सोन कटोरी चाट

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#स्ट्रीट
नेहमप्रमाणेच मुलानं ची कुर कुर्, आज काही तरी चटरपटर कर, रोज तेच ते जेवण बोर होते आहे, आणि कुटे जाता नाही येत खुप विट आला आहे आम्हाला,, अशी ही कुर कुर दोघांची मुलानं ची चालू होती,, मग मी पण त्यांना ठणकावले चांगले ,"म्हंटले काही मी बनवीत नाही ., मला नाही का रोज रोज कामाचा कंटाळा येत, जा नाही बनवीत काहीच, ...
मग दोघेही चिडीचूप झाले त्यांना वाटले की आई चिडली आता काहीही बोलू नाही, आणि दोघेही अभ्यास करायला त्यांचा रूम मध्ये जाऊन बसले,
मग मलाच राहवेना कारण त्यांची आई ना मी मग विचार केला काय करावं बरं....मग मी चाट करण्याचे ठरविले, माझी तयारी सुरू झाली, .....असे माझे चटूरे मूल,
..पण त्याचा मुळेच तर मला छान छान रेसिपी करायला मिळतात..खाणारे असलेच तर छान छान करू ना....😝👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 कपमोड आलेले मूग
  2. 1/2 कपमोड आलेली मटकी
  3. 1/2 कपमोड आलेले छोटे कबुली चणे
  4. 2बटाटे शिजून घटलेले
  5. 2कांदे
  6. 2टोमॅटो
  7. 1 ते1 1/2 कप मैदा
  8. तेल तळण्यासाठी
  9. 1 टेबलस्पूनजिरे
  10. 1 टेबलस्पूनमोहरी
  11. 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  12. 1टिस्पून हळद
  13. 3 टेबलस्पूनउसळ बनविण्यासाठी तेल
  14. 1/2 कपचिंच चटणी
  15. 1/2 कपपुदिना चटणी
  16. 1/2 कपफेटलेले दही
  17. 1 टेबलस्पूनसाखर
  18. 1/2 टेबलस्पूनकाळ मीठ
  19. चवीप्रमाणेसाद मीठ
  20. 1/2 कपसांबार (कोथिंबीर)
  21. डाळिंब, शेव, फारसं हे ऑप्शनल आहे

कुकिंग सूचना

  1. 1

    कृती... कटोरी बनविण्याची पद्धत...
    मैदा एका मोठ्या बाऊल मध्ये मळता येईल अशात काडणे..
    त्यात 1टीस्पून जिरे घलावे, थोडे मीठ घालावे, 3टेबलस्पून तेल घालने, आणि त्याला एकत्र मिक्स करून घ्यावे, छान मिक्स केल्यावर त्यात हळु हळू पाणी घालून चांगला मळून घेणे आणि 15 मिंट रेस्ट साठी त्याला झाकून ठेवणे, मग 15 मिंतानी त्याला काढून घ्यने, आता कडाई गॅस वर तापत ठेवणे, त्यात तेल तळण्यासाठी घेणे, मळ लेल्या मैदा चा छोटा भाग घेऊन त्याचा गोळा करून त्याची छोटी पोळी लाटणे, मग एक वाटी घेणे त्या वाटी ला ही पोळी चांगली

  2. 2

    , मग एक वाटी घेणे त्या वाटी ला ही पोळी चांगली बाहेरून चीपकुन घेणे, आणि काटा चमचा ने त्याला छिद्र करणे जेणे करुन ती फुगली नाही पाहिजे आणि आतून बाहेरून तळल्या गेली पाहिजे, आणि ती वाटी गरम झालेल्या तेलात सोडणे आणि छान खरपूस तळून घेणे, सरळ वाटी टाकने, मग ती उलटी करून तळून घेणे, आता मैदा वाटी ला सोडून देईल, वाटी काढून घेणे आणि आता आपली मैद्याची कटोरी तळून तयार आहे, अशा सर्व तळून घेणे,,

  3. 3

    उसळ बनवण्या ची कृती...कढई गॅसवर तापत ठेवून त्यात 2 टेबलस्पून तेल घाला, त्यात मोहरी जिरे, टाका, ते तडतडल्यावर त्यात चिरलेला कांदा टाका, तो लालसर झाला की 1 चिरलेला टोमॅटो घाला आणि टोमॅटो चांगला शिजला की त्यात लाल तिखट, हळद, मीठ घालून चांगले परतावे,मग त्यात मूग, मटकी घालावी, मग एक 2 मिंट त्याला परतून घेणे आणि बाजूला थंड होण्यासाठी ठेवणे..आता चण्या ला कुकर मध्ये मिठ घालून शिजवून घेणे, आणि ते कडईत 1/2 टीस्पून जिरे, मोहरी घालून फक्तं परतून घेणे,,...

  4. 4

    आता कटोरी चाट बनविणे...
    आता पुदिना चटणी, चिंच चटणी, काळ मीठ, फेटलेले दही त्यात 1 टेबलस्पून साखर घातलेले आणि चवीप्रमाणे मिठ घालून मिक्स केलेले, आणि उसळी जवळ ठेवणे,, आता मैदा ची कोटरी घेने त्यात पाहिले मटकी, मूग ची उसळ घाळणे त्यानंतर कांदा घाला, आता त्यात बॉइल्ड बटाटा घाला,त्यावर काळे मीठ घाला चुटकी भर त्यावर चण्याची उसळ घाला,, घरी फरसाण असेल तर ते घाला, त्यावर कांदा परत घाला,आता त्यावर टोमॅटो घाला, मग आता दही घाला,आता पुदिना चटणी घाला, चिंच चटणी घाला, आता सांबार घाला आणि श

  5. 5

    , आता सांबार घाला आणि शेव असेल तर ती टाका, आता डाळींब घाला, ही अशी छान टेस्टी कोटोरी चाट तयार आहे, खुप मस्त आणि मजेशीर लागते...करून बघ नक्की आवडेल....
    डाळिंब, फरसाण, शेव, हे ऑप्शनल आहे, हे असेल तर टाका नसेल तर नका टाकू..

    माझा टच असा आहे यात मी उसळी छान फोडणी दिलेल्या आहेत,,, त्यामुळे ती चाट छान होते
    हॅपी कुकींग...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes