रवळ (Ravala) / रव्याचा केक

Prachi Churi Patil
Prachi Churi Patil @cook_19621826
Bordi

#themasalabazaar

माझी ही पहीली रेसिपी ...
खूप सोप्प असलेलं हे रवळ . आमच्या कडे दिवाळीच्या पहिल्या दिवशी हे बनवतात .
कमी पदार्थात झटपट हॊणारी हि रेसिपी नक्की ट्राय करून पहा .

रवळ (Ravala) / रव्याचा केक

#themasalabazaar

माझी ही पहीली रेसिपी ...
खूप सोप्प असलेलं हे रवळ . आमच्या कडे दिवाळीच्या पहिल्या दिवशी हे बनवतात .
कमी पदार्थात झटपट हॊणारी हि रेसिपी नक्की ट्राय करून पहा .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वेळ ४५ मिनिटे
  1. १ मोठी वाटी इडली रवा
  2. १ मोठी वाटी चिरलेला गुळ
  3. सव्वा दोन वाट्या नारळाच दुध
  4. १ लहान वाटी पातळ तुप
  5. मीठ चवीनुसार
  6. पाव चमचा हळद
  7. जायफळ पावडर
  8. सुकामेवा

कुकिंग सूचना

वेळ ४५ मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण नारळाचं शिरं / नारळाचं दुध काढून घेणार आहोत
    सव्वा दोन वाट्या नारळाच्या दुधा साठी आपल्याला दोन नारळ खवून घ्यावे लागतील. त्यानंतर तो नारळाचा चव पिळून घ्यावा आवश्यक वाटल्यास त्यात पाणी घालून गाळणीवर पिळून घ्यावे व त्यानंतर इडली रवा सुका भाजून घ्यावा.

  2. 2

    १ मोठी वाटी इडली रवा,१ मोठी वाटी चिरलेला गुळ,सव्वा दोन वाट्या नारळाच दुध

  3. 3

    १ लहान वाटी पातळ तुप,जायफळ पावडर,सुकामेवा

  4. 4

    स्टीलच्या भांड्यामधे नारळाचं शिरं घालून मिडीयम हाय फ्लेमवर तापवत ठेवावे. त्यात चिरलेला गुळ घालावा चवीनुसार (पाव चमचा) मीठ घालावे, जायफळ पावडर घालावी

  5. 5

    आता त्यात पातळ केलेले तूप घालावे, थोडे तूप शिल्लक ठेवावे हे तूप आपण नंतर फ्रायपॅन ला ग्रीसिंग करण्यासाठी वापरणार आहोत. नंतर त्यात पाव चमचा हळद घालावी ज्यामुळे आपल्या रवळ्याला छानसा सोनेरी रंग येईल. आता हे सर्व मिश्रण आपल्याला ढवळून एकजीव करून घ्यायचे आहे.

  6. 6

    गॅस मिडीयम हाय फ्लेमवरच ठेऊन हे मिश्रण ढवळत राहावे जेणेकरून गुळ पुर्णपणे विरघळून मिश्रण एकजीव होईल.या मिश्रणाला छान उकळी येऊ द्यावी.

  7. 7

    आता उकळलेल्या मिश्रणात भाजलेला इडली रवा घालावा. रवा घालताना मिश्रण सतत ढवळत राहावे ज्यामुळे आपल्या मिश्रणात गुठळ्या होणार नाहीत. रवा घालून नीट एकजीव केल्यावर मिश्रण थोडा वेळ शिजू द्यावे. मिश्रण साधारण जाडसर होत येईल.

  8. 8

    आता हे जाड झालेले मिश्रण आपण तुपाने ग्रिसिंग केलेल्या फ्रायपॅन मध्ये ओतणार आहोत. नंतर त्यावर गार्निशिंग साठी सुक्यामेव्याचे काप पसरवावे. नंतर त्यावर झाकण ठेऊन १५ मिनिटे मिडीयम फ्लेमवर शिजू द्यावे.

  9. 9

    साधारण १५ मिनिटे होत आली की कि झाकण उघडून रवळ्याच्या पृष्ठभागाला बोट लावुन पाहावे.रवा बोटास चिकटत नसेल, म्हणजे आपले रवळे शिजून तयार आहे. त्यानंतर तो फ्रायपॅन गॅस वरून खाली उतरवून ठेवावा रवळ थंड होत आला कि त्याच्या कडा सुटत जातात.

  10. 10

    आता हे रवळ पसरट ताटांत उलटवून घ्यावे. घ्या तयार आहे आपलं चविष्ट आणि पौष्टीक रवळ किंवा रव्याचा केक तयार. सुरीने त्याचे तुकडी करून गरम गरम खायला द्यावे

  11. 11

    यावर वेगवेगळे गार्निशिंग करून वाढदिवसाला केक म्हणून रवळ हे टेस्टी आणि हेल्दी ऑप्शन आहे.सोनेरी रंगाचा घरी बनवलेला हा केक जरा हटके सजवला की बच्चा पार्टी हि खुश आणि हेल्दी इंग्रेडिएंट्सनी बनलेला असल्याने आपणही खुश... मुलांनी यथेच्छ केकवर ताव मारला तरी आपल्याला चिंता नाही....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Churi Patil
Prachi Churi Patil @cook_19621826
रोजी
Bordi

टिप्पण्या

Similar Recipes