तीळ फ्लाॅवरस्

Kadambari
Kadambari @cook_19509243

तीळ फ्लाॅवरस्

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4 वाटी भाजलेले तीळ
  2. 2 1/2 वाटी गूळ
  3. खायचा रंग
  4. पाव वाटी तीळगुळ सजावटीसाठी
  5. पाव वाटी पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम तीळ 3 भागात विभाजन करावे.

  2. 2

    नंतर एका कढईत 3/4 गूळ घेऊन त्यात 2 टीस्पून पाणी घालून गूळ वितळून घ्यावा. गूळ वितळल्यावर त्यात 1 वाटी तीळ व किंचित खायचा रंग घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.

  3. 3

    मिश्रण एकजीव झाल्यावर गॅस बंद करावा. लाकडी पोळपाटाला तेल लावून त्यावर हे मिश्रण टाकावे व थोड कोमट झाल्यावर लाटण्याला थोड तेल लावून पातळ लाटून घ्यावे.

  4. 4

    नंतर पिझ्झा कटर/ सुरीच्या सहाय्याने त्याच्या लांब पट्टया कापून घ्यावे.

  5. 5

    पट्ट्या कोमट झाल्यावर त्या अलगद उचलून त्याला फुलांचा आकार द्यावा. अशाच प्रकारे उरलेल्या मिश्रणाचे फूल तयार करून घ्यावे.

  6. 6

    यात मायक्रोवेव्ह ओव्हन वापर केला तर उत्तम कारण यात वेळेची बचत होते. नंतर बाऊल मध्ये पुन्हा 3/4 गूळ घेऊन त्यात 2 टीस्पून पाणी घालून ओव्हनला 1-1.30 मि. करता ठेवावे. नंतर त्यात तीळ घालून मिश्रण एकजीव करावे.

  7. 7

    व त्याचे वरील प्रमाणे पोळी लाटून त्याच्या पट्ट्या कापून घ्याव्यात. व फूल तयार करावी. उरलेल्या पट्ट्यामधील एक पट्टीचे घेऊन त्यात बोट ठेवून त्याला आकार द्या.

  8. 8

    नंतर सजावटीसाठी आवडीनुसार मोल्ड घेऊन त्याला तेलाने र्गिसिंग करून घ्या. उरलेल तिळाच मिश्रण टाकून व्यवस्थित थापून घ्यावे.

  9. 9

    6-7 तासाने मोल्ड मधून आकार बाहेर काढून डिश सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kadambari
Kadambari @cook_19509243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes