भोगीची मिक्स भाजी

Mangal Phanase
Mangal Phanase @cook_19337533

#संक्रांती

भोगीची मिक्स भाजी

#संक्रांती

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ●भाज्या-
  2. 10वालाच्या शेंगा
  3. अर्धी वाटी सोडलेले हरभरे
  4. पाव वाटीशेंगदाणे
  5. 3 चमचेतीळ
  6. 3 ते 4 बोरं
  7. 12डिंगऱ्या
  8. कोथिंबीर
  9. 2गाजर
  10. अर्धी वाटी ओला वाटाणा
  11. 2शेवग्याच्या शेंगा
  12. 3वांगे
  13. 1 छोटाकापलेला कांदा
  14. ●मसाले-
  15. 3हिरव्या मिरच्या
  16. 3भाजलेले कांदे
  17. अर्धी वाटी तीळ
  18. अर्धी वाटी धने
  19. 2 इंचआल
  20. 2कांड्या लसुन
  21. कोथिंबीर
  22. 4 तुकडेहळकुंड
  23. चवीनुसार मीठ
  24. 1 वाटी किसलेले खोबरे
  25. थोडासा खडा हिंग

कुकिंग सूचना

  1. 1

    खालील सर्व मसाले व्यवस्थित एक एक करून भाजून घ्यावे.

  2. 2

    भाजून झाल्यावर ते मिक्सर मधून बारीक करावे

  3. 3

    वरील सर्व भाज्या हळद व चवीनुसार मीठ टाकून एका कढईत तेल टाकून परतून घ्यावे.

  4. 4

    त्यानंतर दुसऱ्या कढईत तेल टाकून त्यात कढीपत्ता,कोथिंबीर,एक बारीक कापलेला कांदा, एक चमचा हिंग पावडर,हळद,लाल मिरची पावडर व एवरेस्ट मसाला टाकून फोडणी करून घ्यावी. त्यात काळा मसाला परतून काढावा.

  5. 5

    मसाला परतल्यावर परतलेल्या सर्व भाज्या त्या मसाल्यात टाकाव्यात व नीट परतून घ्याव्यात. त्यानंतर त्यात खोबरे व तिळाचा बारीक केलेला मसाला गरम पाणी टाकून ओतून द्यावा.

  6. 6

    मसाल्याच्या मापात गरम पाणी टाकून भाजी शिजण्यासाठी ठेवावी. वीस मिनिटे भाजी मध्यम आचेवर उकळू द्यावी.

  7. 7

    ही भाजी खाण्यासाठी खूप पौष्टिक असते.वर्षातून एकदा ही भाजी सर्वांच्या घरी बनवतात व सर्वजण तिला आवडीने खातात.ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून खूप छान लागते.सोबत कांदा व लिंबू असल्यावर तर मजाच वेगळी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mangal Phanase
Mangal Phanase @cook_19337533
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes