चनपापडी

Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
Virar

#बेसन, ही आमच्या ज्ञातीची पारंपारिक रेसिपी आहे आणि दिवाळीत बनवली जाते. अगदी कितीही अडचणी आल्या तरी, ज्ञातीभगिनी वाटीभर बेसनाच्या चनपापड्या बनवणारच. काळानुसार मी यात बरेच बदल केले, पण आज मी मुख्य पाककृती देणार आहे आणि त्यात तुम्ही कसे बदल करू शकता, हे सांगणार आहे. दुपारच्या खाण्यासाठी मस्त.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

250ग्रॅम किंवा थोड्या अधिक.
  1. 1 कपबेसन /चण्याचे पीठ
  2. 2 टीस्पूनकॉर्नफ्लोअर / तांदूळ पीठ
  3. 1-1 1/2 टीस्पून लाल मिरचीपूड
  4. 1 टीस्पूनधणे-जिरेपूड
  5. 1 टीस्पूनभाजलेली जिरे-मिरीपूड
  6. 1/2 टीस्पूनसैंधव मीठ
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. चवीनुसारमीठ
  9. तळण्यासाठी व मोहनासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम बेसन व सर्व मसाले, मीठ एकत्र करून घ्यावे.

  2. 2

    या पिठात कडकडीत तेलाचे मोहन घालून पोळ्यांना भिजवतो तसे पीठ भिजवावे. हे पीठ अर्धा तास झाकून ठेवावे. वेळ नसल्यास लगेच केले तरी चालतात.

  3. 3

    तयार पिठाची मोठी पोळी लाटून, छोट्या वाटी किंवा कुकी कटरने पापड्या पाडून घ्याव्यात.

  4. 4

    तयार पापड्या गरम तेलात गुलाबीसर किंवा कडक होईपर्यंत तळून घ्याव्यात.

  5. 5

    तयार पापड्या हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. या पापड्यांच्या पिठात बारीक चिरलेला पुदिना किंवा कडीपत्ता घालून त्या चवीच्या पापड्या बनवू शकता. या पापड्या वापरून मी शेवपुरी बनवते, त्याचा फोटो सोबत दिला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
रोजी
Virar

टिप्पण्या

Similar Recipes