चिकन रोझाली कबाब (Chicken Rozali Kabab Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

हे कबाब आम्ही एका हॉटेलमधे खाल्ले त्याचे नाव युनानी कबाब असे होते मग मी यू ट्यूब वरून शोधले व यरफ्रायरमधे करून पाहीले. यू ट्यूबवर त्याचे नाव रोझाला कबाब असे आहे.

चिकन रोझाली कबाब (Chicken Rozali Kabab Recipe In Marathi)

हे कबाब आम्ही एका हॉटेलमधे खाल्ले त्याचे नाव युनानी कबाब असे होते मग मी यू ट्यूब वरून शोधले व यरफ्रायरमधे करून पाहीले. यू ट्यूबवर त्याचे नाव रोझाला कबाब असे आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 300 ग्रॅमचिकन ब्रेस्ट
  2. 200 ग्रॅममटणाचा खिमा
  3. 1मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून
  4. 2 टी स्पूनआल लसूण मिरचीची पेस्ट
  5. 1/2 चमचाहळद
  6. 1 चमचासंडे मसाला
  7. 1/2 चमचागरम मसाला
  8. चवीनुसारमीठ
  9. 1 चमचाव्हिनीगर
  10. 4 टे. स्पून पाणी काढून टाकलेले घट्ट दही
  11. 1/2 चमचाहळद
  12. 1/2 चमचागरम मसाला
  13. 1/2 टी स्पूनजीरे पूड
  14. 1 टे. स्पून तेल
  15. 1 टी स्पूनगरम करून चिरलेली कसूरी मेथी
  16. चवीनुसारमीठ
  17. 1/2 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  18. 4क्यूब्ज अमूल चीज
  19. 2 टी स्पूनतेल
  20. 2 टी स्पूनअमूल बटर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम चिकन ब्रेस्ट च्या पातळ स्लाईस कापून घेतल्या व धुवून त्यांना मीठ, व्हिनेगर व १ टीस्पूनआलं लसूण मिरचीची पेस्ट लावून १/२ तासासाठी मॅरिनेट करून ठेवले

  2. 2

    खिमा स्वच्छ धुवून त्यालाआलं लसूण मिरची पेस्ट, संडे मसाला, हळद, गरम मसाला व चवीनुसार मीठ घालून मॅरिनेट करून घेतला

  3. 3

    नंतर एका भांड्यात तेल गरम करून घेतले व त्यावर कांदा परतून घेतला. नंतर त्यांत मॅरिनेट करून ठेवलेला खिमा परतवला व थोडे पाणी घालून चांगला शिजवून कोरडा करून घेतला. नंतर त्यांत बारीक चिरलेली कोथिंबीर व चीज किसून घातले व सर्व एकजीव केले.

  4. 4

    नंतर मॅरिनेट केलेल्या चिकनच्या प्रत्येक स्लाईस वर थोडा थोडा खिमा घालून रोल्स करून घेतले.

  5. 5

    नंतर एका भांड्यात घट्ट दही, हळद, तेल, गरम मसाला, जीरे पूड, कसूरी मेथी व चवीनुसार मीठ घालून सर्व एकजीव करून घेतले व तयार केलेले रोल्स त्यांत घालून छान मॅरिनेट करून ठेवावे.

  6. 6

    नंतर मॅरिनेट केलेले रोल्स एयर फ्रायर मधे ठेवून १८०॰वर १० मिनीटासाठी भाजून घेतले व त्यावर अमूल बटर स्प्रेड करून पुन्हा १० मिनिटांसाठी भाजून घेतले.

  7. 7

    असे हे गरमागरम रोझाली कबाब हिरव्या चटणीबरोबर फार छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes