ड- Chille..मिरचीलवंगी मिरची कोल्हापूरची... एवढीशी कार्टी कानामागून आली आणि तिखट झाली.. सांगा बरं या कोड्याचे उत्तर .. हो तीच ती.. सुबक ठेंगणी ठुसकी.. पण जिभेवर जहाल तोरा मिरवणारी.. भल्याभल्यांना घायाळ करणारी.. नुसत्या नावानेच,वासानेच मेंदूला झिणझिण्या आणणारी ..तिच्या ठसक्यानेच अर्धमेली अवस्था करणारी..पहिल्या घासातच नाका तोंडातून धूर, कपाळावर घर्मबिंदु, चेहऱ्याला जिभेला शरीराला आग लावणारी .. अशी ही स्वभावाने तिखट असली तरी आपण तिच्या याच रूपा गुणांवर परत परत भाळतो अशी.. आणि तिला कायमचे आपल्या जीवनात स्थान देतो.. स्थान देतो कसले.. तिच्याशिवाय जगणेच अशक्य ..कारण तिच्या अस्तित्वामुळेच आपले खाद्यजीवन पर्यायाने सारे जीवन रुचकर झालंय..परम सुखाचा अनुभव देणारी अशी ही नखरेल नार लवंगी मिरची कोल्हापूरची..हिची मोहिनी इतकी की लसूण मिरची कोथिंबिरी..अवघा झाला माझा हरी याअभंगापासून नाव कशाला पुसता मी हाये कोल्हापूरची..मला हो म्हनत्यात लवंगी मिरची... लवंगी मिरची मी कोल्हापूरची लगी तो मूश्किल होगी..हाय हाय मिरची उफ उफ मिरची म्हणत एखाद्या रुपगर्वितेला, स्त्री ला लावलेल्या विशेषणापर्यंत या तिखटाच्या राणीचा प्रवास ..थांबा थांबा हा प्रवास इथेच नाही थांबत बरं..तो आलं लसूण मिरची एकदा कडाक्याचे भांडले..मग आजीने त्यांना कुटून काढले..या बडबड गीतापर्यंत जाऊन ते वाक्यप्रचारा पर्यंत पोचतो ना राव..आहात कुटं.. कानामागून आली तिखट झाली, नाकाला मिरची झोंबणे..हा हा..बरं एवढ्यावर थांबेल का ही राणी..रेडिओ station ला हिचेच नाव.. रेडिओ मिरची..मिरची awards..हॉटेलांना पण हिचेच नांव..हे इतकं थोडं नव्हतं म्हणून की काय आता आईस्क्रीम मध्ये पण हिचाच झटक..हुश्श..बाईमीच याझटक्यानेकामकरेनाशी Bhagyashree Lele -
झटपट मिरचीचे लोणचे(राजस्थानी स्टाईल) (jhatpat mirchi che lonche recipe in marathi)
#GA4 #week13 #chilly #cooksnapगोल्डन एप्रन 4 - आठवडा 13 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड मिरची शोधून मी इन्स्टंट चिली पिकल तयार करून बनवले.झटपट मिरचीचे लोणचे ( इन्स्टंट चिली पिकल) ही रेसिपी मी कुकपॅड हिंन्दी लेखिका Rafiqua Shama यांची मूळ रेसिपी, "Hari Mirch Ke Tipore" मधून तयार करून बनविली.इन्स्टंट चिली पिकल ही प्रसिद्ध राजस्थानी साईड डिश जी कमी वेळात बनवतात. मसाल्यांनी शिजवलेल्या हिरव्या मिरच्यांचे अप्रतिम चव देणारी लोणच्याची रेसिपी आहे.या रेसिपीसाठी पसंतीनुसार आपण कोणत्याही प्रकारची ताजी हिरवी किंवा लाल मिरची वापरू शकता. Pranjal Kotkar -
हळद-मिरची लोणचे (harad mirchi lonche recipe in marathi)
थंडीमध्ये भरपूर भाज्या आणि फळं मिळतात.त्यापैकीच मिळते ती ओली हळद!हळद ही अँटी ऑक्सिडंट आहे.ओल्या हळदीने लोणच्याला स्वाद निराळाच येतो. थंडीत काहीतरी झणझणीत खावेसे वाटतेच...तेव्हा हे लोणचे नक्की करुन पहा!धिरडी,थालिपीठं, भाकरी बरोबर जेवणाची रंगत वाढवते....चटकदार हळद-मिरचीचे लोणचे!!😋😋 Sushama Y. Kulkarni -
लिंबू मिरचीचे लोणचे (limbu mirchi lonche recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#लिंबू मिरचीचे लोणचेहिवाळ्यात लिंबू आणि हिरव्या मिरच्या बाजारात खुप छान मिळतात. याच सिजन मध्ये लिंबूचे लोणचे बनवतात . अगदी साधे कच्चे लोणचे मी बनवले आहे. याला सपाक लोणचेही म्हणतात. Jyoti Chandratre -
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10 #W10 हल्दीका उबटन लगाऊँ तुम्हे.... तेरी काया को कंचनसा निखाँरु...विकोटर्मरिकच्या या जाहिरातीत हळद लावतानाचा प्रसंग सगळ्यांना आठवतोय का?सौंदर्यप्रसाधनामध्ये,औषधांमध्ये पूर्वापार वापर होत असणारी हळद हे एक उत्तम antioxidant, anti imphlametory आहे.आपल्या हिंदू संस्कृती मध्ये हळदीचा पूजे मध्ये अग्रस्थानी मान आहे.देवा पुढे ठेवल्या जाणाऱ्या विड्यामध्ये सुपारी,हळकुंड हे असतेच.ओटी भरतानाही लेकुरवाळं हळकुंड जरुर घातले जाते.हळदीचे कोंब किंवा फुटवे असतात त्याला लेकुरवाळं हळकुंड म्हणतात,म्हणजे तशीच वंशवृद्धी त्या सुवासिनीची व्हावी हा त्यातला अर्थ!ही ओली हळद वाळली की हळकुंड तयार होतं.इकडे सातारा-वाई,सांगलीला हळदीची शेती भरपूर आहे.अतिशय उत्तम प्रतीची हळद इथे पिकते.लग्नाचा मुहुर्तही सुपारी बरोबर हळकुंड फोडूनच होतो.हळदीला सोन्यासारखे तेज असते.लग्नामध्ये हळद लावणे हा मोठा सोहळाच असतो.सध्याच्या करोनाच्या काळात हळद घालून पाणी पिण्यानेही इम्युनिटी भरपूर वाढते.रोजच्या भाजी,आमटीला तर हळदीशिवाय लज्जतच नाही.कुठे कापलं,रक्त वाहु लागलं तर हळद ही हाताशी हवीच! हिवाळ्यात ओली हळद भाजीमंडईत सर्वत्र दिसू लागते.ओल्या हळदीचं लोणचं अगदी पारंपारिक आहे.ओली हळदही आयुर्वेदिक औषधी गुणधर्मांनी युक्त थोडी कडवट,तुरट चवीची,उष्ण असते.आजची ओल्या हळदीच्या लोणच्याची रेसिपी अशीच रसरशीत,लज्जतदार....चटकदार! Sushama Y. Kulkarni -
चटकदार मिरचीचे लोणचे (mirchiche lonche recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसीपीमिरची लोणचे मला तांदळाच्या भाकरीसोबत प्रचंड आवडते. ..😋😋साधा वरण भातासोबत देखील याची चव भन्नाट लागते.पाहूयात रेसिपी Deepti Padiyar -
लाल मिरचीचे लोणचे (lal mirchiche lonche recipe in marathi)
#मीर्चीचे_लोणचे .. आज बाजारामध्ये लोणच्याच्या मिरच्या लाल झालेल्या मिळाल्या आणि त्याचा कलर इतका सुंदर होता की हिरव्या मीर्ची मी घ्यायला गेले आणि लाल मिरच्या घेऊन आले .....या लोणच्याच्या कमी तिखट मीर्ची आहेत ....झाकून ठेवल्याने त्या लाल झाल्या म्हणाला भाजीवाला ...पण छान रंग आणि टवटवीत पणा छान वाटला म्हणून मी घेतल्या आमी नेहमी प्रमाणे सूंदर झटपट मीर्चीचे लोणचे बनवले ... Varsha Deshpande -
लाल मिरचीचे गोड लोणचे (Lal Mirchiche God Lonche Recipe In Marathi)
माझ्या विहीणबाई लिलाबेन ह्यांच्याकडे मी ह्या लोणच्याची चव चाखली आणि गोड -तिखटाचा मिलाप खूप आवडला.ओल्या लाल मिरच्या बाजारात दिसल्यावर मी लगेच हे लोणचे करायला घेतले आणि खरं सांगायचं तर अप्रतिम झाले.तुमच्या साठी रेसिपी.... Pragati Hakim -
-
मिरचीचा ठेचा (mirchi cha thecha recipe in marathi)
#GA4 Week13हि रेसिपी मी गोल्डन ॲप्रन ४ मधील चिली हे किवर्ड शोधून बनविली आहे. एखादेवेळी जेवणात तिखट आणि चटकदार खायची इच्छा झाल्यास आपल्या मराठमोळ्या ठेच्याला पर्याय नाही. अगदी काही मिनिटांमध्ये तयार होणारा हा पदार्थ प्रत्येकाच्या घरी वेगळ्या पद्धतीने केला जातो. त्यातलीच ही एक रेसिपी.Gauri K Sutavane
-
झटपट मिरची चे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)
#ngnr श्रावणाच्या या पवित्र महिन्यामध्ये कांदा लसूण व्यर्ज केला जातो... अशावेळी ताटामध्ये हे मिरचीचे लोणचे असले की जेवणाची लज्जत वाढते.... Aparna Nilesh -
मिरचीचे लोणचे🌶️🌶️ (mirchi che lonche recipe in marathi)
#G4A #week13 कीवर्ड मिरची झटपट तयार होणारे मिरचीचे लोणचे खायला एकदम रुचकर नक्की करून बघा.....,🌶️🌶️ Jaishri hate -
लसणाचे लोणचे.. (lasnache lonche recipe in marathi)
#GA4 #Week24 की वर्ड--Garlicलसूण : पृथ्वीवर पडलेला अमृताचा थेंब !! आहार हेच औषध या पुस्तकात लसणाचे वर्णन अमृताचा थेंब म्हणून केला आहे. समुद्रमंथन केल्यावर देव आणि दानव यांच्यात त्याच्या प्राप्तीसाठी भांडण झाले ..अमृताचा कलश हिसकावून घेताना त्यातला एक थेंब पृथ्वीवर पडला.तो थेंब पृथ्वीच्या कुशीत रुजला आणि आंबट रस वगळता निसर्गातले पाच रस घेऊन लसुणाचा कोंब बाहेर आला..गोड , खारट , तुरट , कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त लसणाचे वैशिष्ट्य हे आहे की खारट रस नैसर्गिकरीत्या असणारा हा एकमेव कंद आहे .तर असा हा पंचरसयुक्त लसूण..आणि प्राचीन काळापासून लसणाचा उपयोग स्वयंपाकात व औषधोपचारासाठी केला गेला आहे. लसणाचे असंख्य गुणकारी गुणधर्म शास्त्रीय संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहेत.म्हणूनच जसे अमृताने अमरत्व प्राप्त होते..तसेच हा लसूण कित्येक रोगांपासून आपलं संरक्षक कवच बनून संरक्षण करतो..म्हणजे एक प्रकारे अमरत्वच बहाल करतो आपल्याला.. लसूण खाता मधुमेह चरबी पळे लांब लांब हृदयरोग,मूत्रविकारही राहती दोन हात लांब.. कच्चा लसूण खावा.. सकाळी अनशापोटी एक लसूण खाऊन त्यावर पाणी प्यायले तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते..पण तो अतिशय उष्ण,तीक्ष्ण असतो तसेच तोंडाला उग्र वास ही येतो म्हणून घरी सगळे लसूण खायला नको म्हणतात..पण तोच लसूण शिजवला की गोडसर होतो चवीला..म्हणून मग मी या लसणाच्या लोणच्याचा घाट घातलाय..😀 Bhagyashree Lele -
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10#W10थंडीच्या दिवसांमध्ये ओली हळद भरपूर प्रमाणात मिळते. आमच्याकडे हळदीचे लोणचे आम्ही दरवर्षी घालतो. त्यात आम्ही हिरव्या मिरच्या व आले यांचाही समावेश करतो. आले व हळद ही इम्मुनिटी बूस्टर त आहेतच पण मिरची ने त्याचा स्वाद अजून वाढतो. Rohini Deshkar -
सिमला मिरचीचे लोणचे (shimla mirchi lonche recipe in marathi)
#GA #week4च्या पझल मध्ये सिमला मिरची हा क्लू ओळखून विचारच करत होते काय बरे बनवू?? आणि काय आश्चर्य बऱ्याच वर्षंपूर्वी खाल्लेलं सिमला मिरचीचे लोणचे आठवले.. माझी आई बनवत असे... Monali Garud-Bhoite -
हिरव्या मिरच्यांचे लोणचे🤤🤤 (hirwya mirchiche lonche recipe in marathi)
हिवाळ्यात चटपटीत मिरचीचे लोणचे बरे वाटते😋 Madhuri Watekar -
आलं, मिरची, आंबी हळद लोणचे... (वाडवळी पद्धतीने) (aala mirchi ambi haldi lonche recipe in marathi)
#EB10#W10 Komal Jayadeep Save -
मसाला सांडगी मिरची (masala sandgi mirchi recipe in marathi)
#cooksnap मला ही प्रिती साळवी यांची रेसिपी भूतकाळात घेऊन गेली. आमची आजी ह्या मिरच्या फार सुंदर बनवत असे. कित्येक वर्षत केल्याचं नाही गेल्या. माझी मैत्रीण बनवते तिच्याच कडून घेते. Sanhita Kand -
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
#EB11 #W11विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
झटपट कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)
#कुकस्नॅपमी अंजली भाईक ताईंची चटकदार कैरीचे लोणचे रेसिपी कुकस्नॅप केली. अर्थातच मस्त ,तोंडाला पाणी आणणारी आहे. फक्त मी अगदी थोड्या प्रमाणात लोणचं केलं कारण माझ्याकडे सध्ध्या १ कैरी घरी होती.आणि मेथीची डाळ नव्हती म्हणून मेथीपूड घातली. Preeti V. Salvi -
ओल्या हळदीचे लाल मिरची चे लोणचं(Olya haldiche lal mirchi che lonche recipe in marathi)
ओली हळद हिवाळ्यात निघते फारशी मार्केट मध्ये मिळत नाही अतिशय पोष्टीक गुणकारी ओल्या हळदीचे लोणचे असते 😋😋 Madhuri Watekar -
हिरव्या मिरचीचे लोणचे (mirachi lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2#गावाकडील आठवणीतसं बघितलं तर मी नागपुरातच जन्म झालेला आहे माझं आजोळ पण नागपुरातच आहे माहेर पण नागपूरचा आहे आणि सासर पण नागपूरचा आहे त्यामुळे गाव हा प्रकार कधी बघितलंच नाही आणि कधी जायचा प्रश्नच आलेलं नाही पण मी लहानपणी आजी कडे जायची तर ते मला एक गावा सारखं येते फील यायचा कारण आजीचं घर म्हणजे शेण मातीने सारवलेल्या भिंती चुन्याच्या कोरा घेतलेले छान छान एकदम टापटीप वाटायचं आणि त्या उलट आमचं आईकडचे घर एकदम अपोझिट आमच्या घरी असलं काहीच नव्हतं बोले तो स्टॅंडर्ड, पण ला आजीकडे राहायला खूप मजा यायची वेधून सायकल चालवणे खेळ झाडावर चढणं लपाछुपी खेळणं हे असले सगळे प्रकार मी आजी कडे केलेले आहेत तिथे सगळ्या प्रकारचे लोणचे बनवायचे आंब्याचे लिंबाचे मिरचीचे आवळ्याचे आणि पहिले अजून खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात लोणचे बनवून ठेवायचे तर मला आजी आठवण आली आणि विचार केला पहिल्यांदा मी हिरव्या मिरचीत चे लोणचे बनवून बघितले आणि छान झालेले आहे थँक्यू कु क पेड यानिमित्ताने का होईना लहानपणीच्या आठवणी येऊ लागले आहेत Maya Bawane Damai -
-
आवळ्याचे लोणचे (avala lonche recipe in marathi)
#GA4 #week11 की वर्ड- आवळाआज वैकुंठ चतुर्दशी... भगवान विष्णूंचे पूजन आणि आवळी पूजन म्हणजेच आवळ्याच्या झाडाचे पूजन आणि आवळी भोजन.. असे म्हणतात की आवळ्याच्या झाडाखाली श्री विष्णूंचे वास्तव्य असते.. म्हणून आवळ्याच्या झाडाचे पूजन आणि श्री विष्णूंचे पूजन आज केले जाते. लहानपणी आई मावशी आजी याबद्दल च्या गोष्टी आम्हाला नेहमी सांगायच्या. तेच तुम्हाला आता मी सांगते. घरोब्याचे संबंध असलेली गावातील चार-पाच घरातील बायका मुले मिळून आवळ्याच्या झाडाखाली जात असत.. झाडाखाली सगळी साफसफाई करुन मग आवळ्याच्या झाडाची पूजा करत. येताना बायका खाली अंथरायला चटया,बस्करे वगैरे आणत..तसेच आवळी भोजनासाठी दिवाळीचे फराळाचे पदार्थ शिरा पुऱ्या थालिपीठ वड्या असे पदार्थही घेऊन येत असत. पूजा झाल्यावर चटया अंथरून सगळया बच्चे कंपनीला पत्रावळीवर सर्वांनी आणलेले खायचे पदार्थ एकमेकांना वाटून अंगत पंगत केली जात असे खूप मजा यायची त्यावेळेस त्यांना.. मुलांचा पोटोबा भरला की स्त्रिया एकमेकांना वाढून घेत.. आणि गप्पा मारत हसत खेळत मनसोक्त आवळी भोजन करत.. त्याकाळी बायकांना हेच ते विसाव्याचे आणि आनंदाचे क्षण होते आणि स्त्रिया या क्षणांचा मनमुराद आनंद लुटत असत.. किती सुंदर कल्पना आहे ना आवळी भोजनाची.. तात्पर्याने निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची...निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची.. आपल्या संस्कृतीने निसर्गाची आणि देवा धर्माची किती सुरेख सांगड घातली आहे याचे मला नेहमीच आश्चर्य वाटते ..मला तर हे आवळी भोजन नेहमीच आवडायचे .. पण अजून कधी आवळी भोजनाचा योग आला नाही.. असो.. चला तर मग आपल्या रोजच्या भोजनात आवळ्याचा समावेश करून आपण घरीच आवळी भोजन करु या.. त्यासाठी आज आवळ्याचे लोणचे कसे करायचे हे पाहूया.. Bhagyashree Lele -
-
चटपटीत हिरव्या मिरचीचे लोणचे..(Hirvya Mirchiche Loche Recipe In Marathi)
#NVR .. जेवणामध्ये चटण्या, कोशिंबिरी , लोणचे असल्याशिवाय जेवणात मजा येत नाही. हिवाळा सुरू झाल्याने वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे त्यातही मिरची चे लोणचे केले तर जेवताना छानच वाटते . विदर्भात हमखास यावेळी मिरचीचे लोणचे करतात. तर अशा या मिरचीचे लोणचे, लिंबू टाकून केले आहे मी. Varsha Ingole Bele -
ओली हळद,आल व स्प्राऊटेड मेथी चे लोणच (olya haldi aala meethi che lonche Recipe in Marathi)
#EB10 #W10भारतात जवळपास 40 प्रकारचे लोणच्याचे प्रकार बनवले जातात. अगदी मटणाच लोणच ते अगदी केर सांगरीच लोणच असे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आणि ते लोणच टिकवण्यासाठी लागणारे वेगवेगळे प्रकार. पण काही लोणची ही अगदी झटपट बनणारी ही असतात. त्यातलच हे ओल्या हळदीचआलं आणि मोड आलेली मेथी, हिरवी मिरची घालून केलेल लोणच. Anjali Muley Panse -
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
#EB11 #Week 11#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week11#मिक्स भाज्यांचे लोणचे😋😋 Madhuri Watekar -
मँगो राईस (mango rice recipe in marathi)
मँगो राईस एक साऊथ इंडियन डिश आहे। मागच्या वर्षी मे एका मित्रा कडे खाल्ली होती। त्याची आठवण आल्यामुळे आज मी बनवली। Shilpak Bele
More Recipes
टिप्पण्या