मटारची (हिरवा वाटाणा) बाकरवडी

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

मला सुचलेली ही रेसिपी. खूप छान झाली.
सर्वांनी नक्की करून पहा.

मटारची (हिरवा वाटाणा) बाकरवडी

मला सुचलेली ही रेसिपी. खूप छान झाली.
सर्वांनी नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. सारणाचे साहित्य
  2. 1 कपहिरवा वाटाणा
  3. 2-3हिरव्या मिरच्या
  4. 1/2 इंचआले
  5. 2 टेबलस्पूनओल्या नारळाचा चव
  6. 1/2 टीस्पूनजिरे
  7. 1/4 टीस्पूनहिंग
  8. 1 टीस्पूनमध्यम जाडसर बडिशेप पावडर
  9. 1/2 टीस्पूनसाखर
  10. चवीप्रमाणे मीठ
  11. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  12. 3-4 टेबलस्पूनपिवळी बारीक शेव
  13. वरचे आवरण साहित्य
  14. 3/4 कपमैदा
  15. चवीप्रमाणे मीठ
  16. 1/2 टीस्पूनओवा
  17. 2ते 2.1/2 टेबलस्पून तेल
  18. थोडेसे पाणी
  19. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    एका बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यात चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेणे. साधारण एक-दीड टेबलस्पून तेल घालून घेणे. मैद्याला तेल चांगले चोळून घेणे. पिठाची मूठ तयार झाली पाहिजे. म्हणजे तेलाचे मोहन व्यवस्थित झाले असे समजावे.

  2. 2

    थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घेणे व बाजूला झाकून ठेवणे.

  3. 3

    एका कढईत १/४ टीस्पून तेल घालून घेणे. हिरवा मटार घालून एक दोन मिनिटे परतून घेणे. थोडेसा रंग बदलला की लगेच काढून घेणे व थंड करत ठेवणे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्यावे.

  4. 4

    गॅसवर कढईत थोडे तेल घालून तापत ठेवणे. तेल तापले की त्यात जिरे किसून घेतलेले आलं, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून परतणे. ओल्या खोबऱ्याचा चव घालून अर्धा मिनिट परतून घेणे.

  5. 5

    नंतर बडीशेप पावडर वाटलेल्या वाटाण्याची मिश्रण घालून मिक्स करणे चवीप्रमाणे मीठ साखर घालून घेणे.व्यवस्थित परतून, झाकण ठेवून एक वाफ काढून घेणे. गॅस बंद करणे. वरून लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे.

  6. 6

    तयार झालेली थंड करत ठेवणे तोपर्यंत मळलेले पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेणे व त्याचे समप्रमाणात गोळे करून घेणे एक गोळा घेऊन मध्यम जाडसर पोळी लाटून घेणे. (खूप पातळ नाही व जाडही नाही.)

  7. 7

    त्या पोळीला चिंचेची आंबट गोड चटणी लावून पसरवून घेणे. त्यावर तयार केलेले सारण घालून घेणे व व्यवस्थित पसरवणे. वरून बारीक पिवळसर शेव घालून घेणे.

  8. 8

    आता पोळी व्यवस्थित दाबत गुंडाळून घेणे. थोडेसे हाताने लांबसर करून घेणे व कडयाच्या दोन्ही बाजू आत मध्ये दुमडून घेणे. सुरीने त्याचे हव्या त्या आकारात गोल कापून घेणे.

  9. 9

    इथे गोल आडवा ठेवून अलगद हाताने प्रेस करणे. म्हणजे वडी थोडीशी चपटी होईल. अशाप्रकारे सर्व वड्या तयार करून घेणे. गॅसवर कढईत तेल घालून तापत ठेवणे. तेल चांगले तापले की गॅस मध्यम आचेवर करावा.

  10. 10

    तेलात जेवढया बसतील तेवढ्या वड्या घालून घेणे. गॅस मध्यम आचेवर ठेवून वड्या तळून घेणे. अशाप्रकारे सर्व वड्या तळून घेणे.
    खाण्यासाठी मस्त मटारची बाकरवडी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes