रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 2वाटी दूध
  2. 1वाटी बारीक रवा
  3. 2 टीस्पूनसाखर
  4. 1 टीस्पूनतूप
  5. पाक करण्यासाठी
  6. 2वाटी साखर
  7. 1वाटी पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम गॅस वरती पातेले ठेवून त्यामधे दूध,तूप व 2टीस्पून साखर घालून गरम करायला ठेवावे

  2. 2

    दूध गरम झाले की त्यामधे रवा घालून पटापट हलवून घ्यावे व त्यावर पाच मिनिटं झाकण ठेवावे (रवा घातल्यावर पटापट हलवावे नाहीतर रव्याचा गुठळ्या होतात)

  3. 3

    पाच मिनिटांनी गॅस बंद करून रवा थंड करून घ्यावा

  4. 4

    रवा थंड होईपर्यंत साखरेचा पाक करण्यासाठी ठेवावे, साखरेचा पाक करण्यासाठी पातेलं गॅसवर ठेवावे त्यामध्ये साखर घालावी व साखरेच्या निम्मे पाणी घालावे (गुलाबजाम साठी एक तारी पाक करायचा नाही,फक्त पाकाला चिकट पणा येईपर्यंत पाक शिजवाचा आहे)

  5. 5

    अता थंड झालेला रवा ताटामधे काढून एकजीव होईपर्यंत मळून घेणे व तुम्हाला हवे त्या आकाराचे गोळे करून घेणे

  6. 6

    नंतर कढईत तेल गरम करून घेणे नंतर त्यामध्ये तयार केलेल गोळे तेलामधे सोनेरी रंगावर तळून घ्यावेत

  7. 7

    नंतर तळून घेतलेले गुलाबजाम साखरेचा पाकात सोडावेत व 5/6तास पाकात मुरत ठेवावे

  8. 8

    5/6 तासातने गुलाबजाम पाकातून काढून खाण्यासाठी सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Rohini Jagtap Gade
Rohini Jagtap Gade @cook_20092993
रोजी
Thane

Similar Recipes