लिफिव्हेजि रवा उत्तपम

Suhani Deshpande
Suhani Deshpande @cook_20089255

#पालेभाजी
#myfirstrecipe

आजची आपली रेसिपी खास वाढत्या मुलांसाठी आणि महिलांसाठी आहे. पालेभाज्या आपल्या रोजच्या आहारात असायलाच हव्यात. पण त्या खाताना मुलांची "कटकट" ही "आई" वर्गासाठी झालेली मोठी डोकेदुखी आहे. येनकेनप्रकारे मुलांना लालमाठ, पालक, चवळी, अळू, शेपू, शेवगा या लोहयुक्त, व्हिटॅमिन ए, बी-12 आणि फायबर रिच भाज्या खाऊ घालणे म्हणजे एक मोठा टास्क असतो. महिलांमधील मेनोपॉज, लोहाची कमतरता, हार्मोनल इमबॅलन्स या शारीरिक कमतरतेवर पालेभाज्यांचे सेवन गुणकारी ठरते.

मग आज आपण करूया "लिफिव्हेजि रवा उत्तपम". ही रेसिपी अगदी सोप्पी, झटपट होणारी, कुठल्याही भाज्यांच्या कॉम्बिनेशनने बनणारी आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी तर उत्तम ऑप्शन आहे.

आज मी यात लालमाठ, पतीचा कांदा आणि मोरिंगा पावडर या भाज्यांचे कॉम्बिनेशन वापरले आहे. मोरिंगा म्हणजे शेवगा. ही पालेभाजी अतिशय पौष्टिक आणि औषधी आहे. (नेटवर याचे अगणित फायदे तुम्ही सर्च करू शकता) मी याची पावडर बनवून ठेवते आणि बऱ्याच रेसिपीज मध्ये वापरते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दिलेल्या साहित्यात एकूण ७ मिनी उत्तपम होतील
  1. १ वाटीबारीक रवा
  2. १/२ वाटीvदही
  3. १/२ ते ३/४ वाटीपाणी
  4. १ वाटीलाल माठ (स्वच्छ धुवून, बारीक चिरून)
  5. 1 वाटीपतीचा कांदा (कांद्यासह स्वच्छ धुवून, बारीक चिरून)
  6. १ मोठा चमचाआलं मिरची पेस्ट भरून
  7. १ पाकीटइनो फ्रुट सॉल्ट
  8. काळे किंवा पांढरे तीळ (ऐच्छिक आहेत)
  9. मीठ चवीनुसार
  10. उत्तपम तव्याला लावण्यासाठी तेल, तूप किंवा बटर यापैकी काहीही एक

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम, रवा, दही व चवीपुरते मीठ घालून एकत्र करावे. त्यात थोडे थोडे करत पाणी घालून सरसरीत पीठ भिजवावे.

  2. 2

    भिजवलेले पीठ १५ ते २० मिनिटे झाकून ठेवावे.

  3. 3

    २० मिनिटांनंतर त्यात सर्व भाज्या, आलं-मिरची पेस्ट आणि तीळ घालून व्यवस्थित एकजीव करावे. नंतर त्यात इनो फ्रुट सॉल्ट घालून हलक्या हाताने एकजीव करावे.

  4. 4

    नॉनस्टिक तवा गरम करावा. त्यावर तेल/तूप/बटर घालावे आणि तयार उत्तपमचे बॅटर डावेने घालून पसरावे. आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे हवे तसे उत्तपम घालावेत. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावेत.

  5. 5

    गरमागरम उत्तपम चटणी, केचप किंवा तुमच्या आवडत्या डीप सोबत एन्जॉय करावेत. मुलांना अधिक आकर्षित करण्यासाठी त्यावर थोडे चीझ किसून घालावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suhani Deshpande
Suhani Deshpande @cook_20089255
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes