बेलफळाचे ताजे सरबत

Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
Virar

#पेय
बेलफळ हे औषधी आहे, हे ऐकून माहित होते, पण कधी प्यायले नव्हते. लग्न झाल्यावर सासरी परसात बेलाची दोन झाडं आहेत, आणि काही वर्षांपासून त्याला फळही यायला लागली. पण त्याचा मुरांबा करणे एवढंच माहित होते. मग युट्युब धुंडाळून त्याबद्दल माहिती मिळाली. मग मीही त्यात बरेच बदल करून गेल्या वर्षी साठवणीसाठी सरबत बनवलं व ते आजही कोणतेही संरक्षक न वापरता उत्तम आहे. पण आज मी तुम्हाला बनवून लगेच गट्टम करायची रेसिपी देणार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5-6 जणांसाठी
  1. 1बेलफळ
  2. अर्धीसाखर बेलफळाच्या गराच्या मापाची
  3. अर्धे लिंबू
  4. 10-12पुदिन्याची पाने
  5. 1/2 टीस्पूनसैंधव मीठ
  6. चिमूटभरसाधे मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम बेलफळ फोडून, हो बेलफळाचे आवरण थोडे कडक असल्याने लाटणे किंवा बत्त्याने फोडावे लागते. आतील गर चमच्याने एका भांड्यात काढून घ्यावा. हा गर मोजून त्याच भांड्याने मोजून अर्धी साखर घ्यावी.

  2. 2

    मोजलेल्या गरात, गर बुडेल इतपत पाणी घालून थोडा वेळ झाकून ठेवावे, म्हणजे गर मऊ होतो.

  3. 3

    आता भांड्यावर पुरणाची जाळी ठेवून त्यात थोडा-थोडा गर घालून चमच्याने घासून बिया बाजूला काढाव्यात. या गरात मोजलेली साखर घालून ढवळून साखर विरघळवावी.

  4. 4

    आता लिंबू क्रशर मध्ये पुदिन्याची पाने घालून वर लिंबू ठेवून क्रश करावे. म्हणजे लिंबासोबत पुदिन्याचा रसही गरात पडेल.

  5. 5

    बेलफळाचे हे दाट सरबत तयार झाले, ते चांगले ढवळून घ्यावे. आता त्यात सरबताएवढेच गार पाणी घालून ढवळावे. ग्लासात ओतून थंडच प्यायला द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
रोजी
Virar

टिप्पण्या

KP
KP @cook_25563205
वा, मस्त रेसिपी. मला माहित होते की बेलफळ सरबत आरोग्याकरिता उत्तम आहे पण रेसिपी माहित नव्हती. खूप खूप धन्यवाद!

Similar Recipes