#सीफूड

Suhani Deshpande
Suhani Deshpande @cook_20089255

मलबार फिश करी

मलबार फिश करी ही केरळची खासियत आहे. पारंपरिक मलबार फिश करी ही मातीच्या भांड्यात केली जाते. नारळाचे तेल, नारळाचे दूध, चिंचेचा कोळ आणि मातीच्या भांड्यात कढवलेली सिल्की स्मूथ, किंचित आंबट चमचमीत करी आमच्या घरी सगळ्यांची अतिशय आवडती आहे.

या करीसाठी मुख्यत्वे रावस, सुरमई किंवा पापलेट या फिशचा उपयोग करतात.

#सीफूड

मलबार फिश करी

मलबार फिश करी ही केरळची खासियत आहे. पारंपरिक मलबार फिश करी ही मातीच्या भांड्यात केली जाते. नारळाचे तेल, नारळाचे दूध, चिंचेचा कोळ आणि मातीच्या भांड्यात कढवलेली सिल्की स्मूथ, किंचित आंबट चमचमीत करी आमच्या घरी सगळ्यांची अतिशय आवडती आहे.

या करीसाठी मुख्यत्वे रावस, सुरमई किंवा पापलेट या फिशचा उपयोग करतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3 जणांसाठी
  1. 250 ग्रामरावस मासा
  2. १ वाटी नारळाचा चव
  3. १/२ वाटी नारळाचे दूध
  4. ४ काश्मिरी लाल मिरच्या (१/२ तास पाण्यात भिजवून)
  5. १ मोठा चमचा धणे (१/२ तास पाण्यात भिजवून)
  6. १/२ चमचा जिरे
  7. ४ ते ५ काळे मिरे
  8. ४ ते ५ मेथी दाणे
  9. १ इंच आल्याचा तुकडा
  10. ८ ते १० लसूण पाकळ्या
  11. २ कांदे उभे चिरून
  12. ३ मोठे चमचे चिंचेचा कोळ
  13. ८ ते १० कढीपत्त्याची पाने
  14. १ मोठा चमचा लाल तिखट
  15. १ मोठा चमचा गरम मसाला
  16. १/४ चमचा हळद
  17. १/४ चमचा मोहरी
  18. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम रावस माशाचे पीस करून ते स्वच्छ धुवून घ्या. कढईत/मातीच्या भांड्यात १ मोठा चमचा नारळाचं/अन्य कोणतंही नेहमीच्या वापरातलं तेल घेऊन गरम होऊ द्या. त्यात काळे मिरे, जिरं, मेथी दाणे आणि कांदा घालून परतून घ्या. कांदा जास्त ब्राऊन करायचा नाहीये, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतायचा आहे.

  2. 2

    करीसाठी वाटण करायचे आहे. त्याकरिता मिक्सरमध्ये ओलं खोबरं, आलं, लसूण, कढीपत्ता, काश्मिरी लाल मिरच्या, धणे घालून वाटून घ्या. त्यातच परतलेला कांदा घालून गंधासारखी गुळगुळीत पेस्ट वाटून घ्या. वाटण करताना आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घाला.

  3. 3

    आता पुन्हा एकदा त्याच मातीच्या भांड्यात/कढईत १ मोठा चमचा नारळाचं / अन्य कोणतंही नेहमीच्या वापरातलं तेल घेऊन गरम होऊ द्या. त्यात मोहरी व हळद घाला. मोहरी तडतडली की वाटण घाला आणि छान परतून घ्या. २ मिनिटे परतल्यावर त्यात मोठा पेला भरून पाणी घाला.

  4. 4

    तयार मिश्रणात १ मोठा चमचा लाल तिखट, १ मोठा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घाला आणि दणदणीत उकळी आणा.

  5. 5

    उकळी आल्यावर त्यात चिंचेचा कोळ व नारळाचे दूध घाला. आपली करी तयार आहे.

  6. 6

    आता तयार करीमध्ये सर्व फिशचे पीस सोडा आणि झाकण ठेवून मंद आचेवर ७ ते ८ मिनिटे फिश शिजू द्या.

  7. 7

    साधारणपणे ८ मिनिटांनी झाकण काढून फिश शिजलेत का ते चेक करा. आणि गरमागरम फिश वाफळणाऱ्या भातासोबत किंवा भाकरी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suhani Deshpande
Suhani Deshpande @cook_20089255
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes