कुरकुरीत बेसन पापडी

Sadhana Salvi
Sadhana Salvi @cook_22587757

कुरकुरीत बेसन पापडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३ ते ४ प्लेट
  1. १५० ग्रॅम बेसन
  2. मुठभर पोहे
  3. अर्धा चहाचाप्रत्येकी चमचा हिंग, हळद, जीरेपुड
  4. एक चहाचा चमचाप्रत्येकी धणेपुड, ओवा, आल लसुन पेस्ट
  5. 1 चमचाकसुरीमेथी
  6. चवीप्रमाणे मीठ आणि मिरची पावडर
  7. २० ग्रॅम तीळ
  8. २०० मी. ली. गोडेतेल
  9. वरून भुरभुरण्यासाठी काळे मिठ

कुकिंग सूचना

  1. 1

    पोहे थोडे पाणि घालुन भिजवून घ्यावे, नंतर एका परातीत बेसन घेऊन त्यात मिठ, मिरचीपावडर, हिंग, हळद, धणे जीरेपुड, आलेलसुन पेस्ट, घालावे नंतर ओला आणि कसुरीमेथी वेगवेगळे हातावर चुरून त्यात घालावे नंतर त्यात ५० मी. लि. तेल घालुन सर्व मिश्रण चांगले मिसळून घ्यावे नंतर त्यात भिजवलेले पोहे घालुन पुन्हा चांगले मिसळून घ्यावे नंतर थोडे थोडे पाणि घालुन पीठ घट्ट भिजवून १५/२० मिनीटे बाजुचा ठेवून द्याले. बेसन भिजवताना पाणि कमी लागते तसेच आपण पोहे भिजवलेत हे लक्शात ठेवावे पाणि फार कमी लागेल

  2. 2

    आता पीठाचे तीन गोळे करून ठेवा, एक एक गोळा तीळात घोळवुन त्याच्या चपात्या लाटुन घ्या आणि त्या पापडीच्या आकारात कार्टुन घ्या

  3. 3

    एका कढईत तेल गरम करायला ठेवा, तेल गरम झाल्यावर त्यात पापड्या सोडा, तेल कडकडीत गरम करू नका त्यामुळे पापड्या वरुन कापतील आणि आतून कच्या राहतील. सर्व पापड्या पिवळसर सोनेरी रंगावर तळुन घ्या. सर्व पापड्या तळून झाल्यावरच त्यांवर थोडे काळे मिठ भुरभुरावे छान चव लागते झाला आपला चहासोबतचा चटपटीत नाष्ता तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sadhana Salvi
Sadhana Salvi @cook_22587757
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes