मूगडाळ आणि काकडीची कोशिंबीर

Smita Mayekar Singh
Smita Mayekar Singh @cook_20355451

कोशिंबिरी म्हणजेच सॅलड चे भारतीय थाळीत अतिशय महत्त्वाचे स्थान ! दह्यासोबत किंवा दह्याशिवाय बनलेल्या , कच्च्या फळ भाज्या आणि फळांपासून बनलेल्या या कोशिंबिरी   पचनक्रिया सोप्पी होण्यासाठी आवश्यक असलेले फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थांचा पुरवठा करतात . कर्नाटकातली प्रसिद्ध काकडी आणि मूग डाळीची कोशिंबीर!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3-4 सर्व्हिंग्ज
  1. १०० ग्रॅम्स मूग डाळ - पाण्याने स्वच्छ धुऊन २ तास पाण्यात भिजत घालावी
  2. २५० ग्रॅम्स काकडी (चौकोनी तुकडे करून)
  3. १/४ कप कोथिंबीर बारीक चिरून
  4. मीठ चवीनुसार
  5. २ टेबलस्पून लिंबाचा रस
  6. हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  7. १ - १/२ टीस्पून साखर
  8. १/४ कप ओल्या नारळाचा चव
  9. १ टेबलस्पून तूप
  10. १ टीस्पून मोहरी
  11. चुटकीभर हिंग
  12. १ टेबलस्पून उडीद डाळ

कुकिंग सूचना

  1. 1

    1. एका मोठ्या भांड्यात काकडीचे तुकडे, भिजवलेली मूग डाळ, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, लिंबाचा रस, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र मिसळून घ्यावी.

  2. 2

    2. फोडणीसाठी १ टेबलस्पून तूप गरम करावे. त्यात उडीद डाळ टाकून ती खरपूस रंगावर येईस्तोवर परतून घ्यावी. फक्त करपू देऊ नये. मग मोहरी घालून तडतडू द्यावी. हिंग घालून परतून घ्यावे. ही फोडणी कोशिंबिरीवर घालून मिसळून घ्यावी. वरून ओले खोबरे भुरभुरावे. झाली आपली कोशिंबीर तयार !

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Smita Mayekar Singh
Smita Mayekar Singh @cook_20355451
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes