चीज कबाब

Kadambari
Kadambari @cook_19509243

# किड्स
अहमदनगरला झालेल्या Cookpad च्या इव्हेंट मध्ये शेफ आरती निजापकर यांनी केलेल्या दही कबाबला व्टिस्ट देऊन हे कबाब करायचा मी प्रयत्न केला आहे.
कदाचित आवडतील तुम्हाला.. ☺

चीज कबाब

# किड्स
अहमदनगरला झालेल्या Cookpad च्या इव्हेंट मध्ये शेफ आरती निजापकर यांनी केलेल्या दही कबाबला व्टिस्ट देऊन हे कबाब करायचा मी प्रयत्न केला आहे.
कदाचित आवडतील तुम्हाला.. ☺

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1वाटी बारीक चिरलेला कोबी
  2. अर्धी वाटी बारीक चिरलेला फ्लॉवर
  3. अर्धी वाटी बारीक चिरलेली सिमला मिरची
  4. अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा
  5. अर्धी वाटी स्वीटकाॅर्न
  6. अर्धी वाटी बारीक चिरलेला बीट
  7. 1किसलेला/ उकडलेला बटाटा
  8. अर्धी वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात
  9. 2 टीस्पूनलसूण- मिरची- कढीपत्ता पेस्ट
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. 2वाटी ब्रेडक्रम्स
  12. पाव वाटी बारीक रवा
  13. अर्धी वाटी बेसन/ तांदळाच पीठ
  14. 1 टीस्पूनलाल तिखट
  15. 1 टीस्पूनहळद
  16. 1 चमचामीठ
  17. 1Maggi masala a magic
  18. 1 टीस्पूनधना पावडर
  19. 2चीज क्यूब
  20. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    साहित्य काढून घ्यावे.

  2. 2

    एका खोलगट भांड्यात वरील सर्व भाज्या एक- एक करून टाकाव्यात व लसूण मिरची- कढीपत्ता पेस्ट घालून मिक्स करून घ्याव्यात.

  3. 3

    नंतर त्यात ब्रेडक्रम्स, स्वीटकाॅर्न, चीज, कोथिंबीर, मीठ, हळद व लाल तिखट घालावे. नंतर त्यात बेसन व तांदळाच पीठ घालावे. (दोन्ही पैकी 1 सुद्धा वापरू शकता. फक्त प्रमाण हे मिश्रणानुसार अंदाजे घ्यावे.)

  4. 4

    नंतर मिश्रण एकजीव करून 10 मिनिटे ठेवावे. नंतर पाण्याचा शिपका देवून मिश्रण पुन्हा एकजीव करावे.

  5. 5

    तेल तापायला ठेवून मिश्रणाचे छोटे गोळे तयार करून त्याला कबाब चा आकार द्यावा. एका बाजूला काॅर्न फ्लॉवरची पेस्ट बनवून त्यामध्ये कबाब डिप करून तळून घ्यावेत. आणि साॅस सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kadambari
Kadambari @cook_19509243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes