रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ वाटी बेसन पीठ
  2. हिरव्या मिरच्या
  3. लसणाच्या पाकळ्या
  4. २ चमचामोहरी
  5. १ चमचाजिरे
  6. ४ चमचेदही
  7. अर्धा कपपाणी
  8. १ चमचामीठ
  9. १ चमचाहळद
  10. ५-७ पानकढिपत्तात्याचे
  11. बारीक कोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1
  2. 2

    कढईमध्ये दोन ग्लास पाणी मंद आचेवर गरम करायला ठेवावे. कढई काळी होऊ नये यासाठी त्यात लिंबू टाकावे.

  3. 3

    नंतर मिरची, लसूण, हळद व जिरे यांचे वाटण करून घ्यावी.

  4. 4

    त्यानंतर बेसन पीठ घेऊन त्यात दही, पाणी व वाटण टाकून चांगले मिश्रण करावे.नंतर त्यात इनो मिसळावे.

  5. 5

    त्यानंतर ताटाला तेल लावून ते कढईत ठेवावे व त्यात मिश्रण टाकावे. इनो टाकल्यानंतर लगेचच मिश्रण ताटात ओतावे. कढई मध्यम आचेवर ठेवून त्यावर दहा मिनिटे झाकण ठेवावे.

  6. 6

    दहा मिनिटानंतर झाकण उघडून चाकूने ढोकळा तयार झाला की नाही हे तपासावे.ढोकळा तयार झाला असल्यास ताट काढून ढोकळ्याच्या वड्या कराव्यात.

  7. 7

    आता फोडणीसाठी पॅनमध्ये तेल टाकावे. त्यात मोहरी,जिरे आणि कढीपत्ता टाकून तडतडून द्यावे. मग त्यात ढोकळा टाकून परतून घ्यावा. परतल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.

  8. 8

    तयार आहे आपला अगदी कमी वेळात होणारा, बेसनाचा खमंग ढोकळा. चिंचपाणी, मिरची किंवा सॉस सोबत गरमागरम ढोकळ्याचा आस्वाद घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mangal Phanase
Mangal Phanase @cook_19337533
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes